Category: मुंबई

Mumbai news

 विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पहावी, प्रेयसीच्या नाही

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांचे वक्तव्य अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कल्याण : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असं काम केले पाहिजे, अशी भरारी घेतली पाहिजे की  आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्याविषयी अभिमानाची आनंदाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही असे स्पष्ट मत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या शैक्षणिक उपक्रम शाखा आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधून प्रेरणा देणाऱ्या काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यांना बोलते केले.  यावेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन जनजागृतीही केली. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक गोरक्ष सांगळे, अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे आणि कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड व्यासपीठावर उपस्थित होते. मारुती आंधळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यां समोर प्रेरणादायी विचार मांडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात ‘दहावी बारावी नंतर काय?’ या विषयावर गोरक्ष सांगळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाचे तंत्र या विषयावर योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी  आणि पदवितर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रिक्षाचालक संतोष घुगे यांची मुलगी गौरी घुगे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण  होऊन वकील झाल्याबद्दल आणि वृत्तपत्र विक्रेत्या मंगल कांगणे आणि विलास कांगणे यांची मुलगी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाल्याबद्दल दोन्ही पालकांचा विशेष सन्मान यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे जयश्री दौंड आणि दिगंबर पालवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रा.अर्जुन उगलमुगले आणि निकिता उगलमुगले यांनी केले.

११२ कॉलवर मदतीला गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

पोलिसाला लाकडी दांडक्याने मारले, चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. मात्र, राहुल तायडे नावाच्या तरुणाने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. काठीने हल्ला करत मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र घटनेच्या सीसीटीव्ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. ००००००

३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ३० ऑगस्टला

– मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा  महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार ३० ऑगस्टला होणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. सात वर्षानी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी, नागरिकांनी सहभागी आवाहन असे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरद पवार गट) अभ‍िजीत पवार, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने पार पडणार असून आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग व संबंधित विभागांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पडावी अशा सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करुन घ्यावीत. स्पर्धा मार्ग हा स्पर्धकांसाठी अडथळ्याचा ठरणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच स्पर्धेच्या दिवशी वाहतूकीचे योग्य पध्दतीने नियोजन करावे, शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील हे पहावे. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन विद्यार्थ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी या दृष्टीने नियोजन करावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्‌या सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- २१ किमी, १८ वर्षावरील (महिला व पुरुष)- १० किमी, १८ वर्षाखालील (मुले व मुली)- १० किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात १५ वर्षाखालील (मुले व मुली)- ५ किमी, १२ वर्षाखालील (मुले व मुली)- ३ किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) – ५०० मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी बैठकीत दिली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून https://racesregistrations.com/event/४९६ या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी व मोठ्या संख्येने या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे. ००००००००

प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन

 लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट – टास्कफोर्स कर्जत विभागातर्फे अशोक गायकवाड रायगड-र्जत : रविवार, २६ जुलैला कर्जत तालुक्यातील बार्डी येथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या टास्कफोर्स कर्जत विभागामार्फत टास्कफोर्स सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे…

चेंबूर जिमखाना कॅरम स्पर्धेत प्रशांत – मधुरा विजेते

मुंबई :  चेंबूर जिमखान्याच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विश्व् विजेत्या…

 द्रिश्या, नीलला विजेतेपद

रोचेस बुद्धिबळ स्पर्धा ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रोचेस बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षे वयोगटात द्रिश्या नाईक आणि १४ वर्षे वयोगटात नील कार्डोझो विजेतेपदाचे…

कलातपस्वी पुरस्कारासाठी कलाशिक्षकांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

कल्याण : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्नीत ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत कलाशिक्षकांना प्रतिष्ठित ‘कलातपस्वी…

 राज्य सरकार वीरपत्नी, वीरमाता आणि वीर सैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे – सुनेत्रा पवार

 कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा पार… मुंबई : राज्यसरकार वीरसैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे आहे अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा महान वारसा लाभलेला आहे. देशसेवा आणि कर्तव्यपालनासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य योगदान दिले आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या समन्वयाने आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा लोकभवन, मुंबई येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा  आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा आणि वीरमातांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांच्यासह वीर सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, भारतीय सैनिक आदी प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांचा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते गौरव

मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नासिकेत पानसरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भांडुप येथे…

महाविद्यालयांमध्ये अवयवदान फेस्टिव्हल भरविण्याची गरज

– तरुण पिढीतून उभी राहू शकते जीवनदानाची चळवळ रमेश औताडे मुंबई : देशात दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत असतात. दुसरीकडे, अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकांना वेळेवर जीवनदान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दरवर्षी “अवयवदान फेस्टिव्हल” आयोजित करण्याची गरज आहे असे आवाहन पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी केले. आजची तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. समाजात नवीन विचार रुजविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपेक्षा प्रभावी व्यासपीठ दुसरे असू शकत नाही. अवयवदान फेस्टिव्हलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांचे अनुभव, अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार, चित्रकला, घोषवाक्य, निबंध, रील व लघुपट स्पर्धा, रॅली, पथनाट्य आणि अवयवदान प्रतिज्ञा अभियान असे विविध उपक्रम आयोजित करता येतील. इच्छुक विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती देऊन त्यांची नोंदणीही करता येईल. अवयवदानाबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांना योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी अवयवदानाचा जागरूक दूत बनला, तर ही चळवळ काही वर्षांत जनआंदोलन बनू शकते. राज्य शासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे दरवर्षी ‘राष्ट्रीय अवयवदान फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा विचार करावा. यामुळे लाखो युवक-युवती अवयवदानाचा संकल्प करतील आणि भविष्यात हजारो रुग्णांना नवजीवन मिळू शकेल. “कॉलेजचा एक उत्सव केवळ मनोरंजनासाठी नसावा; तो समाजाला नवजीवन देणारा असावा. प्रत्येक महाविद्यालयातून अवयवदानाचा संदेश घरोघरी पोहोचला, तर अनेकांच्या जीवनात आशेचा नवा सूर्योदय होईल.” 0000