Category: मुंबई

Mumbai news

आज अरविंद परांजपे यांच्या हस्ते स्वराज्यभूमी येथे ध्वजारोहण

मुंबई : २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची १६८ वी जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्याचे जनकाचे ऐतिहासिक समाधी स्थानामुळे पुनित झालेल्या गिरगाव चौपाटीचे २०१५ साली स्वाराज्यभूमी असे नाव शासनाने ‌जाहिर केले. २०२४…

प्रख्यात लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या ‘विश्लेषण’ या लेखन संग्रहाचे प्रकाशन

हे पुस्तक म्हणजे जणू ‘बौद्धिक पोस्ट मार्टम’ इति समाजसेवक डॉ.राजेश मढवी     मुंबई : मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्व.चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष…

आरक्षणावरून शरद पवारांची राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई:  महाराष्ट्राला शांततेची गरज आहे यात शंका नाही. मात्र आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका सामंजस्याची दिसली नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारचे कान टोचले. भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले…

मनोज जरांगेचा फडणवीसांवर हल्लाबोल

जालना : एकीकडे मराठा समाजाशी गोड गोड बोलायचं आणि दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे हा फडणवीस साहेबांचा डाव दिसतो. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची…

विधानसभेसाठी महाराष्ट्रातही ‘युपीचा फॉर्म्युला’

रमेश औताडे  मुंबई :सर्वात जास्त खासदार निवडणुकीत जिंकून आलेले उत्तरप्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात समाजवादी पार्टीच्या करिष्म्याने मोदी सरकारला धक्का दिला. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीने जे…

मुंबईतील शिया मुस्लिमांनी प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन इब्न अली यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून. मोहरमच्या काळात समाजाचे सदस्य काळे कपडे घालतात, मजलिस करतात आणि मिरवणूक काढताना दिसत आहेत.

शिवरायांची वाघनखं साताऱ्यात दाखल

सातारा :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात आता ही वाघनखे दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून…

बा विठ्ठला ! देशातील प्रत्येकाला सुखी कर

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे पंढरपूर : वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे. देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे. या व्यतिरिक्त आपण देवाला काही मागत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक)  यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर, भरतशेट गोगावले, आ. समाधान आवताडे, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ॲड. किर्तीपाल सर्वगोड उपस्थित होते. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळालं आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत. मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. भाविकांना योग्य सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिघे पंढरपूर येथे मुक्कामी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी. पर्यावरण राहिले तर आपण राहू. त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील 15 वर्षांपासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले. तसेच एक वारकरी, एक झाड ही संकल्पना आहे. पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय. 20 लाख बांबूची रोपे लावणार आहोत. बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आले. आपण फक्त कोणाला बांबू…. तो पण लावावा लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने लावावा लागतो. माणसाला पण शेवटी बांबूच लागतो, अशा शब्दांत शिंदेंनी राजकीय फटकेबाजी केली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. वारकऱ्यांसाठीच्या योजना, महामंडळाबात माहिती दिली. तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का, या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी…

खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे भोवले;

     पालिकेच्या २ अभियंत्यांना नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई     मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.…

सायन उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसाठी बंदी

    पुल धोकादायक असल्याने प्रवास टाळावा     मुंबई : सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून अवजड वाहने…