Category: मुंबई

Mumbai news

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जप्त होणार!

मुंबई : १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करुन पोलिसांनी ताब्यात घ्यावे, असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. या शिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही…

 घनकचरा संकलन व विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईकरांवर अवाजवी आर्थिक भार कशासाठी?

 वर्षा गायकवाड यांचा सवाल   मुंबई : मुंबई महापालिकेत लोकनियुक्त सरकार नसताना भाजपा युती सरकार प्रशासकामार्फत महापालिकेची तिजोरी आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी रिकामे करत आहे. भ्रष्ट भाजपा युती सरकार यावर कहर करत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘युजर फी’च्या नावाखाली मुंबईकरांवर नवीन आर्थिक भार टाकण्याचा प्रस्ताव आणत आहे. कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावणे हे मुंबई महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य असताना मुंबईकरांवर हा अवाजवी आर्थिक भार का लादता? असा प्रश्न विचारुन काँग्रेसचा अशा कोणत्याही प्रस्तावाला ठाम विरोध आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदीनिर्मित महागाई आणि दरवाढीने मुंबईकर आधीच भरडला जात आहे. खाद्यतेल, किराणासह सर्व जिवनावश्यक वस्तू सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीएसटी सारख्या गब्बरसिंग टॅक्सने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांच्या माथी आणखी आर्थिक बोजा पडला तर त्यांना ते परवडणारे नाही. कचरा संकलनासाठी नागरिकांवर अवाजवी भार लावण्याऐवजी मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदारप्रेमी भाजपा युती सरकारने व्यवस्थित घनकचरा व्यवस्थापन करण्यावर आधी लक्ष केंद्रीत करावे, असेही खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या. ०००००

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद

 लघुवाद न्यायालयात २१ प्रकरणे निकाली   मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल राणे आणि आर. के. कुळकर्णी तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.

वरळीच्या पूनम चेंबरमध्ये आग

मुंबई : वरळीतील पूनम चेंबरमध्ये रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. सात मजली व्यवसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. वरळीतील ऍनि बेझन्ट मार्गावर ऍट्रिया मॉलच्या समोर असलेल्या पूनम…

आरोग्य विभागाने केल्या वर्षभरात १,५८४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

मुंबई : शहापूर तालुक्यातील दुर्गम गावातील अंगणवाडीत लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना सचिन कंजारा या तीन वर्षाच्या मुलाच्या ह्रदयाच्या ठोक्यात गडबड असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. या मुलाला ठाण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये…

‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ग्रंथाली प्रकाशन आणि एनसीपीएच्या संयुक्त विद्यमाने माजी सहजिल्हा निबंधक तसेच लेखक धनराज खरटमल यांच्या ‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या…

 दिल्लीच्या पथकाने आरोग्य शिबिराला दिली भेट

 राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले जात असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू आजारांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. आज राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, दिल्ली यांच्या संचालक डॉ. तनु जैन यांनी माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे भेट दिली असता हिवताप व डेंग्यू नियंत्रणाबाबत उपाययोजनांची पाहणी केली.  त्यांच्यासोबत त्यांचे पथक आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा, पुणे सहसंचालक डॉ. बबीता कमलापूकर, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर तसेच सहाय्यक संचालक, कोकण भवन डॉ. बाळासाहेब सोनावणे  उपस्थित होते. केंद्रीय पथकाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरानगर येथील आजच्या जनजागृती शिबिराला भेट दिली.   शिबिरामध्ये घरातील व घराभोवतालील डासोत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिके बघून या नाविन्यपूर्ण शिबिराची प्रशंसा केली आणि देशातील इतर राज्यातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन व्हावे या उद्देशाने  त्याचे पूर्ण व्हिडीओ शूटिंग  काढून घेतले. याप्रमाणे नमुंमपा कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरिकांपर्यंत पोहचून जनजागृती करण्याकरिता 13 डिसेंबरला 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 9983 नागरिकांनी भेट दिली असून, 1040 रक्तनमुने घेण्यात आले. नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता दिनांक 03/08/2024 ते दिनांक 13/12/2024 या कालावधीत एकुण 342 जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून 149826 नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये एकूण 13814 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय गणेशोत्सव कालावधी, नवरात्रौत्सव कालावधी व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात येते. सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरीकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात येते. तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. ०००००

कल्याणमधील कपोते वाहनतळावर पालिकेचा ताबा;

भाडे थकविल्याने ठेकेदार काळ्या यादीत   कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने १ कोटी ८८ लाख ११ हजार १६८ रूपयांचे भाडे पालिकेकडे जमा केले नव्हते. ही…

विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचाही अजून प्रस्ताव नाही : राहुल नार्वेकर

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष…

घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी ‘महारेरा’कडून निवृत्त तहसीलदार!

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या आदेशाची वसुली करण्यासाठी आतापर्यंत निवृत्त महसूल अधिकाऱ्याची मदत घेतली जात होती. आता ४०० कोटींची थकबाकी असलेल्या मुंबई उपनगर व…