Category: मुंबई

Mumbai news

सिडको महागृहनिर्माणातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांचा मालमत्ता कराचा भुर्दंड

पनवेल : सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या लाभार्थ्यांना इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी…

खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरुन बंदुकीचा धाक दाखवून लूट

नवी मुंबई : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री १० वाजता तीन चोरांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले.…

3 लाख फेरीवाल्यांचा मंत्रालयावर मोर्चा

रमेश औताडे     मुंबई : सर्वोच्य न्यायालयाचे आदेश असताना फेरीवाला धोरण तयार करण्यास सरकार विलंब लावत असल्याने राज्यातील २०० पेक्षा जास्त फेरीवाला संघटना एकत्र येत असून मंत्रालयावर ३ लाख…

कोकण भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व तयारीची बैठक संपन्न

नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या…

टिटवाळा येथे बेकायदा चाळींची उभारणी करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल

कल्याण : टिटवाळा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा चाळींचे सर्वात मोठे आगर म्हणून डोंबिवलीतील ह प्रभाग ओळखला जातो. त्यानंतर टिटवाळा भागातील अ प्रभागाची गणना होते. टिटवाळा भागातील उंभर्णी भागात बनेली…

वाशी विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका फार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-१ (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काशीत करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये…

मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ठाणे : आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना…

डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा

नवी मुंबई : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादी व्यतिरिक्त ज्या इमारती प्रथमदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत अशा इमारतींना नोटीसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सूचित करावे तसेच अनधिकृत बांधकाम विरोधात…

मुंबईची पाणीकपात मागे

धरणांमध्ये ७३ टक्के साठा   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवार, २९ जुलैपासून मुंबईकरांवरील १० टक्के…

साई इंटरप्रायझेसचे संजय मुळे महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते जयपूर येथे पुरस्कार प्रदान     मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक श्री. संजय मधुकर मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र  भूषण जीवन गौरव” पुरस्काराने गौरविण्यात आले. जयपूर येथे नुकत्याच  झालेल्या “एक्सलंसी आयकॉनिक पुरस्कार वितरण समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या थ्री फिंगर्स इंटरटेनमेंट लि. च्या वतीने फाव फेअर्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी एक्सलन्सी आयकॉनिक अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा एक्सलंसी आयकॉनिक पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असलेल्या साई इंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा श्री. संजय मुळे यांची  उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यापूर्वी  संजय मुळे यांचा  एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे ‘उद्योगश्री जीवन गौरव’, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार’ २०१५, क्वालिटी  ब्रॅण्ड टाइम्स तर्फे  ‘क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार 2015,’ एज्युकेशन अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा ‘राष्ट्रीय निर्माणरत्न पुरस्कार २०१९’अशा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 00000000