Category: मुंबई

Mumbai news

संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त नमुंमपा मुख्यालयात आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे लेखनिक…

मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी, एसटी आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनची बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी, एसटी आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलो अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी…

मनसेला मंत्रीपद मिळणार !

बाळा नांदगावकर, राजू पाटील शर्यतीत स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बेरेजेचे राजकारण करण्यावर आपला भर राहील असे सुतोवाच करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सत्तेत आता मनसेही वाटेकरी होणार आहे. मंतिमंडळाच्या पहिल्या यादीत…

महामानवासाठी ‘जनसागर’ लोटला

उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्यामुळे…   जगातील सर्व रंजल्या गांजलेल्यांना शिका संघटीत व्हा आणि न्यायासाठी लढाचा महामंत्र देणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेंडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… सोबत राज्यपाल…

मुंबईसह ठाण्यातील पाणीकपात रद्द

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात…

भाजपाचे कालीदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : शनिवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या तीन दिवसीय हंगामी अधिवेशनासाठी भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजभवन येथे हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात…

 आज रंगणार ६४ खेळाडूंमध्ये चुरस

 कामगार महर्षी आंबेकर स्मृती बुध्दिबळ स्पर्धा   मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा.पासून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात रंगणार आहे. ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटामधील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ६४ खेळाडूंमध्ये पहिल्या सत्रात चुरशीच्या साखळी लढती होतील. संघाचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर आणि  सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांना अभिवादन करून स्मृती सप्ताहामधील बुध्दिबळ स्पर्धेच्या प्रथम उपक्रमास प्रारंभ होईल. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदाच्या दावेदारीसाठी अधवान ओसवाल, जॉब थॉमस मॅक्सलीन, समीरा थोरात, सक्षम म्हामूण, ध्रुव जैन, मिलन वेद, प्रणव चव्हाण, शान्वी अग्रवाल, सस्मित भूरावणे, अथर्व लखोटिया, स्वरा मोरे, धीर सोनावाला, समर्थ साळगावकर, राज गायकवाड, यश चुरी, सान्वी सिन्हा, गीतेश चव्हाण, थिया वागळे, वारुनिका मेहता, क्षितीज नाईक, सुजय सावंत, स्टीव्हन शिंदे आदी सबज्युनियर बुध्दिबळपटू प्रतिस्पर्ध्यांना शह देणारे विजयी डावपेच रचण्याच्या जय्यत तयारीत आहेत. स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्विस लीग पध्दतीच्या स्पर्धेमधील प्रत्येक साखळी सामने १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटचे होणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, सुनील अहिर, राजन लाड, शिवाजी काळे, मिलिंद तांबे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच गिरणी कामगार महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा दुसरा उपक्रम आंबेकर होमिओपथिक दवाखान्याच्या डॉ. रुपाली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आरएमएमएस प्रांगणामध्ये होणार आहे. ०००००

वरळीतील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांतर्फे ‘शैक्षणिक मार्गदर्शन मोहीम’

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यामध्ये स्त्री – पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही…

तारापूर येथील अनेक कंपन्यांनी आमदार भाई जगताप यांच्या युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले

मुंबई : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५  डिसेंबर रोजी बोईसर मधील तारापूर एम्.आय.डि.सी.येथील मे. साळवी केमिकल्स लिमिटेड, मे. केशव…

आंबेकर स्मृती संतप्ताहाला आजपासून आरंभ!

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक स्व.गं.द. आबेकर यांच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ ७ ते १३ डिसेंबर पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमाने स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.संघटनेचे…