Category: मुंबई

Mumbai news

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन- राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,…

गोदी कामगारांनी न्यायमागण्या मिळविण्यासाठी लढा देण्यास सज्ज रहा – ॲड. एस. के. शेट्ये

मुंबई : भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून पगारवाढ लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड झाली नाही, तर गोदी कामगारांची…

कुलाबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाचा पुढील टप्पा ‘मुंबई जोडो ‘ यात्राचा शुभारंभ मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत मुंबई कुलाबा कुपरेज येथील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी…

1 हजाराहून अधिक नमुने घेत पाणी गुणवत्ता तपासणीची दुस-या टप्प्यातील विशेष चाचणी मोहीमही यशस्वी

दोन आठवड्यात 2 हजारहून अधिक पाणी नमुन्यांची तपासणी   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा यादृष्टीने बेलापूर ते दिघा विभागांतील विविध ठिकाणांहून तसेच…

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत अनाहिता, स्वरा, थिया, मैत्रेयी, आर्श, अरहान विजेते

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप विविध वयोगट बुध्दिबळ स्पर्धेत मुलींमध्ये अनाहिता महाजन, स्वरा लड्डा, थिया वागळे, मैत्रेयी बेरा यांनी तर मुलांमध्ये…

११व्या राष्ट्रीय पुरुष व महिला बीच कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा उपांत्य फेरीत निसटता पराभव     मुंबई:- महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा “११व्या राष्ट्रीय बीच कबड्डी” स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निसटता पराभव. बिहार, बुद्धगया येथे सुरू…

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची माहिती देण्यासाठी

नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक     नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वयाच्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात योजनेची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ,  ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ तसेच महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचे पदाधिकारी असणारे 60 हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी या योजनेची सविस्तर माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिली. भारत देशात तसेच विशेषत्वाने महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मांची मोठी तीर्थस्थळे आहेत. अशा ठिकाणी एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. मात्र गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अथवा सोबत कोणी नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर केला असून 8 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयान्वये योजनेमध्ये सुधारणाही जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत शासन निर्णयात तीर्थस्थळांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना घेता येणार असून लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी – शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती या बैठकीत माहिती देण्यात आली तसेच शासन निर्णयाची प्रतही उपलब्ध करून देण्यात आली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी विचारणा केलेल्या योजनेविषयीच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळचे सल्लागार श्री. प्रकाश लखापते यांनीही योजनेचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत या योजनेची माहिती नवी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात आले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

आचार्य अत्रे पुरस्कारासाठी पत्रकार श्री. रमेश झवर यांची निवड

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार  श्री. रमेश झवर यांची निवड केली आहे. प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक मराठा मध्ये काम केलेले श्री. झवर हे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. दैनिक मराठा ते दैनिक लोकसत्ता असा त्यांचा सलग प्रवास आहे.  या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. दैनिक लोकसत्ता मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले आहे. वयाची ८० वर्षे पार केलेल्या झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. त्यांचा ब्लाॅग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. ह्या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते. श्री. झवर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन. निवड समितीने केलेल्या सहकार्याबद्दलही मुंबई मराठी पत्रकार संघ आभारी आहे. 00000

 महाराष्ट्रातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा गायब

ओरिसात रेशन दुकानात २४ तास धान्य ए टी एम   मुंबई / रमेश औताडे ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दुकानातून घोषित केलेला आनंदाचा शिधा गायब होत आहे. अशी भ्रष्टाचारी अवस्था असताना, देशातील ८० कोटी जनतेला रेशन व्यवस्था परिपूर्ण असल्याची केंद्रीय शिधावाटप यंत्रणा जाहिरात करत आहे. असा आरोप करत रेशन हक्क समिती ने खंत व्यक्त केली आहे. अनेक शिधावाटप दुकानात सर्व्हर डाऊन मुळे रांगेतील ग्राहक मोकळ्या हाताने घरी जातात. सर्व्हर आला तर वीज जाते, वीज आली तर थम मशीन बंद पडते, अशी तांत्रिक अडचण असताना सडके किडके धान्य, दुकानदार वेळेवर येत नाही, शिधा घेतल्यानंतर पावती देत नाही असे प्रकार अनेक दुकानात पाहायला मिळत आहेत. मागील श्री रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा अनेक दुकानात मिळाला नाही. आता गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शिधा वाटप दुकानात किमान कॅमेरे तरी लावा जेणे करून मनमानी उजेडात येईल. ओरिसामध्ये आठवड्याचे सात दिवस २४ तास शिधा देणारी ए टी एम मशीन व महाराष्ट्रात मात्र आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था आहे.