Category: मुंबई

Mumbai news

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गव्हाणमध्ये उलवे पोलिस ठाण्यातर्फे सायबर जनजागृती

उलवे : आज सगळीकडे सायबर चोरांचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा उच्च शिक्षितही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे जनजागृतीची मोहीम उलवे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून मंगळवारी…

देशात उत्तरदायित्व कायदा होण्याची नितांत गरज

रमेश औताडे मुंबई : देशभरात झालेल्या नीट परीक्षा पेपरफुटी, राष्ट्रीय परीक्षा संस्थांमधील संरचनात्मक त्रुटी आणि विद्यार्थी आंदोलनांवर सरकारकडून करण्यात आलेल्या कठोर दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर देशात उत्तरदायित्व कायदा होण्याची नितांत गरज असल्याचे मत नागरी हक्क कार्यकर्ते, कायदेतज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी आणि युवक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अन्याय आणि भेदभाव विरोधी संयुक्त आघाडी आणि द बॉम्बे कॅथोलिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. लारा जसानी, डॉल्फी डीसूझा, मौलाना जहीर अब्बास, ॲड. सुरेश माने, समन्वयक शाकीर शेख सहभागी झाले होते. कोणतेही आंदोलन हे पाच दिवसाच्या आत सरकारने शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. लाठी चार्ज व वेळकाढू आंदोलन कशासाठी? असा सवाल ऍड सुरेश माने यांनी यावेळी केला. देशाचे भविष्य असणारी युवा पिढी जर अशी आंदोलने करत बसली तर त्यांनी अभ्यास कधी करायचा ? देशासाठी योगदान कधी द्यायचे ? याचा विचार सरकारने केला पाहिजे. असे ॲड लारा जसानी यांनी व्यक्त केले.

१ जानेवारी २०११ पूर्वीच्या रहिवाशांसाठी मोठी घोषणा

 अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर (Collector Land) राहणाऱ्या कुटुंबांना जागा नावावर करून दिली जाणार मिरा-भाईंदर : गुरुपौर्णिमेचे पावन पर्व, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मिरा-भाईंदरकरांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या जनहितकारी उपक्रमांचा भव्य शुभारंभ आज मिरा रोड पूर्व येथील पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आला. सदर आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आणि ‘कलेक्टर लँड (Collector Land) कायमस्वरूपी नाव नोंदणी मार्गदर्शन अभियाना’मुळे शहरातील हजारो नागरिकांना एकाच छताखाली मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘शासन आपल्या दारी आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी’ ही संकल्पना प्रत्यक्ष भूमीवर उतरवण्याचे काम या अभियानातून होत आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रताप सरनाईक भावुक परंतु ठाम स्वरात म्हणाले कि, “अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर (Collector Land) राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा केवळ जमिनीच्या कागदपत्रांचा किंवा टेक्निकल विषयाचा भाग नाही. हा त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, भविष्याला स्थैर्य देण्याचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे १५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी जागा आता संबंधित रहिवाशांच्या कायमस्वरूपी नावे करण्याची प्रक्रिया आपण सुरू करत आहोत. तुमच्या वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला न्याय देण्यासाठी आणि तुमच्या निवाऱ्याला कायदेशीर आधार देण्यासाठी आमचे शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे!” या शिबिरामध्ये मिरा-भाईंदरमधील नागरिकांना शासकीय जागेच्या कायमस्वरूपी नाव नोंदणीसाठी लागणारे अर्जाचे नमुने, नियम, अटी व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. महसूल विभाग व जिल्हा प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन विकास आणि लोककल्याण यांची सांगड घालून पुढे जात असल्याचे सांगत, १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी

 किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम – नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन मुंबई : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्ती टिकून राहते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचालित मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत बंदी लागू केली होती. त्यामुळे १ ऑगस्टपासून या क्षेत्रात मासेमारीला परवानगी मिळणार आहे. केंद्र सरकारने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) लागू असलेली बंदी ३१ जुलैपर्यंत म्हणजे ६१ दिवस  ठेवली होती. त्यामुळे १ ऑगस्टपासून या क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी मिळणार आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे या कालावधीत किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारी करता येणार नाही. यंदाच महाराष्ट्र शासनाने हि बंदी १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे ७६ दिवस लागू केली आहे ती बंदी कायम आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजचे १२ सागरी मैलांपुढे  मासेमारी करताना लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत राज्याच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विवेकवादाला प्राधान्य देणारी संघटना – आरती नाईक

अनिल ठाणेकर ठाणे- ‘देवधर्म आणि नीती’ या विषयावर मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही नास्तिकतेचा प्रचार करणारी नव्हे, तर विवेकवादाला प्राधान्य देणारी आणि अज्ञेयवादाची भूमिका स्वीकारणारी संघटना असल्याचे स्पष्ट केले. ‘कार्य-संस्कृती’ या विषयावरील सत्रात त्यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील, माधव बावगे आणि संजय बनसोडे यांच्या कार्यशैलीची उदाहरणे देत कार्यकर्त्यांनी स्वीकारावयाच्या मूल्यांवर राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.दोन दिवसीय निवासी चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या. या चिंतन बैठकीच्या नियोजनासाठी राज्य प्रधानसचिव विजय परब, ठकसेन गोराणे, राज्य सदस्य नंदकिशोर तळाशीलकर, राज्य सरचिटणीस आरती नाईक, तसेच जिल्हा पदाधिकारी यश सूर्यवंशी, तुषार शिंदे, प्रवीण जावळे आणि संदेश बालगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित दोन दिवसीय निवासी चिंतन बैठक २५ व २६ जुलै रोजी जनता केंद्र, ताडदेव (मुंबई सेंट्रल) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांमधील सुमारे ४० कार्यकर्ते सहभागी झाले. बैठकीत मागील काही वर्षांतील जिल्हा संघटनेच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ‘मेरी बात’ या सत्रात कार्यकर्त्यांनी संघटनेकडून असलेल्या अपेक्षा, स्वतःचे अनुभव आणि भविष्यातील योगदान याविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या ‘परस्पर विश्वास आणि संघटनात्मक एकजूट’ या सत्रात अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेने कठीण प्रसंगी दिलेल्या आधाराचे अनुभव कथन केले. गटचर्चेच्या माध्यमातून संघटनेची ताकद, मर्यादा, कमतरता, संभाव्य धोके, भविष्यातील आव्हाने आणि विविध क्षेत्रांतील कामाच्या संधींचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विधायक सूचनांवर चर्चा करून आगामी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. समारोप सत्रात विविध शाखांच्या अडचणी, अनुभव आणि आव्हानांवर चर्चा करून आगामी वर्षासाठी संघटनात्मक नियोजन करण्यात आले.

मीरा रोडमध्ये एएनके लक्झरी सलून अँड स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मिरा – भाईंदर : मीरा रोडमध्ये स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एएनके लक्झरी सलून अँड स्पा’ येथे वेश्याव्यवसाय चालत असल्याची खबर…

 विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पहावी, प्रेयसीच्या नाही

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांचे वक्तव्य अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कल्याण : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असं काम केले पाहिजे, अशी भरारी घेतली पाहिजे की  आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्याविषयी अभिमानाची आनंदाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही असे स्पष्ट मत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या शैक्षणिक उपक्रम शाखा आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधून प्रेरणा देणाऱ्या काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यांना बोलते केले.  यावेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन जनजागृतीही केली. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक गोरक्ष सांगळे, अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे आणि कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड व्यासपीठावर उपस्थित होते. मारुती आंधळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यां समोर प्रेरणादायी विचार मांडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात ‘दहावी बारावी नंतर काय?’ या विषयावर गोरक्ष सांगळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाचे तंत्र या विषयावर योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी  आणि पदवितर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रिक्षाचालक संतोष घुगे यांची मुलगी गौरी घुगे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण  होऊन वकील झाल्याबद्दल आणि वृत्तपत्र विक्रेत्या मंगल कांगणे आणि विलास कांगणे यांची मुलगी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाल्याबद्दल दोन्ही पालकांचा विशेष सन्मान यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे जयश्री दौंड आणि दिगंबर पालवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रा.अर्जुन उगलमुगले आणि निकिता उगलमुगले यांनी केले.

११२ कॉलवर मदतीला गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

पोलिसाला लाकडी दांडक्याने मारले, चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. मात्र, राहुल तायडे नावाच्या तरुणाने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. काठीने हल्ला करत मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र घटनेच्या सीसीटीव्ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. ००००००

३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ३० ऑगस्टला

– मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा  महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार ३० ऑगस्टला होणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. सात वर्षानी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी, नागरिकांनी सहभागी आवाहन असे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरद पवार गट) अभ‍िजीत पवार, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने पार पडणार असून आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग व संबंधित विभागांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पडावी अशा सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करुन घ्यावीत. स्पर्धा मार्ग हा स्पर्धकांसाठी अडथळ्याचा ठरणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच स्पर्धेच्या दिवशी वाहतूकीचे योग्य पध्दतीने नियोजन करावे, शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील हे पहावे. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन विद्यार्थ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी या दृष्टीने नियोजन करावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्‌या सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- २१ किमी, १८ वर्षावरील (महिला व पुरुष)- १० किमी, १८ वर्षाखालील (मुले व मुली)- १० किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात १५ वर्षाखालील (मुले व मुली)- ५ किमी, १२ वर्षाखालील (मुले व मुली)- ३ किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) – ५०० मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी बैठकीत दिली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून https://racesregistrations.com/event/४९६ या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी व मोठ्या संख्येने या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे. ००००००००

प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन

 लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट – टास्कफोर्स कर्जत विभागातर्फे अशोक गायकवाड रायगड-र्जत : रविवार, २६ जुलैला कर्जत तालुक्यातील बार्डी येथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या टास्कफोर्स कर्जत विभागामार्फत टास्कफोर्स सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे…