Category: मुंबई

Mumbai news

‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’मुळे कमी होऊ लागले हवेतील धुळीचे प्रमाण

नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…

नूतन हिंदी प्राथमिक हायस्कूल येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शन संपन्न

कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक  विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

केडीएमसी क्षेत्रात बांधकाम परवाना मिळणार ऑनलाईन

 त्रासमुक्त परवानग्या मिळण्याण्यासाठी आँनलाईन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा  टिडीआर्, रिडेव्हलमेन्ट,  परवानगी शुल्क फी, आदी परवानग्या आँनलाईन माध्यमातून राबिविण्यासाठी मनपा यंत्रणा सज्ज झाली आहे. केडीएमसीच्या मते, बांधकाम आराखड्यांसाठी ही सुविधा आधीच होती, परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे लोक बांधकाम परवानगी ऑफलाइन घेत असत. अलीकडेच, बांधकाम परवानगीशी संबंधित कामात पारदर्शकता आणण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  केडीएमसीच्या नगररचना विभागाने गुरुवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांची बैठक बोलावली, जिथे त्यांना इमारत आराखड्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचे निराकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. केडीएमसी नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक नगररचना संचालक नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कोणताही विकासक देशातील कोठूनही ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आराखडा सादर करू शकतो. टेंगळे यांनी सांगितले की, या ऑनलाइन सुविधेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या योजनेशी संबंधित फाइल कोणत्या विभागात आहे हे पाहता येईल आणि जर त्या फाईलमध्ये काही प्रलंबित कागदपत्रे असतील तर ती तो ऑनलाइन पाठवू शकेल. या सर्व कामांसाठी त्याला कार्यालयात जावे लागणार नाही. केडीएमसी इमारत आराखडे ऑनलाइन सादर करण्यासाठी आणि मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रदान केलेल्या बीपीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करत आहे आणि ते सुरळीतपणे काम करत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी केडीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत विकासक विमल ठक्कर म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे काम सोपे होत आहे. अशा परिस्थितीत, बांधकाम आराखड्याची परवानगी ऑनलाइन असल्याने, आम्हाला आता अधिकाऱ्यांना वारंवार भेटण्यासाठी जावे लागणार नाही आणि आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.” या आँनलाईन परवानगी प्रक्रिया मुळे जलदगतीने तसेच पारदर्शक, परवानगी प्रक्रिया मार्ग मोकळा झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत…

आत्माराम मोरे साखळी कॅरम स्पर्धा

प्रसाद मानेला विजेतेपद   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेने विजेतेपद पटकाविले. दडपण न घेता अचूक सोंगट्या टिपणाऱ्या उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू  प्रसाद मानेने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळेचा सहाव्या निर्णायक सामन्यात १२-४ असा चुरशीचा पराभव केला आणि प्रसादने अजिंक्यपदाला गवसणी घातली. सुरुवातीचे बोर्ड हातचे निसटल्यामुळे प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व सुरेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने तृतीय तर पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला.  महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. पंचाचे कामकाज क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, ओमकार चव्हाण आदींनी केले. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने संपन्न झालेला कॅरमचा शालेय उपक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपाचा होता. खेळाडूंच्या पालकवर्गाने सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने स्तुती केली.

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा

भाजपा राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन मुंबई : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी  बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, प्रकाश जावडेकर, खा. नारायण राणे, खा. अशोक चव्हाण तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्या निकालातून आम्ही बरेच काही शिकलो. त्या नैराश्यातून संघटनेला बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना आखली. पुण्यात झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक आपण जिंकणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत  बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्याचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत राज्यात पक्ष संघटनेतर्फे झालेल्या विविध अभियानांची माहितीही  बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी यावेळी संघटन पर्व अंतर्गत राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश – चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ जानेवारी रोजी ००.०१ वाजल्यापासून  ते  २६ जानेवारी २०२५ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी जिल्ह्यात मकर सक्रांत दिन साजरा केला जाणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी  आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी  बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक

रमेश औताडे मुंबई : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त यांच्या सोबत कामगार प्रतिनिधींची एक महत्वाची बैठक दिल्ली येथे  झाली. या बैठकीत देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन देण्याबाबत लवकरच श्रम मंत्रालयाला केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आहे. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू होईल. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या शिष्टमंडळाची १० जानेवारी २०२५ भेट झाली. कामगार नेते कॉम्रेड मोहन शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, बैजनाथ सिंग या कामगार नेत्यांच्या सोबत दिल्लीचे अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती या बैठकीत उपस्थित होते. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन ” लागू करण्याबाबत देशभरातील सूट दिलेले ट्रस्ट (Examtat trust) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत श्रम मंत्रालय केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होणार आहेत. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत पुढील कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

कल्याण : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलीसांनी उल्हासनगर येथुन अटक केली असून त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हददीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने हे…

बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात- उद्धव ठाकरे

मुंबई : महापौर बंगला ही वास्तू म्हणून आम्ही पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक…