Category: मुंबई

Mumbai news

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान हा ब्लॉक असेल. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लाॅक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. तसेच खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे…

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न मुंबई: मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

 बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड

बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी BEST, पोलीस वसाहतसह विविध विषय सविस्तरपणे मांडले मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे…

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट…

  चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला

चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला लोकमान्यचा रजाक खान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला मुंबई: चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने सचिन्द्र आयरे फाऊंडेशनच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे…

  जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात

अमर हिंद मंडळात आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय! मुंबई: दादरच्या अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार अक्षरशः शिगेला…

भारतातील  रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन

भारतातील  रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन रमेश औताडे मुंबई : हृदयविकार आणि नसांशी संबंधित आजारांसाठी एकाच गोळीमध्ये अनेक औषधांचे मिश्रण असलेले उपचार आता भारतात होणार आहेत. फ्रान्समधील औषध निर्मिती कंपनी  सर्वियर ने भारतात ‘ गॅटिन ‘ नावाचा एक जागतिक दर्जाचा उपक्रम सुरू करणार आहे. बऱ्याचदा गंभीर आजारांमध्ये रुग्णांना दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. यामुळे औषधे घेण्याचा कंटाळा येतो. “ एक गोळी, अनेक औषधे “ यामुळे रुग्णांना दररोज अनेक गोळ्या घेण्याऐवजी फक्त एकच गोळी घ्यावी लागेल. गॅटिनचे मुख्य ऑफिसर डॉ. क्षितिज पानसे म्हणाले की, आम्ही भारतातील तज्ज्ञ आणि सर्वियरचे जागतिक कौशल्य एकत्र करून रुग्णांना उच्च दर्जाची औषधे कमी वेळात उपलब्ध करून देणार आहोत. कार्यकारी उपाध्यक्ष  शार्लेट मार्मोसेझ यांनी सांगितले की, रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतात हा पहिलाच जागतिक प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तब्बल १३५ कोटी रुपये  ही कंपनी गुंतवणार आहे. ही औषधे भारतात तयार करून आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात केली जातील.

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे,  मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे व सदस्य दिलीप धारकर यांनी नवनिर्वाचित महापौर  रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ व १८ बाबत कल्पना दिली मुंबई मधील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्या बाबत मा महापौर रितू तावडे यांनी सकारात्म प्रतीसाद दिला व लवकरच मिटिंग घेणे बाबत सूचना दिल्या, ज्येष्ठाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल आम्ही आभार व्यक्त केले.

  नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे, तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस मंत्री उदयजी सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिषजी जैसवाल, आमदार दीपकजी केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.