Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेसाठी १० लाखांची बक्षिसे जाहिर

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२४-२०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा रंगणार असून पुरुष गटातील पहिल्या ३२ तर महिला गटातील पहिल्या १६ विजेत्यांना मिळून एकंदर १० लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून बाहेर गावच्या खेळाडूंची निवास, चहापान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती प्रवेश अर्जासोबत असलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावरून करण्यात येईल.

चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई : उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने…

दिव्यांच्या चंदेरी सोनेरी तेजोमय प्रकाशाने न्हाऊन निघाली वाळकेश्वरची बाणगंगा 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात महिलाभगिनींचा मोठा सहभाग दिनेश मराठे  मुंबई : कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर शुक्रवारी सायंकाळी 7:30  ते 9:30 च्या दरम्यान पार्वतीपते हरहर महादेव च्या जयघोषात महामंगल असा देह चित्त भान हरपणारा नयनरम्य दीपोत्सव आणि महाआरती सोहळा मोठया हर्ष उल्हासात संपन्न झाला.या मनाला सुखद आनंद देणाऱ्या महाआरती सोहळ्याचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उत्तर प्रदेश येथील वाराणसी स्थित श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती साम्यमिंद्र तीर्थ स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्ष प्रविण कानविंदे,सेक्रेटरी शशांक गुळगुळे आणि सीईओ प्रोजेक्ट ऋत्विक औरंगाबादकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत केले. यंदाच्या 11 व्या वर्षी त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर भाविकांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या हर्षोल्हासात  ढोलताशाच्या गजरात हर हर शंभो जय शिव शंभूच्या जय घोषात दीपोत्सव आणि महाआरती संपन्न झाली.या महाआरतीला मुंबईसह ठाणे, डोंबिवली,कल्याण,कर्जत,कसारा येथून लोकं आली होती. बाणगंगेच्या दगडी पायर्‍यांच्या घाटावर बसलेल्या गंगाभक्तांच्या मुखातून हर हर महादेव आणि जय जय गंगे नमामी गंगे,हर हर शंभो जय शिव शंभूचा जयघोष सुरू होता.त्यात भगवी पताका डौलाने नाचवत ढोल ताशा पथकाने उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती. बाणगंगा काठावर सर्वत्र गगनभेदी घोषणा शंखनाद,केशरी ध्वज नृत्य, पाण्यात पोहणारे,बदकांचे थवे त्यात छोट्या 4 होड्यात फोटोसाठी छायाचित्रकारांची चाललेली लगबग,पायर्‍यावर बसलेली भाविक मंडळी पहायला मिळत होती.स्थानिक तरुण तरुणी, तर दूरवरून आलेले काही भाविक आपल्या पत्नी, लहानग्यांना घेऊन महाआरतीच्या जल्लोषात मग्न होती. त्यातही महिलांनी केलेला साजशृंगार  सर्वांचे चित्त आकर्षित करीत होती. चारही बाजूंनी दिव्यांचा लखलखाट प्रकाशमान होत असल्यामुळे येथे दीपोत्सवाच्या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बाणगंगेच्या किनारी उभारलेल्या खास सात स्टेजवर मंगलमय गणेश स्तुती,गंगा स्तुती, गीत गात सात षोडशी कन्या पारंपारिक वेषभूषा करीत भरत नाट्यम नृत्य करताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंदोत्सव झळकत होता. पौरोहित्य सादर करीत असलेल्या मंगलमय श्रीगणेश वंदना,रुद्र सूक्त,पुरुष सुक्त,श्रीसूक्त आणि शांती पाठाच्या मंगलमय वेद मंत्राच्या घोषाने वातावरणात अगदी वाराणसी येथील गंगा आरतीचा अनुभव निर्माण करीत होते तर किनारी बसुन मुली आणि  महिला गंगेत प्रज्वलन केलेले दीप सोडत होत्या.हे विलोभनीय वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते. हर हर महादेव या जयघोषात शिव तांडव स्तोत्र घेत उपस्थितांचे स्वागत केले गेले .प्रथम धूपारची, दीपारती आणि शेवटी महाआरती झाली.यावेळी सोहळे परिधान केलेले गळ्यातील रुद्राक्ष माला,भगवे अंगरखा या पारंपारिक वेषभूषा केलेले तरुण पुरोहित तालबद्ध होऊन महाआरती करीत होते. भाविकांनी पार्वतीपते हरहर महादेव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम च्या जय घोषात सारा बाणगंगा परीसर भाविकांनी  दुमदुमुन सोडला.त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, दुर्गे दुर्गटभारी, शिव तांडव स्तोत्र, पुरुष सूक्त,गंगा स्तुती, रामस्तुती,शिवपार्वती स्तुती आणि जल,वायू,आकाश, अग्नी आणि पृथ्वीचे आभार व्यक्त करीत वेद मंत्र,पौराणिक मंत्र म्हणत वातावरण एका दिव्य सोहळ्याचा आनंद भाविकांनी अनुभवला. येथील स्थानिक बाणगंगा रहिवाशी महिला पुरुष यानी घाट सजविण्यात मोठे सहकार्य केले.येथील घाटावर जागो जागी काढलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या रांगोळ्यांच्या…

ठाकरेंचा आदेश…गद्दारांना गाडा

स्वाती घोसाळकर कल्याण: कल्याणशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भावनिक नाते आहे. कल्याणचा गड शिवसैनिकांनी आपल्या घामाने राखलाय. कल्याणच्या या स्वाभिमानी भूमित शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मतदार करून गाडा असा आदेश आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

– एमसीए कार्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

जैन इरिगेशनचा रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कार्पोरेट ट्रॉफी टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनमध्ये जैन इरिगेशन अ संघाने रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय…

– महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन 2024

महिला एकेरीतील चार टॉप सीडेड खेळाडूंचे आव्हान संपुष्टात मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य खुली…

– मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा

मुंबईच्या बदामीची पुण्याचे घोडकेवर मात मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबईच्या हसन बदामीने सर्वोत्तम खेळ करताना  मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेमच्या ’15-रेड’ स्नूकरच्या राऊंड-रॉबिन सामन्यात पुण्याच्या…

आम्ही केले, तुम्हीही करा

  निवडणुकीमुळे २४ तास आपल्या कर्तव्यावर रुजू असणाऱ्या पोलिसांनी काल पोस्टल मतदान करत ‘आम्ही मतदान केले , तुम्हीही मतदान करा’ असं आव्हान सगळ्या मतदारांना केलं. वांद्राच्या खेरवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस…

राज्यात महायुतीची सत्ता येणार-नाथाभाऊ शेवाळे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्यव्यापी दौरा केला. या दौत्यामध्ये त्यांनी १६ जिल्ह्यातील ३५ मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी…

मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ

 प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास मुरबाड : मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली. पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविता आले नाहीत. बदलापूरातील `त्या’ घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे ठरविले आहे. मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोरील मैदानात भव्य सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. या वेळी लोकनेते गोटीराम पवार, कॉंग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोझा, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा घुडे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, रश्मी निमसे, कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रवक्ते महेश चौघुले, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय (सेक्यूलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगारनिर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे म्हटले. भाजपा हा संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला १८ व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात ४८ ठिकाणी सभा घेतल्यानंतर राज्यातील जनतेने पक्षफुटीबद्दल भाजपाला शिक्षा करण्याचे ठरविले असल्याचे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड मतदारसंघातील केळेवाडी येथील रस्त्याचे काम १५ वर्षात झाले नाही. या भागाला हेतुपुरस्सर टार्गेट करण्यात आले. काळू धरणाला विरोध असल्याचे सांगून, त्यांच्या बगलबच्च्यांकडून काळू धरणक्षेत्रातील गावांमध्ये घरपट्टीच्या पावत्या घेतल्या जात आहेत. जोता नसतानाही घर दाखवून लूट केली जात आहे. मुरबाड तालुक्याचा संबंध नसलेला समृद्धी महामार्ग हा अहवालात छापला गेला. वडोदरा एक्सप्रेसवेच्या बोगद्यात जाऊन फोटो काढले गेले. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, असा आरोप सुभाष पवार यांनी केला.मुरबाड मतदारसंघातील १५ वर्षांचा आमदार निधी हा उद्यान सुशोभिकरण व बाकड्यांमध्ये खर्च झाला. १५ वर्षांपासून अरेरावी व दादागिरी सुरू असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. तब्बल १५ वर्ष आमसभा न घेण्याचा पराक्रमही नोंदविला गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली. जनसेवा शिक्षण मंडळाला आपण तीन लाख रुपयांची अनामत रक्कम दिली असताना, माझ्याविरोधात संस्थेकडून पैसे घेतल्याचा खोटा प्रचार केला. त्यांना संस्थेचा कारभार माहिती नाही, असा टोला सुभाष पवार यांनी मारला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सेम नावाचा उमेदवार उभा केला गेला. मात्र, आताची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. जनतेसह कार्यकर्त्यांनीही परिवर्तनासाठी लढाई सुरू केली आहे. त्यामुळे परिवर्तन नक्कीच होईल, असा विश्वास सुभाष पवार यांनी व्यक्त केला. चौकट `सरकारचे शेवटचे पाच दिवस राहिलेत’ बदलापूर शहरासह मुरबाड मतदारसंघात बड्या माफियांच्या माध्यमातून दमबाजी करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी निष्पक्ष व समान भूमिका घ्यावी, असे आवाहन करतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांना आता या सरकारचे पाच दिवस राहिले आहेत, असा हसत हसत इशारा दिला.