Category: मुंबई

Mumbai news

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी मुंबईकर वापरत असलेले युटीएस ॲप आता बंद होणार आहे. येत्या १ मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे २८ फेब्रुवारीनंतर सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने युटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला. मुंबई लोकलचं तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना रेलवन या ॲप RailOne कडे वळावे लागणार आहे. एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता १ मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ची सुरुवात केली होती. 

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक मुंबई : मुलुंड येथे मेट्रोब्रिजचा भाग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने एक विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो-४ मार्गिकेची सखोल तपासणी करणार आहे.  या पथकाचे नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम करणार असून त्यांच्या सोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहे. त्यांच्या सोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन ९ आणि ५ चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे दहा ते बारा अधिकारी देखील असणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे. त्यांच्या तपासणीचे, साईट विझिटचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या पथकाचे मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आणि ज्या ठिकाणी काही चुकीचे अथवा नियमांचे उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणे आणि योग्य रित्या काम सुरू करून घेणे हे असेल. अशातच, तपासणीच्या वेळी नुकत्याच झालेल्या अपघातासारखे स्लैब, स्लैबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग या आणि अश्या इतर गोष्टी धोकादायक स्थितीत दिसून आल्यास लगेच कारवाई करणे आणि काढून टाकणे, हे देखील या पथकाचे मुख्य काम असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार, या रिपोर्ट मध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्या, त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आले, हे सर्व रिपोर्टमध्ये द्यावे लागणार आहे.

राज्यभरात एटीएसकडून छापे

राज्यभरात एटीएसकडून छापे एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २१ ठिकाणी धाडी  अनेकजणांची चौकशी मुंबई: एन महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात तब्बल २१ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने राज्यभर एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु झाले. या…

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात चिंचवली : वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र येथे ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा…

 अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धा अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक राज्य…

  पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका व बँक ऑफ इंडियाची विजयी घोडदौड!

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धा पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका व बँक ऑफ इंडियाची विजयी घोडदौड! अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा धडाका मुंबई: मुंबईतील खो-खो प्रेमींसाठी सध्या दादरमधील कै.…

  ‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मनीषा शर्मा यांनी स्वीकारला पुरस्कार मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक,…

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  मुंबई : मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला.  आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यायला हवीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करत असतील, तर ते देशात आले कसे? देशाच्या पूर्व टोकापासून दक्षिण-पश्चिम भागापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून ते कसे प्रवास करून पोहोचले? गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असताना हे लोक इतका काळ देशात कसे राहिले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेतील अपयश, गुप्तचर यंत्रणांची चूक की प्रशासनातील त्रुटी आहे का, असा सवाल उपस्थित केला. जर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असेल, तर ती थांबवण्यात आणि संबंधितांना ओळखून देशाबाहेर पाठवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आदित्ययांनी थेट भाजपवर निशाणा साधत, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा राजकीय पातळीवर उचलण्याऐवजी त्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार !

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी  पक्षाचे रिक्त असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसात सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर  चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी निवड…

मुख्यमंत्री दिल्लीत…

मुख्यमंत्री दिल्लीत… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली भेटीत भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.