Category: मुंबई

Mumbai news

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा एक सलाम वर्दीला

राजेंद्र साळसकर     मुंबई : आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो,निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य- अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही.हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेfत.आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीही पर्वा न करता अहोरात्र जागून त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात ते आपल्या देशाचे जवान त्याचप्रमाणे कोणाही नागरिकाला कोणताही गंभीर आजार असो त्या रूग्णाला वाचविण्यासाठी आपले सारे वैद्यक कसब पणाला लावून व त्याची अहोरात्र सेवासुश्रुषा करून त्याचे प्राण वाचवितात हेे आपल्या साठी माणसातील देवमाणूसच आहेत.या देवमाणसाची प्रचिती आपण सर्वांनी कोरोना महामारी काळात घेतली आहेच. अशा या माणसातील देव माणसांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच.म्हणूनच आपल्याला अभिमानास्पद  असणा-या माणसातील देव माणसाची सेवा म्हणून त्यांच्या युनिफॉर्मची (वर्दीची) ड्रायक्लिनींग सुविधा १५ऑगष्ट ह्या स्वातंत्र्यदिनी केवळ एक रूपया सेवामूल्य घेऊन करण्याचे कॉर्पोरेट तसेच मध्यम वर्गात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आयन फिल या लॉंड्री सेवा देणा-या संस्थेमार्फत ड्रायक्लिनींग सेवा देण्यात येणार आहे.आयन फिल ने गतवर्षीही ही योजना राबविली होती तेव्हा यास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. वर्दीतील देवमाणसांच्या कार्याला सलाम म्हणून यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही ही योजना राबविण्याचे ठरविले असून देशाची सेवा करणारे जवान, पोलीस,डॉक्टर,परिचारिका यांनी या ड्रायक्लिनींग सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आयन फिल चे उदय पवार यांनी आग्रहाचे आवाहन केले आहे.   अधिक माहितीसाठी ७३०४६७८४८४/८४२२८९८९०२ या क्रमांकावर संपर्क करावा. 0000

मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची…

सर्वद फाऊंडेशनतर्फे डहाणूत आदिवासी  दिनाचे आयोजन

दिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद     मुंबई :  जागतिक  आदिवासी  दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू  मधील सारणी याठिकाणी  आदिवासी  नृत्यस्पर्धा आयोजित  केली  होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस  पाटील नाना लक्ष्मण  डगला यांनी श्रीफळ वाढवून आदिवासी  पारंपरिक  पद्धतीने  केले . यानंतर  सारणी गावच्या  ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा  सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा  उपाध्यक्षा श्रीमती  रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डॉ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन  स्वागत  केले .यानंतर  सर्वद फाऊंडेशन संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांनी  आदिवासी  दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा देऊन  आदिवासी  भाषा, संस्कृतीचे महत्त्व  विषद केले. यानंतर  वेगवेगळ्या  संघांनी तारपा नृत्य , गौरी  नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी  नाटक  सोंग काढणे हेही सादर करण्यात  आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी  केले. कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी  मंडळीनी परिश्रम  घेतले. आदिवासी  समाजाची संस्कृती  टिकून  राहण्यासाठी  सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात  आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रुपाली राऊत यांनी  पत्रकारांना सांगितले. 00000

एमएसपीसीच्या माध्यमातून फार्मासिस्ट होणार स्मार्ट

रमेश औताडे   मुंबई: महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदने  राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( एआय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ‘फार्मासिस्टची उन्नत्ती’ हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम,  कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ००००

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर ‘परमवीर अस्त्रा’चा हल्लाबोल

दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर, सिल्व्हर ओकवर फिल्डींग लागायची स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शऱदचंद्र पवारांची राष्ट्रवादीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपापाठोपाठ…

गोदी कामगार नेते डॉ. शांती पटेल जयंती साजरी

रमेश औताडे   मुंबई / अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे श्रद्धास्थान, स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, दूरदृष्टी नेतृत्व, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. शान्ति पटेल यांची माझगाव…

स्वच्छता दिंडी स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांनी प्रसारित केला स्वच्छता संदेश*

नवी मुंबई : नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्वच्छतेचे संस्कार रुजावेत व दिंडीसारख्या परंपरेच्या माध्यमातून त्यांना संस्कृतीची ओळख व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित…

टपाल विभागाचा ग्राहकांच्या सोयीसाठी कांदिवली येथे महामेळावा;

खातेधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   मुंबई : प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत व प्रत्येक व्यक्तीचा एक अविभाज्य घटक असलेल्या भारतीय टपाल विभागातर्फे नुकताच भारतीय टपाल विभागाच्या मुंबई उत्तर पश्चिम विभागातर्फे समता विद्यामंदिर…

वाशी विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी अंतर्गत मे. न्यु अलकनंदा को. ऑप. हौ. सो. लि. (एम. जी. कॉम्प्लेक्स) बिल्डींग नं. सी-03, भुखंड क्र. 45/2 सेक्टर- 14 येथरे आर…

‘न्यूरोइम्युनोलॉजी’ रुग्णसंख्येत वाढ नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग वरदान

मुंबई : आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारशक्तीच जेव्हा शरीराविरोधातच काम करण्यास सुरुवात करते, त्यावेळी सर्वात प्रथम ती मेंदू आणि मज्जासंस्थेवर आघात करते. अशा या न्यूरोइम्युनोलॉजीचा आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी नायर रुग्णालयात सुरू…