Category: मुंबई

Mumbai news

मनपा अधिकाऱ्यांचे बिल्डरच्या फायदयासाठी रहिवाशांवर दबाव तंत्र

 घरे खाली करण्यासाठी १६४ कर्मचाऱ्यांचे निलंबन मुंबई : मुंबईतील चिंचपोकळी येथील ऑर्थर रोड नाक्यावरील मोक्याच्या ठिकाणी असलेली मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची ब्रिटिश कालीन मेघ नगर वसाहत खाली करण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत व मुंबई हायकोर्टच्या आदेशाचे उल्लंघन करत मनपा वसाहत खाली करण्यासाठी १६४ सफाई कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी निलंबनाची नोटीस धाडून त्यांच्यावर घरे खाली करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून मुंबई महानगरपालिकेचा १७५०० स्क्वेअर मीटरचा भूखंड खाजगी बिल्डरच्या घशात घातला आहे. यासाठी विकासबरोबर मागच्या दाराने हात मिळवणे करून सफाई कामगारांनी घरे खाली करण्यासाठी त्यांच्यावर निलंबनाची जुलमी कारवाई करून बिल्डरच्या फायद्यासाठी जागा खाली करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण भूखंड खाजगी विकासकाच्या हाती सोपवण्याचे काम पद्धतशीरपणे केल आहे. यामागे महानगरपालिका मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते मुंबई सेंट्रल इथल्या सेवा निवस्थान अधिकाऱ्यांना भूखंड खाली करून देण्यासाठी बिल्डरकडन मोठी रक्कम मिळाल्याचा आरोप मेघ नगर इथल्या रहिवाशांनी केला आहे. मेघ नगर वसाहतीच्या जागी उभ्या राहणाऱ्या टॉवर मधली घर कशी असणार त्याचा मेंटेनन्स किती रुपये येणार . घरे कायम स्वरुपी मिळणार का ? सेवेत राहणार तोपर्यंत असे एक ना अनेक प्रश्नन सफाई कर्मचाऱ्यांना भेडसावत होते. महानगरपालिका अधिकारी पुनर्विकासाबाबत तोंडी बोलून मात्र लेखी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. योग्य माहिती मिळत नसल्याने मेघ नगर इथल्या सफाई कामगारांनी पुनर्विकासाला विरोध दर्शवला होता. अशी माहिती मेघ नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी चेतन सोलंकी यांनी दिली नाना चौक येथील पूर्व मुख्य पर्यवेक्षक जयवंत पराड व मुंबई सेंट्रल येथील सेवानिवस्थान महिला  अधिकारी अनु राणे यांनी बळजबरीने १६४ कर्मचाऱ्यांनवर निलंबनाची कारवाई करण्याचा फतवा काढत सफाई कामगारांमध्ये दहशत माजवली होती. नोकरी जाऊन कुटुंब देशोधडीला लागू नये या करता एक एक करत अनेक सफाई कामगारांनी घरे खाली करण्यास सुरुवात केली होती. कारवाई थांबवण्यासाठी मेघ नगर  रहिवाशांनी आमदार खासदार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील धाव घेतली होती. परंतु पत्र व्यवहारा शिवाय लोकप्रतिनिधी कोणतेच काम केले नाही व स्वतःचे खिसे बिल्डर कडन भरून घेतल्याचा आरोप मेघ नगर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मेघ नगर वसाहतीचा भूखंड १७५०० स्क्वेअर मीटरचा असल्यामुळे यातून बिल्डरला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे स्थानिक सफाई कामगारांनी देखील मोठी व कायमस्वरूपी घरांची  मागणी  महानगरपालिकेकडे केली होती. परंतु महानगरपालिका अधिकाऱ्यांनी स्वतःचा भूखंड खाजगी विकासकाला देण्याचे कट कारस्थान बिल्डर बरोबर आधीच रचले होते खाजगी विकासकाचा भूखंड अवघा ६ हजार स्क्वेअर मीटरचा असताना देखील मेघ नगर वसाहतीचा १७५०० स्क्वेअर मीटरचा मोठा भूखंड बिल्डरच्या घशात घालून पालिका अधिकाऱ्यांनी स्वतःबरोबर बिल्डरचेही नशीब फळफळवून टाकल्याचा आरोप मेघ नगर सोसायटीचे प्रमुख देवेंद्र मकवाना यांनी कागद पत्राच्या माध्यमातून केला आहे. एवढा मोठ्या भूखंडाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या टॉवर मध्ये मेघ नगर वसाहतीतील रहिवाशांना फक्त ३०० फुटांची घरे मिळणार आहेत. ह्या भूखंडावर मुंबई महानगरपालिकेने स्वतः पुनर्विकास राबवून सफाई कामगारांसाठी एक इमारत बांधून उरलेल्या जागेत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी इमारत बांधली असती तर मुंबई बाहेरून भरती झालेल्या मनपा अधिकाऱ्यांचा घरांचा प्रश्न कायमचा सुटला असता. परंतु तसे न करता मेघ नगरचा संपूर्ण भूखंड भागीदारी तत्त्वावर बिल्डरच्या घशात घालून महानगरपालिकेचे नुकसान करून स्वतःबरोबर बिल्डरचा मात्र करोडो रुपयांचा फायदा मनपा अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. मेघ नगर वसाहत भूखंडावर ३२१ सफाई कामगारांची कुटुंबे तर बाजूच्या १४४ टेनामेंट इमारतीत ७०/८० चतुर्थश्रेणी कामगार राहत होते. २००७ साली मेघनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीने मालमत्ता विभागाकडे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रस्ताव सादर केला होता. त्या वेळचे मंत्री रंजीत देशमुख यांनी देखील प्रस्ताव पाठवत अतिरिक्त आयुक्त शहर आर ए राजीव यांच्यासोबत मेघ नगर सोसायटीची बैठक आयोजित केली होती. २०१७ सालापर्यंत पुनर्विकास प्रक्रिया सुरू होती. पन्नास हजार रुपये स्क्रूटीनी शुल्क भरायचे राहिले होते त्या दरम्यान देशभरात करोनाने हाहाकार माजवला होता त्याच बरोबर मेघ नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आर्किटेक एम जी दळवी यांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रिया काही काळ खोळंबली होती. त्याचा फायदा घेत खाजगी विकासाकांनी डाव साधला. सेवा निवासस्थान अधिकारी अनु राणे विकासकाला सोबत घेऊन पुनर्विकासा संदर्भात बोलण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस मेघ नगर रहिवासी आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये मध्ये भांडण झाले होते. त्यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता नगर विकास खाते आणि मुंबई महानगरपालिकेच्या हाय पवार कमिटीने मेघ नगर रहिवाशी हाऊसिंग सोसायटीने आणलेला विकासक अमान्य करत असल्याचे पत्र धाडून परस्पर दुसऱ्या विकासकाला परवानगी देण्यात आल्याचे जाहीर करून रहिवाशांना मोठा धक्का दिला होता. मेघ नगर परिसराची पाहणी व माहिती न घेताच अशा प्रकारे अनोळखी विकासकाला प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे सर्व रहिवासी हतबल झाले होते असे स्थानिक रहिवासी मोहन पटेल ह्यांनी सांगितले. मेघ नगर सफाई कर्मचाऱ्यांची घरे खाली  करण्यासाठी सेवा  निवासस्थान अधिकाऱ्यांने या वसाहतीत राहणाऱ्या १६४ सफाई कामगारांना तडकाफडकी निलंबनाची नोटीस बजावली होती. यामुळे संपूर्ण मेघ नगर वसाहतीत हा हा कार मजला होता. मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी आश्रय योजना सुरू करण्यात आल्यापासून गोरगरीब सफाई कामगारांना घरे खाली करण्यासाठी निलंबिलंबनाच्या कारवाईची नोटीस देऊन त्यांचा मानसिक छळ केला जात आहे परंतु मेघ नगरचा भूखंडाचे श्रीखंड खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून जबरदस्तीने निलंबनाची व पोलिसी कारवाई करण्यात आल्याचा आरोप मेघ नगर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनावर केला आहे. बिल्डरशी संगनमत करून जोर जबरदस्तीने घरे खाली करण्यास भाग पाडणाऱ्या सेवानिवस्थान खात्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत करण्याची मागणी मेघ नगर वसाहतीतील रहिवाशांनी केली आहे. जोपर्यंत आम्हाला या मिळत नाही तोपर्यंत आम्ही संबंधित खात्याकडे पत्र व्यवहार करत राहणार आहे. तसेच लवकरच आम्ही आझाद मध्ये मोठ्या संख्येने रहिवाशांना घेऊन जाहीर बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती मेघ नगर सोसायटीचे प्रमुख देवेंद्र मकवाना यांनी दिली. 0000

श्रद्धा संकल्प गणेशाची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल!

मुंबई : गोरेगाव ( पूर्व ) येथिल  संकल्प संकुलातील, श्रद्धा संकल्प गणेशोत्सावाचे हे २१ वे वर्ष असून मंडळ रोप्य महोत्सवी वर्षा कडे वाटचाल करीत आहे. या वर्षीची मनमोहक गणेश मूर्ती, मूर्तिकार -समित मोघे यांनी साकारली असून सजावट कु. रजनी लांजेकर हिने केली आहे. गणेश उत्सव पाच दिवसाचा असून, उत्सव कालावधित, भजन, महिलांची पंचारती, विविध करमणूकीचे  कार्यक्रम, पारंपरिक मंगळागौर,  महाआरती, महाप्रसाद आदीचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वर्षीचे – सुनिल गोरड, चंद्रकांत माने,  दिलीप मोहिते, राहुल गांगुर्डे, आनंद सिहं, अशोक बाटे, नितीन गायकवाड, किरण इलग, प्रिया घटवाई, समीर कर्णिक, व अनंत निटुरे पदाधिकारी आहे. 000

श्रीकांत चषक जिंकण्यासाठी ४८ ज्युनियर कॅरमपटूमध्ये चुरस

मुंबई : श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये १४ सप्टेंबर रोजी कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १८ वर्षाखालील…

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये शतकीय संघांचा उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई : महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने…

बोरीवलीच्या संजर शिंदे याची जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड

 गणेशोत्सव मंडळाने केला सत्कार मुंबई :  बोरिवली विभागातील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रमोद शिंदे यांचे चिरंजीव कुमार संजर शिंदे याची युरोपमधील जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झाली आहे. संजर शिंदे यांच्या निवडीबद्दल या भागात प्रचंड प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत असून अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) या मंडळाच्या वतीने कुमार संजर शिंदे याचा संस्थेच्या वतीने गौरव करून त्यास पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतातून पाच मुलांची निवड झालेली आहे. कुमार संजर शिंदे याचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, सिनेट सदस्य मिलिंद साटम तसेच शाखा समन्वयक योगेश देसाई हे उपस्थित होते. संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कुमार संजर शिंदे यास भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुलूपवाडी बोरिवली पूर्व या मंडळाचे पदाधिकारी राजू गीते यांनी केले. 0000

मोबाईल सोडा, मैदानावर या ; सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीतून दिल्या कानपिचक्या

मुंबई :  आजकाल मोबाईल गेमच्या विळख्यात तरुणांपासून ते लहान मुले अडकली आहेत त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तरुणांनी व लहान मुलांनी मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावे व एक धाव आरोग्यासाठी असा…

sमुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

 आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार, १३ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.  शुक्रवार १३ सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे. परिक्षण व पारितोषिके विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात पारितोषिक तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन/ पुस्तक मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळावी व वाचनास प्रोत्साहित करावे या उद्देशाने यावर्षी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ प्रदर्शन / पुस्तक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यात त्या-त्या जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी ग्रंथालयांना तसेच विविध प्रकाशकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती आर.विमला यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’

मुंबई : व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण…

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत

मुंबई : शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.…

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी केली नमुंमपाच्या स्वच्छताविषयक कामाची प्रशंसा

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता कामांची तसेच  स्वच्छतामित्र व सफाईमित्र यांच्यासाठी महानगरपालिका…