Category: मुंबई

Mumbai news

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण

रमेश औताडे मुंबई : गेल्या  २९ वर्षांमध्ये ११ हजारहून  अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर ,  दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन त्यांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण ठरलेल्या  संपर्क   या सामाजिक संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे  कौतुक  नुसी  चे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले. संपर्क संस्थेचे लोणावळ्यातील बाल ग्राम पाहून मी भारावून गेले. २९ वर्षापासून (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) SAMPARC  संपर्क   हि संस्था संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी काम करते. संपर्क चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत या भेटी दरम्यान दोन तास घालविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला आनंद आहे असे कांदळगावकर म्हणाले. संपर्क मधील पाच मुलींचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही नूसी NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) च्या माध्यमातून मदत करणार आहे. गोव्यातील प्रतिष्ठित   नुसी  मेरीटाईम अकादमी  मध्ये जी पी रेटिंग प्रशिक्षणासाठी संपर्क संस्थेच्या  पाच तरुणींची निवड केली असल्याचे कांदळगावकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या  शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च   नुसी  संस्था करणार असून  नोकरीची शाश्वती देखील दिली आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत.  वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे  हे चांगले उदाहरण आहे. अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000

करम फाऊंडेशन कडून गरीब,आणि विधवांना मदतीचा हात….

सलमान पठाण मुंबई : 2 जानेवरी रोजी माहीम येथे करम फाउंडेशन कडून गरीब आणि विधवा महिलांना मुफ्त राशन, गरीब मुलांना शाळेसाठी फीस, आजरी रुग्णांना औषधे व त्या साठी आर्थिक मदत , गरीब मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य व विविध योजनांचा लाभ देण्यात आला. करम फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील अधिकृत संस्था असून यांच्यामार्फत माहीम विभागातील व तसेच मुंबई उपनगरातील गरीब आणि विधवा महिलांना गेल्या चार वर्षापासून विविध स्तरावर मदत करत आहे त्यांच्याकडून गरीब मुलींचे लग्नासाठी लागणारे साहित्य आजारी रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च व त्याचबरोबर गरिबांना राशन वाटप इत्यादी प्रकारचे काम वारंवार केले जात आहे या करम फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख सय्यद यांच्यामार्फत हे काम केले जाते आत्तापर्यंत करम फाउंडेशन यांच्यामार्फत 5 हजारच्या वर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे त्याचबरोबर याच्याकडून 15 जोडप्यांचे लग्न लावण्यास मदत करण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात यांनी 1 हजारच्या च्या जवळपास रुग्णांना ऑक्सीजान पुरवठा केलेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत 400 गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य व शालेय फी साठी मदत करण्यात आली आहे. करम फाउंडेशन कधीही हे बघत नाही की मदत घेणारी गरीब व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम आहे जातीय भेदभाव न करता करम फाउंडेशन मदत करते आणि पुढेही भविष्यात करत राहू असे आम्हाला करम फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद फारुख यांनी सांगितले ०००००

 ह्युमॅनिटी स्टील लाईव्हच्या मार्फत अनोखा थर्टी फर्स्ट साजरा

 गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप   कल्याण :  ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे.  सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून  प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता…

काळा तलाव येथे शिवसेना फलकाचे अनावरण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील  प्रभाग क्रमांक 28 काळा तलाव येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांचे पुत्र तथा कल्याण जिल्हा युवासेना सचिव  वैभव भोईर यांच्या हस्ते व शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले, महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे, स्वप्नील मोरे, शाखा प्रमुख धर्मेंद्र भदोरीया, नितीन कदम, रितेश पावले यांच्या उपस्थितीत श्रीराम नगर व शक्ती चौक बेतुरकर पाडा येथे शिवसेना फलकाचे अनावरण  करण्यात आले. तसेच सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी युवासेना, ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या  उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. 0000

महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी दिले.…

बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गृहनिर्मिती एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवनगरसाठी भूसंपादन अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल. ठाणे – बोरिवली २० मिनिटांत ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. 00000

ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात सात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. धर्मवीरनगर येथे एमएमआरडीएच्या इमारती आहेत. या इमारतीजवळील काही वृक्ष तोडल्याबाबतची तक्रार सुमारे २० दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोन सप्तपर्णी, दोन जंगली उंबर, दोन जंगल चेरी आणि एक अज्ञात वृक्ष असे एकूण सात वृक्ष तोडण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले. अधिकाऱ्यांनी याबाबत वृक्षांची लाकूड वाहून नेणाऱ्यांची चौकशी केली असता, चार जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण विभागाने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. याबाबत आता तक्रारी अर्जानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाडांचे संवर्धन आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१), २१ (२), ८ आणि महाराष्‍ट्र मालमत्‍ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

डोंबिवलीतील महानगर गॅसचा पुरवठा दुरुस्तीसाठी ८ जानेवारीला बंद

डोंबिवली : मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार…

परेश ठाकूर यांच्यामुळे मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध होणार

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने नवीन पनवेल मधील गणेश मार्केट जवळील भुखंडावर तात्पुरत्या स्वरूपात मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी या ठिकाणची अधिकाऱ्यांसह पाहणी करुन सूचना दिल्या. नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बस डेपोजवळील भुखंड हा मच्छी मार्केट साठी राखीव असून मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे. तो पर्यंत मच्छी विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणची पनवेल महापालिकेचे माजी सभागृनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. ००००