Category: मुंबई

Mumbai news

मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे योगदान

मुंबई : मुंबईतील मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी सात हजार ११५ स्वयंसेवक मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी दोन…

३० वर्षांनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान

१९९५ मध्ये कोणाचं सरकार आलेलं? मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान २० नोव्हेंबरला पार पडलं. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान झालं. यावेळी मतदानादिवशी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात ६५.११ टक्के मतदान झाले, जे गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी ११९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यकरुन सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्या प्रचाराला दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरु शकते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.८५ कोटी मतदार होते, जे २०२४ मध्ये वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. त्यापैकी ५ कोटी पुरुष आणि ४.६९ महिला मतदार आहेत. यंदा ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३७७१ पुरुष तर ३६३ महिला उमेदवार आहेत. अधिक मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला…

‘धारावी प्रोजेक्ट’मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता- शरद पवार

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींच्या नावाचा उल्लेख करून भाजपा महायुतीवर निशाणा साधला गेला. प्रचारात उद्धव ठाकरेंकडून वारंवार धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून, मुंबई अदानींना विकायला काढल्याचा आरोप करण्यात आला. परंतु अदानींना धारावी प्रकल्पात इंटरेस्टच नव्हता, असा दावा शरद पवारांनी एका मुलाखतीत…

‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही…

नाना पटोले, सुप्रीया सुळेंवर बिटकॉईन स्कॅमचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे. मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी…

जगात भारत सर्वांधिक प्रदूषित

 पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे मुंबई : जगातील सर्वांधिक प्रदुषित शहरात भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जगातील पहिल्या दहा प्रदुषित शहरांपैकी तब्बल आठ शहरे भारतातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची…

पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संपण्यास काही तास राहिले असता स्वराज्य पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे. सेक्टर पाच येथील माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयासमोर सदर प्रकार घडला. मतदान…

चहाल वेळ नसते पण वेळेवर चहा मिळाल तर… मतदानाच्या धामधुमती उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी चहाचा कार्यकर्त्यांसमवेत असा आस्वाद घेतला.

मतदान संपले, आकड्यांचा खेळ सुरू महाराष्ट्रातही एक्झिट पोलचा ‘झोल’

 महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्याबाजूने , 3 मविआच्या बाजूने तर एकात कुणालाच बहुमत नाही मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तब्बल ६० टक्के मतदान झाले असून आता महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापुर्वीच महाराष्ट्रात एक्झिट…

केतकी धुरेची 158 धावांची नाबाद खेळी; भारत सीसीचा मोठा विजय 

– एमसीए महिला क्रिकेट लीग 2024   मुंबई : मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत सीसीने तिसऱ्या एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस सीसीविरुद्ध 97 धावांनी विजय मिळवला. न्यू हिंद मैदान, माटुंगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मंगळवारी केतकी हिने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना 116 चेंडूमध्ये 22 चौकार आणि 4 षटकारांसह झंझावाती दीड शतकी खेळी केली. तिच्या फटकेबाज शतकी खेळीमुळे भारत सीसीने डाव 40 षटकांत 6 बाद 261 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ग्लोरियस सीसीचा डाव 40 षटकांत 8 बाद 164 धावांवर संपला. साध्वी संजय (७७ धावा) आणि वैष्णवी वर्मा (४८ धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारत सीसीकडून कशिश निर्मल ३७ धावांत २ आणि निर्वाण राणे २६ धावांत २ विकेट घेत मोठा विजय आणखी सुकर केला. डॉ. डी. वाय. पाटील एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लबला १३७ धावांनी पराभूत केले. स्वरा खेडेकरची नाबाद शतकी खेळी (115 चेंडू, 12 चौकार) तसेच लावण्या शेट्टी (8 धावांत 3 विकेट),  वर्षा नागरे (28 धावांत 3 विकेट), प्रिया मेहताने आणि मेगन रॉड्रिग्जची (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. प्रथम फलंदाजी करताना डी.वाय. पाटीलने 40 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी केआरपी इलेव्हन सीसीला 24.3 षटकांत अवघ्या 80 धावांत गुंडाळले. एका अन्य सामन्यात, भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या जान्हवी काटेने (धावा 110, 103 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार) आणखी एक शतक झळकावून एकतर्फी सामन्यात फोर्ट यंगस्टर्स सीसीला व्हिक्ट्री सीसीविरुद्ध 83 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. संक्षिप्त धावफलक: भारत सीसी – 40 षटकात 6 बाद 261 (केतकी धुरे 158* (116 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार), लक्ष्मी सरोज 37; दिशा चांडक 2/24, वैष्णवी वर्मा 2/38) वि. ग्लोरियस सीसी – ४० षटकांत ८ बाद १६४(साध्वी संजय ७७, वैष्णवी वर्मा ४८; कशिश निर्मल २/३७, निर्वाण राणे २/२६). निकाल  – भारत सीसी ९७ धावांनी विजयी. डॉ. डी. वाय. पाटील एसए – 40 षटकांत 5 बाद 217 (स्वरा खेडेकर 100* (115 चेंडू, 12 चौकार); चेतना कांबळे 2/31) वि. केआरपी इलेव्हन सीसी –…