Category: मुंबई

Mumbai news

बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून

राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एकमेव मान्यता प्राप्त को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य पातळी मर्यादित षटकांची आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ व १५ फेब्रुवारी रोजी दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडीयमवर ही स्पर्धा होईल. मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बँकांचे टेनिस क्रिकेट संघ प्रतिवर्षीप्रमाणे सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई संलग्नीत सहकारी बँकांमधील महाराष्ट्र राज्यातील टेनिस क्रिकेट संघांसाठी मर्यादित असून स्पर्धा बाद पध्दतीने होईल. पहिल्या ४ विजेत्या-उपविजेत्या संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देऊन अध्यक्ष आनंदराव अडसूळ व सल्लागार माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित संघांनी प्रवेश अर्जासाठी युनियन कार्यालय (दूरध्वनी: २४३७ १७५५/ ९९६९२ ६५५३८), ८१/८३ शालिनी पॅलेस, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई-२८  येथे ११ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.

 समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान

समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान मुंबई : महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले मंत्रालय , मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना आदर्श पत्रकार…

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ प्लस घोषित झाली असून हजारो गावे ‘हर घर जल’ म्हणून प्रमाणित झाली आहेत. मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही कर्मचाऱ्यांना मानधन, आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात

अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात मुंबई : मौजे अरुळे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी शारदा मंगल कार्यालय, दादर येथे उत्सहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड उपस्थित होते.  यावेळी व्यासपीठावर मंडळाचे चिटणीस विकास खांबल, सुरेश रावराणे, सुभाष रावराणे, सहचिटणीस प्रकाश करपे, अजय वारीक हे उपस्थित होते. याप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विजयी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, हळदीकुंकू समारंभ आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे जगदीश भोवड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावात शिक्षण घेऊन मुंबईला आल्यानंतर येथील आव्हाने स्वीकारत, मिळालेल्या संधीचे सोने करीत मी स्वतः जिद्दीने उभा राहिलो. आपल्या गावातील अनेक लोक असेच गरिबीतून पुढे आलेले आणि मोठे झालेले आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता रावराणे आणि प्रभाकर रावराणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष करपे, विकास खांबल, देवकुमार बोडके, अजय वारीक, अनिल बाणे, मंगेश बाणे, जगदीश रावराणे, मधुकर खांबल, चंद्रकांत रावराणे, माधव काटे, प्रकाश करपे, मधुकर जैतापकर, नारायण खांबल, रमेश मराठे, चंद्रकांत खानविलकर, शांताराम खानविलकर, प्रभाकर रावराणे, नंदकुमार नारकर, प्रमोद नारकर, संतोष माईणकर, सुभाष जाधव, संतोष रावराणे, दिलीप जैतापकर, श्वेता रावराणे यांनी मेहनत घेतली.

जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवाद शाळा संपन्न

जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवाद शाळा संपन्न अनिल ठाणेकर मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  शाखा घाटकोपर यांच्यावतीने, जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवादशाळा हा एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. हा उपक्रम लग्नाळू मुला-मुलींसाठी वाटत असला तरी तो फक्त लग्नाळू व्यक्तिंसाठीच नसून लग्न या विषयाशी संबंधित असणाऱ्या आणि आताच्या काळातील लग्नाविषयीचे बदलते आयाम हे समजू न शकणाऱ्या वयोगट १६ ते पुढील सर्व वयोगटासाठी हा संवाद होता. या कार्यक्रमासाठी घाटकोपर शाखेचे कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर, प्रधान सचिव प्रफुल्ल रणदिवे, संदेश खळे, कैलास बद्रीके, निर्मला माने, संदेश बालगुडे, प्रियांका  सवाखंडे, अनंत जोशी, अरुण सातव, छाया धनवे आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. “जोडीदाराची विवेकी निवड” हा  नात्यातील सहजीवन आणि सहजीवनातील सुरेल संवाद याविषयी केवळ हे व्याख्यान न घेता गेम, व्हिडिओ आणि, केस स्टडी मधून आपण काय आव्हाने, चुकीच्या समजुती टाळू शकलो असतो/शकतो, आवश्यक, अनावश्यक गोष्टी  यावरील तो संवाद यातून हा उपक्रम उलगडत जातो. गेली दहा वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून जन्म झालेला हा उपक्रम तरुणाईला भुरळ पाडतोच पण लग्न संस्थेची संबंधित असलेल्या, सद्य काळात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा जाणीवपूर्वक अभ्यास करता सगळ्यांना विचार करायला आणि तसं वर्तन करायला भाग पाडतो. “विवेकी जोडीदार निवड की जोडीदाराची विवेकी निवड” यातील शब्दाची जागा बदलली की वाक्याचा अर्थ वेगळा निघतो नेमका कोणता दृष्टीकोन बाळगावा आपण हे प्रत्येकाने आपल्या समज, स्व आणि कुटुंब समाज ओळखनुसार ठरवावे.या विषयावरील एक दिवसीय संवाद शाळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा घाटकोपर यांच्यावतीने शिवाजी टेक्निकल स्कूल, पंतनगर, घाटकोपर येथे पूर्ण दिवसभर घेण्यात आली होती. यासाठी मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वयोगटातील  लग्नाळू, लग्न झालेले जोडपी, पालक असे सर्वच प्रकारातील ६० लोक इथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संवादक म्हणून  आरती नाईक, महेंद्र नाईक आणि रुपेश शोभा शंकर यांनी काम पाहिले. चौकट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव विजय परब, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुषमा बसवंत, घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा आणि विविध ठिकाणावरून लोकं पूर्वनोंदणी करून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लोकांनी कार्यक्रम आवडल्याचे आणि या कार्यक्रमाची ठिकठिकाणी गरज असल्याचे तसेच प्रत्येकाने आपल्या परिवार आणि नातेवाईक यांच्याशी अशा प्रकारचा संवाद घडवून आणला पाहिजे असे सांगितले. या प्रकारे पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे शानदारपणे नियोजन करण्यात आले.

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह: एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

भिडले, नडले आणि मग हरले..

भिडले, नडले आणि मग हरले.. नेपाळ अवघ्या ४ धावांनी इंग्लंडविरुध्द पराभूत स्वाती घोसाळकर मुंबई – अरबी समुद्रांच्या उसळणाऱ्या उंच लाटांपेक्षाही उत्तुंग उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या नेपाळच्या पाठीराख्यांच्या समोर नेपाळ बलाढ्य इंग्रजांना भिडले……

पवार राज्यसभेवर तर, ठाकरे विधानपरिषदेवर

पवार राज्यसभेवर तर,ठाकरे विधानपरिषदेवर सिध्देश शिगवण मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्याच्या राजकारणातील दोन बढे नेते पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार राज्यसभेतून…

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर रमेश औताडे मुंबई : आपल्या धारधार शब्दांनी समाजातील विषमतेवर प्रहार करणाऱ्या विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर पुण्यात करण्यात येणरा आहे. कुलस्वामिनी साहित्य परिषदतर्फे तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव…