नवी मुंबई महानगरपालिका जाहिर शिबिरांचा नागरीकांनी घेतला लाभ
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप /डेंग्यु आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर सभांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.…
अ.भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात (हेडिंग)
१९ ते २२ डिसेंबर भरगच्च कार्यक्रम, साहित्य संमेलनही होणार मुंबई : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन १९ ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार आहे .दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस हा सोहळा होणार असून श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट संस्थेने त्याची जय्यत तयारी केली आहे. देशभरातील असंख्य दैवज्ञ बांधव या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनही पुण्यनगरीत रंगणार आहे. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन व दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा गुरूवारी १९ ते रविवारी २२ डिसेंबरपर्यंत पुण्यातील शुक्रवार पेठ येथील गणेश कला क्रीडा मैदानावर होणार आहे. गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. पद्माकरराव पांडुरंगपंत रत्नपारखी व स्व. सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी १० वाजता केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह डॉ. गजानन रत्नपारखी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवाद रंगणार शनिवारी सामाजिक कार्यात युवांची वानवा, ज्ञातीपत्रके व समाजप्रबोधन, कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग, वधु-वर मेळाव्यातील आजची वास्तविकता, कवीसंमेलन आदी परिसंवाद होणार आहेत. याचवेळी दुपारी दुपारी ३ वाजता दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्य, नाट्य, ग्रंथ हंडी व कार्यकर्ता गौरव रविवारी २२ डिसेंबर रोजी संत साहित्य, प्रेरणादायी आत्मचरित्र, पत्रकारिता आणि साहित्य, नाट्य व साहित्य, ग्रंथ हंडी आदींवर मान्यवर लेखक, साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी दैवज्ञ साहित्य मंच पदाधिकारी, यजमान संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून दुपारी तीन वाजता या चार दिवसीय अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजय कारेकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली.
नागरी सुविधा कामांच्या निविदांसाठी तांत्रिक समिती स्थापन
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्ते, पदपथ, गटारे, इमारती, नाले तसेच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत अशी विविध प्रकारची नागरी सुविधा कामे करतांना अर्थसंकल्पातील संबधित लेखाशिर्षांतर्गत तरतूदी अन्वये तांत्रिक…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निरंजन डावखरेंचे अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले. तसेच…
मुंबईतील तापमानाचा पारा वाढला
मुंबई : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानात अवघ्या तीन दिवसांत ७.७ अंशानी वाढ…
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या सर्वांना उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले…
उपोषण होणार म्हणजे होणारच!- मनोज जरांगे
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत…
फडणवीस ! फडणवीस !! फडणवीस!!!
महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदासाठी आज शपथविधी ! मुंबई – फडणवीस ! फडणवीस !! फडणवीस!!! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे. यापुर्वी केवळ शरद पवार यांनाच तिनदा मुख्यमंत्री होता आले आहे. अनेक विक्रम मोडीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी…
प्रदूषण रोखण्यासाठी बेकऱ्यांवर होणार कारवाई
महापालिका नोटीस बजावणार मुंबई- वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता बेकऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यात इंधन म्हणून लाकडाचा वापर करून प्रदूषण पसरवणाऱ्या बेकायदेशीर बेकऱ्यांना पालिका नोटीस बजावणार आहे. तसेच, बेकऱ्या बंद करण्याबाबत कायदेशीर तरतूद करण्यासाठीही एमपीसीबीसी चर्चा करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मुंबईत विविध ठिकाणी अनधिकृतपणे बेकऱ्या उभ्या राहिल्या आहेत. मुंबईत १,२०० बेकऱ्या आहेत. त्यामध्ये सुमारे निम्म्या बेकऱ्या बेकायदेशीर आहेत. मुंबई महापालिकेने २००७ सालापासून इलेक्ट्रिक वापराच्या अटीवर सुमारे ३५० बेकऱ्यांना परवानग्या दिल्या आहेत. असे असताना निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. लाकडाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व बेकऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर होत असल्याने प्रदूषण वाढते. त्यामुळे लाकडाऐवजी स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे. लाकडाचा वापर केल्याने हानिकारक प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्यूलेट मॅटर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स यांसारख्या प्रदूषक उत्सर्जनामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर सात ते आठ बांधकामांच्या ठिकाणी पालिकेने कारवाईही केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता पालिका मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे सांगण्यात आले. लाकडाच्या वापरामुळे आजार बेकरींमधील उत्सर्जन हे पीएम १० आणि पीएम २.५ यांचे प्राथमिक स्रोत आहे. ज्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसांमध्ये अगदी आतापर्यंत पोहोचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
