Category: मुंबई

Mumbai news

झाडांवरील जाहिरात तसेच रोषणाई प्रतिबंधाबाबत उद्यान विभागाचे जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तथापि, काही व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने रस्त्याकडील झाडांना खिळे…

जुडो चॅम्पियन लीग स्पर्धा शिवनेरी किंग संघाची बाजी

मुंबई : नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल जी डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो…

बीओबी १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविनने जोविनला चकविले

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविन पलायुरने (४.५ गुण) सरस सरासरीच्या बळावर त्याचाच भाऊ जोविन…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४ (प्रतिनिधी/वार्ताहर) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट…

सरकारच्या खोट्या आश्वासना विरोधात अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील एक लाख १५ हजार अंगणवाडी केंद्रातील सेविकांना व मदतनीस यांना सरकारने ५ हजार रुपये वाढीव देण्याचे आश्वासन मागील अधिवेशन काळात दिले होते. मात्र त्याची…

रिक्षावाले मुख्यमंत्री आमच्या समस्यांकडे कधी पाहणार रिक्षा चालकांचा सवाल

रमेश औताडे   मुंबई :मुख्यमंत्री एके काळी रिक्षा चालवायचे. त्यांना रिक्षा चालकांच्या समस्या सांगायची गरज नसताना आजही रिक्षा चालक अनेक संकटांचा सामना करत आहेत. लाडकी बहिण असो की लाडका भाऊ…

‘लहुजी क्रांती मोर्चा’ चा वर्धापन दिन

रमेश औताडे   मुंबई : सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती व “यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है” या ऐतिहासिक घोष वाक्याला ७७ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त १६ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.) मुंबई येथे लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मधुकर गायकवाड (अधीक्षक व पथकप्रमुख, मेडीसिन विभाग, जे जे हॉस्पिटल, मुंबई) तर  प्रा. डी. आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव – बामसेफ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड शेल्हाळकर, दीपक लोंढे, प्रा .पी. बी. लोखंडे,प्रा.डी.आर. कसाब व वरिष्ठ मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती लहुजी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य संयोजन समितीचे प्रदेशाध्यक्ष नितीन कांबळे व प्रा.विकास पाथरीकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ०००००

 म्हाडाचा अजब कारभार!

घराचा ताबा २०२३ मध्ये, पण देखभाल शुल्क २०१४ पासूनचे     मुंबई : सोडतील विजेत्यांना घराचा ताबा देताना म्हाडा एका वर्षाचे देखभाल शुल्क आकारते. मात्र एका विजेताला २०२३ मध्ये घराचा ताबा मिळालेला असताना त्याच्याकडून २०१४ पासूनचे चक्क १० वर्षांचे देखभाल शुल्क वसूल करण्याचा घाट म्हाडाने घातला आहे. म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या सुनावणीत ही बाब समोर आली. संबंधित विजेत्याने आपली ही व्यथा लोकशाही दिनी मांडली असून यावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच मुंबई मंडळाकडून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार वांद्रे येथील म्हाडा भवनात महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हाडाकडून लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनी महाडा रहिवाशी आणि सर्वसामान्यांच्या म्हाडाची संबंधित तक्रारी समस्या जाणून घेतल्या जातात. या तक्रारी समस्यांचे निराकरण महाडा उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांच्याकडून करण्यात येते. त्यानुसार सोमवारी महाडात लोकशाही दिन पार पडला. या लोकशाही दिनी नऊ अर्जांवर जयस्वाल यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत एका विजेत्याकडून एका वर्षाऐवजी १० वर्षांचे थकीत देखभाल शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. महाडाच्या नियमानुसार घराचा ताबा देताना एका वर्षाचे आगाऊ सेवाशुल्क आकारले जाते. असे असताना एका विजेत्याला १० वर्षापासूनचे थकित देखभाल शुल्क आकारण्यात आले आहे. यासंबंधीची अर्जदार हिरेन मेहता यांनी म्हाडाकडे लोकशाही दिनी अर्जाद्वारे तक्रार केली होती. हिरेन मेहता हे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१४ च्या सोडतील प्रतीक्षा यादीतील विजेते आहेत. दहिसर येथील नक्षत्र सहकारी संस्थेतील घरासाठी ते विजेते ठरले आहेत. प्रतीक्षा यादी कार्यान्वित होऊन मेहता यांना २०२३ मध्ये घराचा ताबा देण्यात आला. मेहता यांना २०२३ पासून पुढील एका वर्षाचे देखभाल शुल्क आकारणे क्रमप्राप्त होते. मात्र अधिकाऱ्यांनी या विजेत्याला १० वर्षाचे देखभाल शुल्क आकारले. ही शुल्क आकारणी अयोग्य असल्याची तक्रार मेहता यांनी सोमवारी लोकशाही दिनी जयस्वाल यांच्यासमोर मांडली. तसेच थकीत शुल्काची रक्कम माफ करण्याची मागणी केली. त्यानुसार जयस्वाल यांनी मेहता यांच्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करत निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत आपल्याकडे सादर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हिरेन मेहता यांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच जयस्वाल यांनी देखभाल शुल्क संदर्भात अशा आणखी काही तक्रारी आहेत का याचा शोध घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच या तक्रारींचेही तात्काळ निवारण करण्याचे निर्देश दिले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सर्वसामान्यांना म्हाडाच्या कार्यालयात खेटे घालावे लागू नये असे काम करा अशा शब्दात जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 00000

 मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’

४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण     मुंबई : मराठा  आरक्षण सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक कामासाठी मुंबई पालिकेचा  कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत होता. आता विधानसभा आणि नंतर मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीही पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाची सेवा करावी लागणार आहे. आधीच पालिकेत नवी भरती नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.  लिपिक संवर्गातील कर्मचारी तर पिचून गेले आहेत. या संवर्गात ४१ टक्के पदे अजून भरलेलीच नाहीत. पालिकेच्या आस्थापनेवर लिपिक संवर्गाची एकूण ५,५६० पदे आहेत. त्यातील फक्त ३,३०० पदे कार्यरत आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त ५९ टक्के  पदे भरली  आहेत. २,२६० पदे रिक्त आहेत. एकूण पदांच्या तुलनेत ४१ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. कर्मचाऱ्यांचे आस्थापनाविषयक प्रश्न, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे देय दावे निकाली काढणे, नागरी सेवा देण्यास विलंब होत आहे. हे कर्मचारी मानसिक तणावाखाली कर्तव्य पार पाडत आहेत, अशी तक्रार दी म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे. फक्त ८०० कर्मचारी पात्र १) कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २४ मे २०२३  रोजी  परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार निम्न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून निवड पद्धतीने एकूण १,१७८ पदे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण राखून भरण्याचा निर्णय घेतला. २) १२ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार परीक्षा घेतली.  परिपत्रकामध्ये नमूद अटीनुसार ८०० कर्मचारी पात्र ठरवून त्यांची कार्यकारी सहायक पदावर नियुक्ती केली आहे. गुणांमध्ये शिथिलता आणा १) परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक  (१२) ११ मधील निकषांनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार आयुक्तांना  राहतील, असे नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी निवडीचे निकष शिथिल करावेत. उत्तीर्णतेसाठीची ४५ टक्के  गुणांमध्ये शिथिलता आणून कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी युनियनने केली आहे. 00000

 नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीचे छापे

ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी प्रकरण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त     मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते यांच्यासह संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे असे एकूण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात १६८ कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने याप्रकरणात ९ ऑगस्ट रोजी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले. ईडीने या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणत त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यात आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार, गुंतवणूकदारांसह झालेल्या फसवणुकीची अंदाजित रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे. 0000