Category: मुंबई

Mumbai news

अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर ते दिघा विभागापर्यंत जप्तीची करवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर पासून दिघा विभागापर्यंत रस्त्याच्या कडेला व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या, PUC गाड्या, खादय पदार्थ टेम्पो, पान टपरी, वडा…

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चा पाठिंबा

मुंबई: बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये दोन लहान विद्यार्थींनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. उपेंद्रजी शेंडे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन…

शासकीय कर्मचाऱ्यांचा २९ ऑगस्टपासून बेमुदत संप      

जुनी पेन्शन आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गतवर्षी मार्च आणि डिसेंबर मध्ये दोन वेळा बेमुदत संप पुकारला होता. राज्यातील १७ लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षक या संपात संपूर्णत: सहभागी झाले होते. या संपाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनचे बहुतांश लाभ देय असलेली सुधारीत पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतची कार्यवाही झाली नाही. तदनंतर संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत सुधारीत पेन्शन योजनेची अधिसूचना अथवा शासन निर्णय पारीत करण्यात आलेला नाही. या दिरंगाईमुळे राज्यातील ८ लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.  नजिकच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने कर्मचारी आणि शिक्षकांच्या चिंतेत भरच पडली आहे. याबरोबरच कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करुन सदर कामगारांना सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत. अनुकंपा भरतीला प्राधान्य द्यावे, वेतनत्रुटींचे निराकरण व्हावे, केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे उपदानात महागाई भत्ता मिळावा, पेन्शन विक्री पुनर्स्थापना १२ वर्षांची करावी.चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक भरती पुर्ववत करावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रोखलेल्या पदोन्नत्या पुन्हा सुरू कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे.महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बालसंगोपन रजा मिळावी आदी मागण्यांसाठी दिनांक १२ ऑगस्ट रोजी मा मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रालयासह सर्व शासकीय रुग्णालये , RTO, शासकीय मुद्रणालय, वस्तू व सेवा कर विभाग आणि अन्य शासकीय कार्यालयात संपाची जोरदार तयारी सुरू असल्याचेही अविनाश दौंड यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने या निदर्शनांची दखल घेऊन तातडीने पेन्शन बाबतची अधिसूचना काढावी तसेच अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा  बेमुदत संप अटळ आहे असा इशारा अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिला आहे

 अकरावी प्रवेश- तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

 ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय   मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख १८ हजार ९३९ जागांसाठी १७ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ हजार १४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ४ हजार ३४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ९२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नामांकित व आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्याची काही विद्यार्थ्यांची संधी हुकली. तसेच दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत वाणिज्य शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) स्थिर असून १ ते २ टक्क्यांनी किंचितशी घट झाली आहे. तसेच काही महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट, तर काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत तीनही विशेष फेरींच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळत असून अकरावीच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८७.८ टक्के, के. सी. महाविद्यालयात कला शाखेसाठी ५२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७०.६ टक्के, जय हिंद महाविद्यालयात कला शाखेसाठी ७१.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७१.२ टक्के, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८६.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.६ टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७९.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.०० टक्के, रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८४.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८४.४ टक्के, शीव येथील एसआयईएस वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८१.४ टक्के, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७१.२ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८५.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८१.८ टक्के, मिठीबाई महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी ७६.८ टक्के, एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९२.०० टक्के प्रवेश पात्रता गुण असतील. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा. 000000

‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास

मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या…

जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाची मान्यता

मुंबई : दक्षिण मुंबईतील जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भातील पत्रक १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले आहे.…

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणार

तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम   मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र स्थापन करण्याचा…

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा   मुंबई : बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर…

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा जयंतीदिन हा देशभरात सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयात कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ना. रामदास आठवलेंसह इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची केली पाहणी

अशोक गायकवाड   मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह मंगळवारी (दि. २०) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण…