Category: मुंबई

Mumbai news

नराधम आरोपीला फाशीच होणार-चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबासह पोलिसांची घेतली भेट   कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ, आमदार सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष…

अटलबिहारी वाजपेयींनी राजकारणात घालून दिलेले आदर्श विसरता येणार नाही *

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन   राजेंद्र साळसकर मुंबई : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी जीवनाची वाटचाल ध्येय्याप्रती, मुल्यांप्रती, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय…

पं. भातखंडे संगीत सभेचे ५ जानेवारीला आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य. वि. भातखंडे पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित केली आहे. या सभेत रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता…

अरविंद केजरीवाल देशद्रोही- अजय माकन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीम्हणून एकत्र लढलेले आप आणि काँग्रेसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने शा‍ब्दिक चकमक पहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे…

राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व…

विकृत विशालला गुन्ह्यात पत्नीसह मित्राने दिली साथ कल्याण अल्वयीन मुलीवरील अत्याचार

कल्याण – कल्याण पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या विकृत विशाल गवळीला या गुन्ह्यात त्याची पत्नी आणि मित्रानेही साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक…

मुंबई पोर्ट ट्रस्टची कामगार महिला उपासमारीने मेली माणूसकीला काळीमा फासणारी घटना रमेश औताडे

मुंबई : मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या कामगारामधील एक…

कुख्यात गुंड विशाल गवळीसह पत्नी साक्षीलाही अटक

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगावात निर्जनस्थळी देऊन हत्या करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर 24 तास उलटून जात…

जे.जे. रुग्णालयात नववर्षापासून यंत्रमानव करणार शस्त्रक्रिया

 डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना दिले जातेय प्रशिक्षण मुंबई : जे.जे. रुग्णालयत येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज व सुलभ पद्धतीने पार पाडव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर केला जात आहे. खासगी रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. यंत्रमानवाच्या मदतीने अचूक आणि सखोल पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. मात्र या पद्धतीची शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणारी नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ व्हावा यासाठी जे.जे. रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानव आणण्यात आला आहे. या यंत्रमानवाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका या प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये सध्या डॉक्टर व तंत्रज्ञांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी रुग्णाालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात येत आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याबरोबरच यंत्रमानवाच्या वापरासाठी उभारण्यात येत असलेले स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे प्रशिक्षण व काही तांत्रिक कामे पूर्ण होताच जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात होणार आहे. यंत्रमानवाच्या मदतीने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्त्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, अशी माहिती शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. कशी होते यंत्रमानवाची मदत प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यंत्रमानवामध्ये असलेले कॅमेरे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दाखवतो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते. यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपये खर्च जे.जे.रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना अद्ययावत व यंत्रमानवाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा लाभ व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर.

मुंबई: पिंपरी-चिंचवड विरुध्द पालघर, यजमान सांगली विरुध्द उस्मानाबाद या कुमारी गटाच्या उद्घाटनीय सामन्या बरोबरच अन्य चार सामन्याने सांगलवाडी, सांगली येथील ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ…