मुंबई- आंतरराष्ट्रिय मल्लखांब दिनाचे औचित्य साधुन‌ बोरीवली पश्चिम येथे आशिष देवल व संचिता देवल यांच्या संकल्पनेतून मल्लखांब लव संघ व बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काहीशा आगळ्या वेगळ्या  मराठी कलावंत मल्लखांब कार्यशाळे‌चे  आयोजन  करण्यात आले होते.या   कार्यशाळेमध्ये प्रथमेश परब, ओंकार भोजने, भाग्यश्री मिलिंद, वैष्णवी घोडके , मानसी घाटे, भक्ती देसाई, सानीका काशीकर, भाग्यश्री दळवी, सुमित भोकसे या मराठी कलावंतांनी मल्लखांब करण्याचा आनंद लुटला. या कार्यशाळेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत या उपक्रमाचे व प्रमुख प्रशिक्षक आशिष आणि संचिता देवल यांचे कौतुक केले. मल्लखांब खेळाच्या विकासासाठी  संपुर्णपणे मदत करणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी या वेळी दिले. याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळेचे संचालक व‌ शिक्षक, मल्लखांब खेळाडू,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मल्लखांबातील राष्ट्रीय खेळाडूंच्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मल्लखांब खेळाच्या प्रचार, प्रसार, प्रसिध्दीच्या उद्देशाने सर्व कलावंत या पुढे देखील‌ अशा उपक्रमात सहभागी होतील असे आश्वासन या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कलाकारांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *