Category: मुंबई

Mumbai news

माथेरान मध्ये एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणीला उत्तम प्रतिसाद

मुकुंद रांजाणे माथेरान : भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात एसआयआर अंतर्गत मतदार नाव नोंदणीची मोहीम सुरु आहे. माथेरान येथील बाजार पेठ, शिवाजी महाराज नगर, संत गाडगे महाराज विभाग, रेल्वे स्टेशन व पंचवटी नगर या विभागातील मतदारांनी गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या माथेरान येथे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मराठा भवन या समाज हॉल मध्ये मतदार उपस्थित राहिले होते. त्यामुळे (बिएलओ) शिक्षक विनोद जाधव यांना नाव नोंदणी करण्यास मोठया प्रमाणात मदत झाली सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, आदित्य भिलारे यांनी या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले. 00000

माजी सैनिकांसाठी अद्ययावत संकुल उभारण्याच्या एकात्मिक विकास प्रकल्पाला गती – शंभूराज देसाई

मुंबई : राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा एकात्मिक विकास प्रकल्प गतिमान करण्यात येणार असून, या ठिकाणी माजी सैनिक…

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम

कल्याण : डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची…

– अंगठा मुक्त समाज घडविण्यासाठी चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम

 गुरुपौर्णिमेनिमित्त स्वाक्षरीचे प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता कल्याण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत साक्षरतेचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. समाजातील अंगठा लावणाऱ्या निरक्षर महिला व पुरुषांना स्वाक्षरीचे प्रशिक्षण देऊन ‘अंगठामुक्त समाज’ घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना स्वाक्षरी करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानून साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे, जिल्हा सरचिटणीस गजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत पोळ, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, सोमनाथ राऊत, भिकाजी कांबळे, संदीप वाळंज, अंकुश राऊत, राजकुमार राऊत, बाळासाहेब वाघमारे, दिलीप वाघमारे यांच्यासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या अस्मिता गायकवाड, कविता रुपवते, तसेच कलावती शेवाळे, मंगल बनसोडे, मंदाबाई बनसोडे, अंजना बनसोडे, मुक्ताबाई गायकवाड आणि अनेक लाभार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणात यशस्वीरीत्या स्वाक्षरीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, महेश गायकवाड आणि शिवसेना चर्मकार संघटना यांच्या माध्यमातून प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार असून, प्रत्येक लाभार्थ्यास रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक  राम बनसोडे यांनी दिली. सामाजिक सक्षमीकरण आणि साक्षरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महसूल शिबिरात समाजविकास योजनांचे मार्गदर्शन

अशोक गायकवाड नवी मुंबई : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यादृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत २२ जुलै ते २ ऑगस्ट  या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागानेही स्टॉल प्रदर्शित करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५० हून अधिक लोककल्याणकारी योजनांची माहिती या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना दिली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ २ क्षेत्रातील नागरिकांकरीता घणसोली समाजमंदिर हॉल येथे २२ जुलैला व नेरुळ मातृमिलन चर्च सभागृह, सेक्टर ४२-ए, सीवूड या ठिकाणी २६ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये समाजविकास विभागाच्या स्वतंत्र स्टॉलव्दारे महानगरपालिकेच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले. घणसोली येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता सूरज पाटील, उपमहापौर दशरथ भगत व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नेरुळ येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे व महसूल विभाग यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील गरजू व गरीब नागरिकांना उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला अशा शासनाच्या विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

– ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाणे : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat) – ठाणे तथा नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) यांच्या संयुक्त…

– केडीएमसीचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांचे हाल

 प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील सर्व्हर डाऊन झाल्याने मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रतिक्षा करावी लागली. कर भरण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेच्या या कारभाराविषयी नागरीकांनी संताप व्यक्त केला. महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राता सर्व्हर मंगळवारी अचानक डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले. मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना काउंटरवर तासंतास प्रतीक्षा करावी लागली. ऑनलाइन प्रणाली बंद पडल्याने कर स्वीकारण्याची प्रक्रिया थांबली. अनेक नागरिक रांगेत उभे राहूनही काम न झाल्याने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सर्व्हरची तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र वारंवार होणाऱ्या अशा समस्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया करदात्यांनी व्यक्त केली. दरम्यान या विभागाचे उपायुक्त विराज लब्दे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सर्व्हर डाऊन का झाला? याची विचारणा संबंधित विभाग प्रमुखाकडे केली आहे. उद्या यासंदर्भात त्यांची बैठक घेणार आहे. आजच्या दिवशी महापालिकेची वेबसाईट सुरु होती. मात्र नागरीकांना बाहेरुन तिचा वापर करता येत नव्हता. महापालिकेची वेबसाईट तयार करण्यावर १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ही साईट  ऑपरेट करण्याच्या कामावर १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात एकूण २६ कोटीचा खर्च करण्यात आला आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. २६ कोटी रुपये खर्च करुन देखील नागरीकांना सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागत आहे. देखभाल दुरुस्तीवर किती खर्च केला जातो याचा तपशील समोर आलेला नाही.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नाट्यप्रयोगास ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी

कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पितृतुल्य-मातृतुल्य ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण व्हावेत, या भावनेतून ‘शिक्कामोर्तब’ या नाट्यप्रयोगाचे मोफत आयोजन…

 पथविक्रेत्यांवर सुरु असलेली बेकायदेशीर कारवाई थांबवा

 शहर पथविक्रेता समितीची केडीएमसीकडे मागणी कल्याण : पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असतानाही पथ विक्रेत्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईबाबत आणि कायद्याचा अवमान केल्याप्रकरणी शहर पथविक्रेता सदस्यांनी केडीएमसी प्रशासनाला पत्र दिले असून पथविक्रेत्यांवर सुरु असलेली बेकायदेशीर कारवाई थांबवा आणि समितीतील उर्वरित सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी शहर पथविक्रेता समितीने केडीएमसीकडे केली असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले. नुकतीच केडीएमसीची शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झाली असून यामध्ये आठ सदस्य पथविक्रेत्यांमधून निवडण्यात आले आहेत. या सदस्यांनी केडीएमसी प्रशासनाला निवेदन दिले असून यामध्ये ‘पथ विक्रेता अधिनियम, २०१४’ च्या कलम ३(३) आणि कलम ४ नुसार, महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर टीव्हीसी समितीच्या मान्यतेने तात्काळ ‘विक्री प्रमाणपत्र’ व ‘व्हेन्डिंग झोन’ घोषित करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना, टीव्हीसी समितीला डावलून आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता अतिक्रमण विभागाचे अधिकारी फेरीवाल्यांवर रोज दंडात्मक व विस्थापनाची कारवाई करत आहेत. टीव्हीसीची मंजुरी नसलेली ही कारवाई सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा थेट अवमान आहे. कलम १८ चे उल्लंघन करून जप्त केलेल्या साहित्याची कोणतीही अधिकृत पावती/यादी  दिली जात नाही. माल खराब झाल्यास किंवा हरवल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वेक्षण झालेले असल्याने, प्रमाणपत्र वितरण आणि व्हेन्डिंग झोनचे नियोजन पूर्ण होईपर्यंत के.डी.एम.सी. क्षेत्रातील सर्व प्रकारची दंडात्मक व जप्तीची कारवाई तात्काळ स्थगित करण्यात यावी. या विषयावर निर्णय घेण्यासाठी टीव्हीसीची विशेष बैठक आगामी ७ दिवसांत आयोजित करण्यात यावी. बेकायदेशीर कारवाई थांबवली नाही, तर निवडून आलेले सदस्य फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या हक्काचे हनन  आणि केंद्रीय कायद्याच्या उल्लंघनाबाबत महापालिका आयुक्त, अतिक्रमण अधिकारी आणि वॉर्ड अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात ‘अवमान याचिका’  दाखल करू असा इशारा दिला असल्याची माहिती सदस्य भालचंद्र पाटील यांनी दिली.

 पिडीतांना रक्कम १७ कोटी ८० लाखांची नुकसान भरपाई मंजूर

ठाणे जिल्ह्यात प्रथमच मिनी लोकअदालतीत १४९ प्रकरणांतील तडजोडीत अनिल ठाणेकर ठाणे : मिनी लोकअदालतीमध्ये ठाणे मुख्यालयातील मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांसाठी २ पॅनल गठीत करण्यात आली होती. पॅनल नं १ वर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१३, ठाणे पी. ए. पत्की यांनी व पॅनल क्र.२२ वर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-८, ठाणे डी. बी. माने यांनी काम पाहिले. या दोन्ही पॅनल मिळून एकूण १४९ प्रकरणांत तडजोड होवून पिडीतांना रक्कम रु.१७,८०,९६,०००/- रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या परवानगीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांसाठी जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे येथे शनिवार, २५ जुलै रोजी “मिनी लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. मागील राष्ट्रीय लोकअदालत ही ९ मे रोजी झाली होती व पुढील राष्ट्रीय लोकअदालत ही १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही लोकअदालतींमधील असलेल्या कालावधीचा विचार करून २५ जुलै रोजी “मिनी लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश आर. व्ही. मोहिते, सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, यांच्या न्यायालयातील एक मोटार अपघात दावा क्र.१७४२/२०२४ मध्ये मोटार अपघातात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीकडुन उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून १ कोटी ८० लाखांचा धनादेश मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे, आर. डी. सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. या दाव्यामधील मृत्यु पावलेली व्यक्ती विजयकुमार आदीद्रविदार हे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे नर्सिंग विभागात कार्यरत होते. सदर व्यक्ती मुंबई-गोवा हायवेवरून मोटारसायकलवरून जात होते. ते आंबेवाडी नाका, कोलाड, रोहा, जि. रायगड या ठिकाणी पोहोचले असता एका भरधाव ट्रेलरने त्यांना मागुन जोरदार धडक दिल्याने सदर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांचे वय 36 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडिल व भाऊ असे वारस आहेत. सदर पॅनलवर पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-८, ठाणे मा. डी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दाव्यामध्ये तडजोड करण्यात आली. सदर दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड. अरविंद के. तिवारी यांनी व पक्षकारांतर्फे अॅड सचिन एल. माने यांनी काम पाहिले. मागील व पुढील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चार महिन्यांचा कालावधी आहे. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणांतील पिडीतांच्या वारसांना लवकारात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणात कार्यरत असणाऱ्या वकीलांच्या प्रयत्नांनी ही मिनी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांनी दिली.