Category: मुंबई

Mumbai news

 सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

 ७ सप्टेंबरपासून तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० असणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ कि.मी. आणि २ ते ४ कि.मी. करिता रु. १०, पुढील ४ ते ६ कि.मी. आणि ६ ते ८ कि.मी. करिता रु. २० आणि ८ ते १० कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रु. ३०, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. ४० इतका होता. हा तिकीट दर आता रु. ३० असणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे. कोट “जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ घ्यावा.” श्री. विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

 घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास

 पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ इमारतींची उभारणी मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १४ हजारांहून अधिक रहिवाशांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा- 2024’ आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करुन समाजामध्ये एकात्मता आणि सामाजिक सलोखावृध्दी ही उद्दिष्ट्ये साध्य होण्यासाठी तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व प्रसारित होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास…

५५ कोटी खर्चून होणार हायवेवर मीरा भाईंदर हद्दीत ३ भुयारी मार्ग व एक पादचारी पूल – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवर मीरा भाईंदरच्या हद्दीत ३ भुयारी मार्ग म्हणजेच वाहनांचा अंडरपासची कामे व एका फूटओव्हरब्रीजच्या मंजूर झाली असून सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करून…

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

शांती, समता व अहिंसा यांची शिकवण देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन…

महायुतीचे कायदा सुव्यवस्थेपेक्षा पैसा वसुलीवर लक्ष – चेन्नीथला

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व…

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा – मुख्यमंत्री

मुंबई : मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.…

‘लाडकी बहीण योजने’वरून अजितदादा-शिंदे गटात जुंपली

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहिर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. निमित्त झालेय ते या योजनेवरील जाहिरातीमुळे. राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द…

शेतकऱ्यांनो, सरकारच्या छाताडावर बसून भरपाई घेऊ- मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना): “शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई या सरकारच्या छाताडावर बसून घेऊ.” असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

महाविकास आघाडीत दोन विरुध्द एक

स्वाती घोसाळकर मुंबई : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे असे चित्र दर्शविले जात असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. सध्यातरी महायुतीत दोन विरुध्द एक अशी स्थिती आहे. कालपरवापर्यंत मुख्यमंत्री निवडीपरून ठाकरे…