Category: मुंबई

Mumbai news

चेंबूर जिमखाना कॅरम स्पर्धेत प्रशांत – मधुरा विजेते

मुंबई :  चेंबूर जिमखान्याच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विश्व् विजेत्या…

 द्रिश्या, नीलला विजेतेपद

रोचेस बुद्धिबळ स्पर्धा ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रोचेस बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षे वयोगटात द्रिश्या नाईक आणि १४ वर्षे वयोगटात नील कार्डोझो विजेतेपदाचे…

कलातपस्वी पुरस्कारासाठी कलाशिक्षकांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

कल्याण : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्नीत ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत कलाशिक्षकांना प्रतिष्ठित ‘कलातपस्वी…

 राज्य सरकार वीरपत्नी, वीरमाता आणि वीर सैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे – सुनेत्रा पवार

 कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा पार… मुंबई : राज्यसरकार वीरसैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांच्या परिवारासोबत सदैव ठामपणे उभे आहे अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा महान वारसा लाभलेला आहे. देशसेवा आणि कर्तव्यपालनासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य योगदान दिले आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या समन्वयाने आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळा लोकभवन, मुंबई येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा  आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा आणि वीरमातांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांच्यासह वीर सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, भारतीय सैनिक आदी प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांचा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते गौरव

मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नासिकेत पानसरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भांडुप येथे…

महाविद्यालयांमध्ये अवयवदान फेस्टिव्हल भरविण्याची गरज

– तरुण पिढीतून उभी राहू शकते जीवनदानाची चळवळ रमेश औताडे मुंबई : देशात दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत असतात. दुसरीकडे, अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकांना वेळेवर जीवनदान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दरवर्षी “अवयवदान फेस्टिव्हल” आयोजित करण्याची गरज आहे असे आवाहन पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी केले. आजची तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. समाजात नवीन विचार रुजविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपेक्षा प्रभावी व्यासपीठ दुसरे असू शकत नाही. अवयवदान फेस्टिव्हलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांचे अनुभव, अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार, चित्रकला, घोषवाक्य, निबंध, रील व लघुपट स्पर्धा, रॅली, पथनाट्य आणि अवयवदान प्रतिज्ञा अभियान असे विविध उपक्रम आयोजित करता येतील. इच्छुक विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती देऊन त्यांची नोंदणीही करता येईल. अवयवदानाबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांना योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी अवयवदानाचा जागरूक दूत बनला, तर ही चळवळ काही वर्षांत जनआंदोलन बनू शकते. राज्य शासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे दरवर्षी ‘राष्ट्रीय अवयवदान फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा विचार करावा. यामुळे लाखो युवक-युवती अवयवदानाचा संकल्प करतील आणि भविष्यात हजारो रुग्णांना नवजीवन मिळू शकेल. “कॉलेजचा एक उत्सव केवळ मनोरंजनासाठी नसावा; तो समाजाला नवजीवन देणारा असावा. प्रत्येक महाविद्यालयातून अवयवदानाचा संदेश घरोघरी पोहोचला, तर अनेकांच्या जीवनात आशेचा नवा सूर्योदय होईल.” 0000

– ११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

ठाणे – श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. ‘महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’ आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ या दोन प्रसिद्ध…

 महाराष्ट्रातील बळींची संख्या पाच कामाचा अती ताण, वरिष्ठांचा दबाव

यवतमाळमध्ये ‘बीएलओ’ चा मृत्यू! यमदूताचा सरकार … ‘ पीएचडी स्कॉलर ‘ विधवेचे शोक संतप्त उदगार ∆ दिवाकर शेजवळ मुंबई ( २७ जुलै २०२६) – मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या अती ताणामुळे शुगर प्रमाणाबाहेर वाढल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेल्या यवतमाळ येथील एका बूथ लेव्हल ऑफिसर ( बीएलओ) चा शनिवारी हृदय विकाराच्या लागोपाठ आलेल्या दोन धक्क्यांनी मृत्यू ओढवला आहे. त्या बी एल ओ चे नाव सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय ( ५० वर्षे) असे असून ते ग्रामविकास खात्यात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. मधुमेही असलेले सिद्धार्थ धम्मप्रिय यांची शुगर कामाचा अती ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे ४२० च्या पार गेली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही कमालीचा खालावला होता. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याचवेळी सोपवलेले मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे ९० टक्के काम पूर्ण झालेच पाहिजे, असे तालका उप शिक्षण अधिकारी एस. ए . काटकर यांनी त्यांना शनिवारी बजावले होते. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर व्हावे, असे आदेश दिले होते. मात्र शनिवारीच संध्याकाळी ७.३० वाजेनंतर सिद्धार्थ धम्मप्रिय यांना हृदय विकाराचे दोन तीव्र धक्के लागोपाठ बसले. त्यात त्यांचा बळी गेला, असे त्यांच्या पत्नी पल्लवी धम्मप्रिय यांनी यवतमाळ येथून फोनवरून बोलताना सांगितले. प्रमाणाबाहेर वाढणारी शुगर आणि खालावणारा रक्तदाब यामुळे माझ्या पतीला मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे काम करणे मुश्किल बनले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना विश्रांती मिळण्यासाठी त्यांचे काम दोन आठवडे पायपीट करून मी स्वतः पार पाडले, अशी धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. परराज्यांत स्थलांतरित मतदारांना ‘ बीएलओ ‘ नी गाठायचे कसे ? माझे पती सिद्धार्थ धम्मप्रिय यांच्याकडे  कोळशाच्या दोन खाणी असलेले वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या कंपनीचे वणी तालुक्यातील राजूर कॉलरी हे क्षेत्र मतदारांच्या तपासणी साठी देण्यात आले होते. तिथले बहुतांश खाण कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छतिसगड या राज्यांतील आहेत. ते आपापल्या राज्यांत काही काळासाठी निघून जात असतात, असे सांगतानाच स्थलांतरित मतदारांना बी.एल. ओ . यांनी गाठायचे कसे, असा सवाल पल्लवी धम्मप्रिय यांनी विचारला आहे. माझ्यावर वैधव्य लादले ! वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कंपनीच्या क्षेत्रातील ७२१ मतदारांपैकी ४५० पर्यंत मतदार हे परराज्यांतील आहेत, असे सांगून पल्लवी धम्मप्रिय म्हणाल्या की, त्यातील ३०० मतदारांना  शोधून काढण्यात माझे पती आणि मला यश आले. त्यातून मतदार तपासणीचे काम ५५ टक्क्यापर्यंत जावू शकले आहे. पण मतदारांची अनुपलब्धता लक्षात न घेता ९० टक्के काम पूर्ण करण्यासाठी लकडा लावून शिक्षण अधिकाऱ्याने माझ्या मधुमेही पतीवर प्रचंड दबाव आणला होता. अखेर त्यात त्यांचा बळी जावून माझ्यावर वैधव्य लादण्यात आले. राज्यातील आतापर्यंतचे मृत्यू यवतमाळ येथील बी. एल.ओ. सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय यांच्या अकाली मृत्यूमुळे  मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या कामात अती ताणामुळे महाराष्ट्रात बळी गेलेल्यांची संख्या आता ५ झाली आहे. १) १३ एप्रिल २०२६ : पुण्यात बी. एल.ओ. प्रा. ज्ञानेश्वर रोटे ( ४० ) यांचा  मोटार सायकल वरून जाताना ऑन ड्युटी अपघाती मृत्यू २) २८ जून २०२६ : अहिल्यानगर, पाथर्डी येथे बी. एल. ओ. सुनिता पोपळघट या शिक्षिकेचा हृदय विकाराने मृत्यू ३) २३ जुलै २०२६ : पनवेल येथे बी. एल. ओ. कैलास भोयर या चेंबूरच्या महापालिका शाळेतील शिक्षकाचा हृदय विकाराने मृत्यू ४) बी.एल.ओ. शिक्षक स्वामी परभणी. ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ कोट लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे निवडून दिलेले सरकार हे जनतेच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी असले पाहिजे अशीच अपेक्षा असते. पण नोटबंदीत लोकांचे बळी,कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये लोकांचे बळी आणि आता मतदार याद्यांच्या तपासणीत सुद्धा बी. एल. ओ. चे बळी जात आहे. हे सरकार यमदुताचे सरकार आहे काय? ∆पल्लवी धम्मप्रिय पीएचडी स्कॉलर मयत बी.एल.ओ. सिद्धार्थ धम्मप्रिय यांची पत्नी

‘कॉफी विथ कार्टूनिस्ट’ खुला पॉडकास्ट ठरला व्यंगचित्र रसिकांसाठी मेजवानी

मुंबई: मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत हसत-खेळत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉलमध्ये ‘कॉफी विथ कार्टूनिस्ट्स’ हा…

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कामगारांना मिळवून दिले समान काम समान वेतन

 सचिव प्रकाश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश केतन खेडेकर मुंबई : आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघ नेतृत्व करत असलेल्या आस्थापनापैकी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. (MSEDCL) रायगड विभागातील गोरेगाव व रोहा युनीटमधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे सन २०२० मध्ये ठाणे औद्योगिक न्यायालयात दावा क्र.१६/२० व १२/२०१८ दाखल केला होता. औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी दि. १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. गोरेगाव व रोहा युनिट मधील कंलाटी पद्धतीवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे तसेच त्यांच्या पगारातील तफावत सन २०१६ पासून ते आजतागायत द्यावी असा आदेश पारीत केला होता. या निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. (MSEDCL) ने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन ३१७०/२०२५ व ३१७२/२०२५ अंतर्गत दावा दाखल केला होता. भरती बंदीमुळे नियमित कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून भरून घेत असताना त्यांच्याकडून समान स्वरूपाचे काम करून घेतले जात असेल तर नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील किमान वेतन देणे बंधनकारक आहे असा निर्णय मा. उच्च न्यायालयाने दिला. मान्न, वेतन फरकाची थकबाकी काम सुरू झाल्यापासून नव्हे, तर औद्योगिक न्यायाधिकरणाकडे संदर्भ दाखल झाल्याच्या तारखेपासूनच मिळेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमुर्ति श्री. संदीप व्ही. मारणे यांनी महावितरण व भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्या याचिकांवर हा निर्णय दिला. भा.का.क. महासंघाचे सचिव प्रकाश शिंदे व कायदेतज्ञ जी. आर. नाईक, के. टी. विश्वनाथन, महासंघाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. जी. एस. बज साहेब व महासंघाची कोर्ट ब्रिगेड यांचे कामगारांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. हा निर्णय देताना न्यायालयाने नमूद केले की, महावितरणने स्वतःच भरती बंदीमुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कंत्राटी कामगार नियुक्त केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हे कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांचीच कामे करत असल्याचे स्पष्ट होते. औद्योगिक न्यायाधिकरणाने नोंदविलेला हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दाखवण्यात महावितरण अपयशी ठरले.  न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) नियम, १९७१ मधील नियमावर विशेष भर दिला. या नियमानुसार कंत्राटी कामगार नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत असतील तर त्यांना त्याच दराने वेतन देणे ही वैधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा अधिकार केवळ ‘समान काम समान वेतन’ या घटनात्मक तत्त्वावर नव्हे तर थेट नियमांमधून मिळतो, असे न्यायालयाने याठिकाणी स्पष्ट केले. हा निर्णय कामगारांच्या बाजूने लागल्याने संपूर्ण कामगार वर्गाने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे आणि आमदार भाई जगताप यांचे  मनापासून आभार मानले. ००००००००