Category: मुंबई

Mumbai news

उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

सुनिल इंगळे उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांतून अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ४० वर्षांवरील…

कै. विमल मेहरा व कै.आशा मेहरा यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था यांच्या तर्फे १० वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत उत्कृष्ठ गुण संपादन करून उत्तीर्ण…

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

अविनाश उबाळे ठाणे : मुंबई व ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहापुर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात प्रचंड पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत १३७.६६ मीटर एवढी वाढ झाली आहे.असून भातसा धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात सततच्या पडणा-या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा देखील वाढत आहे.त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी,जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, शनिवारी दुपारी १.०० वाजता भातसा धरणाचे पाच वक्रद्वारे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहेत. परिणामस्वरूप भातसा धरणातून नदीमध्ये ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग प्रवाहीत झाला आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा,मोडकसागर,पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली,सरलांबे ,तुते ,सावरशेत,सापगाव, खुटघर ,खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात शहापूर तहसीलदार यांना लेखी कळविण्यात आले आहे.असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता गणेश कचरे व सहाय्यक अभियंता शाम हंबीर यांनी मााहिती देेेताना सांंगितले.मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे.प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्षघनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते शनिवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूूूजन करण्यात आले. ०००००

निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी

अनिल ठाणेकर ठाणे: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस येथून  दिंडी काढण्यात आली. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठÎा उत्साहात पारंपारिक वेशात दिंडी सोहळा साजरा केला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे ठाण्यातील अभ्यासिकांमधून विविध धार्मिक सण मोठÎा उत्साहात साजरे केले जातात. यंदाही येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस,  डम्पिंग अभ्यासिका, लोकमान्य नगर अभ्यासिका, घोलाई नगर अभ्यासिका, दिघा अभ्यासिका, दिवा अभ्यासिका, मापानपाडा अभ्यासिका, भोलानगर अभ्यासिका, मुंब्रा अभ्यासिका येथून  दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम “जय हरी विठ्ठल“ आणि “पांडुरंग हरी“ यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासनाकडून ‘गणेशोत्सव विशेष गाड्यां’ची घोषणा

अनिल ठाणेकर ठाणे, आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या (TOD Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यासोबतच सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर ३ प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा (Experimental Stoppage) मंजूर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोकणातील प्रवाशांची, पर्यटकांची आणि चाकरमान्यांची गर्दी व होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्यांण यांची भेट घेऊन विशेष गाड्यांची मागणी केली होती. १. सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर नियमित मंजूर झालेले नवीन थांबे, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार सावंतवाडी स्थानकावर खालील गाड्यांना थांबा मंजूर झाला आहे. (KR/CO/O/NOTI/२०२6-२७  date – २4 July २०२6): CSMT – मंगळुरू – CSMT एक्स्प्रेस  (Daily): गाडी क्र. १२१३३ (CSMT ते MAJN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०७:०२ / ०७:०४ (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२१३४ (MAJN ते CSMT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — रात्री २३:३० / २३:३२ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम ‘राजधानी’ एक्स्प्रेस (Tri-Weekly): गाडी क्र. १२४३२ (NZM ते TVC): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०६:१८ / ०६:२० (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२४३१ (TVC ते NZM): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०९:४४ / ०९:४६ (दिनांक २८ जुलै २०२६ पासून लागू).लोकमान्य टिळक टर्मिनस – त्रिवेंद्रम ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (Bi-Weekly): गाडी क्र. १२२०१ (LTT ते TVCN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०२:०२ / ०२:०४ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२२०२ (TVCN ते LTT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०३:२८ / ०३:३० (दिनांक ३० जुलै २०२६ पासून लागू).२. गणेशोत्सव २०२६ विशेष गाड्यांचे वेळापत्रक:मध्य रेल्वेने ११ सप्टेंबर २०२६ पासून खालील विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे (Railway Letter No.T.3२२/X-१२/Ganpati Specials/२०२6 date – २4 July २०२6):CSMT – सावंतवाडी – CSMT (दैनिक स्पेशल). ट्रेन क्रमांक: ०११०3 / ०११०4.फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या). वेळ: CSMT वरून निघणार: १५:३० | सावंतवाडी आगमन: ०४:०० (दुसऱ्या दिवशी).प्रमुख थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ.LTT – सावंतवाडी – LTT (दैनिक स्पेशल).ट्रेन क्रमांक: ०११७१ / ०११७२. फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १७ फेऱ्या).वेळ:…

 वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात नगरसेवक राहुल कोट आक्रमक

 महावितरण अधिकार्यांना दिले निवेदन कल्याण : कल्याण नजीक मोहनेसह आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. परिसरातील वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना वारंवारच्या वीज समस्येतून दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रभाग क्र. ०४ अंतर्गत मोहने, शनिवार पाटील नगर, यादवनगर, जेतवननगर, फुलेनगर, गाळेगाव, शिवसृष्टी तसेच आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना प्रचंड सनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असून, मुख्य वीजवाहिन्या, जंपर, इन्सुलेटर तसेच इतर विद्युत यंत्रणांची वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक देखभाल होत नसल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुढील आठवड्यात हवामान अनुकूल होताच दोन स्वतंत्र तांत्रिक पथके नियुक्त करून पॉवर हाऊस ते मोहने, आर. ‘स. गाळेगाव तसेच शिवसृष्टी ते आंबिवली रेल्वे स्टेशनपर्यंत संपूर्ण मुख्य वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग, जंपर तपासणी, नाडांच्या फांद्या छाटणे, सैल जोडण्या दुरुस्त करणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक देखभाल तातडीने करण्यात यावी. हे काम तातडीने पूर्ण करून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या वाढत्या संतापाची व गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असा इशारा नगरसेवक राहुल कोट यांनी दिला आहे. ००००

चेंबूर जिमखाना कॅरम –  राहुल सोलंकी उपांत्य फेरीत दाखल

मंुबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चेंबूर जिमखाना येथे सुरु असलेल्या चेंबूर जिमखाना ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या राहुल…

 मनसेकडून १,००० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

 अमित ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ मुंबई, दि. २6 जुलै -महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ११७ आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील सुमारे १,००० शालेय…

– रौप्यमहोत्सवी ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’चा सुरेल शुभारंभ

 पंकज उधास यांच्या संगीतसेवेचा आणि समाजकार्यातील वारशाचा जागर मुंबई : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिवंगत गझल सम्राट पंकज उधास, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि तलत अजीज यांच्या संकल्पनेतून २००१ साली सुरू झालेल्या ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ या प्रतिष्ठित महोत्सवाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात दिमाखदार प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंटच्या ‘द रीगल रूम’मध्ये शुक्रवारी या दोन दिवसीय महोत्सवाचा सुरेल शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. रौप्यमहोत्सवी पर्वानिमित्त दिवंगत गझल सम्राट पंकज उधास यांच्या समृद्ध संगीतवारशाला तसेच गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ला समृद्ध करणाऱ्या दिग्गज कलाकारांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. संगीत, संवेदना आणि समाजसेवा यांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी देशभरातील गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ गझल गायक अनुप जलोटा, हरिहरन, रेखा भारद्वाज, मिताली सिंह, पेनाझ मसानी, सुदीप बॅनर्जी, पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT)च्या फरीदा पंकज उधास तसेच कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA)चे वाय. के. सप्रू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रौप्यमहोत्सवी ‘खजाना’च्या दोन दिवसांच्या सांगीतिक पर्वात अनुप जलोटा, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, सुनील मुंगे, अलेना भारती, निहिरा जोशी आणि तेजस गंभीर या नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझल, सूफी आणि भावसंगीताच्या सुरावटींनी सजलेल्या या मैफलींमधून प्रत्येक कलाकाराने दिवंगत पंकज उधास यांच्या संगीतवारशाला भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी फरीदा पंकज उधास म्हणाल्या, “’खजाना’ हा पंकजजींसाठी केवळ संगीत महोत्सव नव्हता, तर तो आशा, संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रवास होता. ते आज आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा प्रत्येक सुरातून आजही जिवंत आहे. कलाकार, रसिक आणि समाजाने दिलेल्या प्रेमामुळेच ‘खजाना’चा हा प्रवास आज २५ वर्षांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे.” दिवंगत पंकज उधास यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने गेली २५ वर्षे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी कार्यरत पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT) आणि कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचार व मदतीसाठी कार्यरत कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) यांच्यासाठी निधी संकलनाची परंपरा अखंडपणे जपली आहे. संगीताच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारा ‘खजाना’ आजही ही परंपरा तितक्याच प्रभावीपणे पुढे नेत आहे. दोन दिवस चाललेल्या या रौप्यमहोत्सवी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरेल सादरीकरणासह समाजसेवेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ने आपल्या २५ वर्षांच्या समृद्ध प्रवासाला संस्मरणीय स्वरूपात उजाळा दिला.

 ७० वर्षांचा महिंद्रा कारखाना, २० वर्षे युनियन निवडणूक नाही;

कांदिवलीतील कामगार आक्रमक, सरकारी अधिकाऱ्यावर पक्षपाताचे गंभीर आरोप मुंबई : कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (ऑटोमोटिव्ह सेक्टर) या गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कारखान्यात कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कामगार युनियनची निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित सरकारी अधिकारी कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान कामगार नेतृत्वाला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मराठी कामगार कार्यरत आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार, सध्याचे युनियन पदाधिकारी आणि एक कामगार नेता गेल्या २० वर्षांहून अधिक काळ कोणतीही निवडणूक न घेता पदावर कायम आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान युनियनच्या संगनमतामुळे कामगारांचे सातत्याने शोषण होत असल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. या विरोधात कामगारांनी औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या लढ्याला यश मिळाल्यानंतर न्यायालयाने युनियनची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी उपनिबंधक, श्रमिक संघ, कोकण विभाग या पदावरील सरकारी अधिकारी अतुल सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याऐवजी अतुल सावरकर हे कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान नेतृत्वाला अनुकूल ठरतील अशा पद्धतीने काम करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी त्यांचे खासगी संबंध असल्याचा आणि त्यांच्यासोबत विविध ठिकाणी वेळ घालवल्याचे कथित व्हिडिओ कामगारांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्या वर्तनाबाबत कामगारांनी तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारांमुळे कामगारांमध्ये भीती, संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी कामगारांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना लेखी निवेदन दिले असून, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड यांचीही वारंवार भेट घेऊन तक्रारी सादर केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याच्या कथित चुकीच्या धोरणांमुळे अनेक कामगारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारी यंत्रणा या प्रकरणात चालढकल करत संबंधित अधिकाऱ्याला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. महिंद्रासारख्या प्रतिष्ठित औद्योगिक संस्थेमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा कंपनीच्या प्रतिमेवर तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणावर परिणाम होणार नाही का, असा प्रश्नही कामगारांनी उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार युनियनची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही, तर कामगार रस्त्यावर उतरून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही कामगारांनी दिला आहे. सोबत जोडलेले दस्तऐवज : १. अतुल सावरकर यांच्या वर्तनाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कामगार विभागाचे पत्र. २. अतुल सावरकर यांच्या विरोधात कामगारांनी केलेल्या तक्रारीची प्रत. – सुहास गोरे आणि इतर कामगार