दिंडीतून दाखवली गोरा कुंभाराची कथा
भजनी मंडळींचा रेल्वे स्थानकात दिंडी सोहळा मुंबई : विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा… ज्ञानोबा माउली तुकाराम, असे म्हणत मुंबईतील वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या सकाळी ७.३० वाजल्यापासून चर्चगेट स्थानकात दाखल…
Mumbai news
भजनी मंडळींचा रेल्वे स्थानकात दिंडी सोहळा मुंबई : विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा… ज्ञानोबा माउली तुकाराम, असे म्हणत मुंबईतील वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या सकाळी ७.३० वाजल्यापासून चर्चगेट स्थानकात दाखल…
विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर महिनाभरात १, ८१३ गुन्हे मुंबई, ता. १७ : घराजवळील बाजारात-दुकानात जाण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी अशी विविध कारणे देत काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने…
मुंबई : नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमधील दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने मुंबई महानगर प्रदेश…
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे मुंबई :महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे राज्य खो खो पंच शिबीर दि २७ व २८ जुलै रोजी हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन…
मुंबई : दादर येथील आंबेडकर भवनमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या १३वी मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खेलो तायकोंडो अकादमीच्या खेळाडूंनी २७ सुवर्ण पदके जिंकून शानदार कामगिरी केली. तसेच त्यांच्या…
नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज लाखोंच्या घरात मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण…
नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने ज्या…
मुंबई : एजीस लॉजिस्टिकचे किरण तरे यांना युनियनच्या प्रयत्नाने तीन लाख रुपयांची मदत करण्यात आली. मुंबईमधील माहुल येथील एजीस लॉजिस्टिक ही एक नामवंत मल्टीनेशनल कंपनी असून, माहुल येथील काम करणाऱ्या कामगारांचे सेवाशर्ती व पगारवाढ इत्यादीचे प्रश्न मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचेअध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याधर राणे आणि विकास नलावडे हे पाहतात. किरण तरे हे गेली अडीच वर्षे आजारीअसल्याने कामावर येत नव्हते. कंपनीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश गुरखे, जनरल मॅनेजर प्रवीण जांगडे यांच्यासोबत युनियन पदाधीकाऱ्यांची बोलणी होऊन किरण तरे याना त्यांच्या गैरहजर कालावधीचा पंगार त्यांच्या रजेमध्ये एडजस्ट करून त्यांचा ऐच्छिक सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला. या व्यतिरिक्त त्याना तीन लाख रुपये विशेष अर्थसहाय्य देण्यात आले. ॲड. एस. के. शेट्ये आणि विद्याधर राणे यांच्या विनंतीला गिरीश गुरखे , प्रविण जांगडे यांनी सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीमधील युनियनचे प्रतिनिधी जयेश तावडे, एम . एच. साखरे, डी. एल. बोराडे व इतर कामगार प्रतिनिधीनी यासाठी यूनियनपर्यंत श्री. तरे यांचे प्रतिनिधित्व केले. याबाबत श्री. तरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 0000
अशोक गायकवाड अलिबाग : राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी १५६ ई-शॉप वाहनांचे वाटप करण्यात येत आहे. या वाहनांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगळवारी (ता.१६) पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे १५ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसात घरपोच वाहन पोहचविले जाणार आहे. राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबविणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांना रोजगार करता यावा यासाठी ई-शॉप वाहन ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव ७१, मागासवर्गीय बचतगट २८, महिला बचतगट ५७ लाभार्थ्यांना ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते १५ लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करून करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, समाजकल्याण अधिकारी श्यामराव कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणस्नेही ई-शॉप वाहन सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे आहे. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिजाइन करण्यात आले आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांग बांधव, बचतगटांना रोजगार प्राप्त होणार आहे. *चौकट* सर्व विभागांचा ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या निधीतून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी ई-शॉप वाहन देण्याचे निश्चित केले. याचबरोबर महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. ही योजना यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. *-डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड*
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष भिवंडी : शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे.…