Category: मुंबई

Mumbai news

एसटीचा संप मागे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला साडेसहा हजार रुपयांची पगारवाढीची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यानंतर…

आता ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन – बाजीराव भैय्या धर्माधिकारी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात…

 झोपडपट्टीमुक्त मुंबई हेच आमचे स्वप्न-मुख्यमंत्री

 रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत रहिवाशांना धनादेशाचे वाटप   मुंबई : आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईचा विकास केला जात आहे. मुंबईला जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे आहे. हे…

 एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!   मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव जवळ आलेला असताना मंगळवारपासून बेमुदत धरणे…

 ई सेवा संगणक प्रणालीव्दारे त्वरित व विनाशुल्क मंडप परवानगी

गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केले समाधान   नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक साजरा व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने इकोफ्रेंडली…

 ठाकरे गट, ‘अभाविप’विरोधात अपक्षांची एकजूट

 मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मुंबई : मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी मतांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप यांना टक्कर देण्यासाठी छात्रभारती, बहुजन विकास आघाडी (वसई) आणि इतर अपक्षांनी वेगळे एक ‘पॅनल’ करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण २८ उमेदवारांपैकी प्रत्येकी १० उमेदवार हे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप या संघटनांचे आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे १, मनसेचे १ राज्य सचिव आणि २ जणांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांना टक्कर देण्यासाठी छात्र भारती, बहुजन विकास आघाडी आणि उर्वरित अपक्षांनी कंबर कसलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन संघटना नेमका कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘अधिसभा निवडणुकीत पसंतीक्रमाला महत्त्व असते. त्यामुळे सर्व अपक्षांना एकत्र करून एक नवीन ‘पॅनल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी सनील मोसेकर म्हणाले, ‘छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांची युती जवळपास निश्चित असून अपक्षांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करू.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘अधिसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे आणि सर्व पर्याय खुले आहेत’. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा प्रचार प्रारंभ; वचननामा प्रसिद्ध ठाकरे गटाच्या युवा सेनेने अधिसभा निवडणुकीत २०१० साली १० पैकी ८ आणि २०१८ साली सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युवा सेनेने अधिसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचे प्रकाशन करून प्रचाराला सुरुवात केली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी…

गणेशोत्सवात काळात अवजड वाहने बंद करण्याची एआयएमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा नको म्हणून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात येत होती. मात्र यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही अवजड वाहतूक…

मुंबईतील मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा भाजपा युती सरकारचा कुटील डाव –  वर्षा गायकवाड

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील  मिठागराच्या सर्व जमिनी सरकार…

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५ च्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…