Category: मुंबई

Mumbai news

तनय मेहेंदळे, शिवानी हेर्लेकरला टॉप सीडिंग

-आजपासून महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा   मुंबई : ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) अंतर्गत एनएससीआय आयोजित 14 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार्‍या योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तनय…

विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत आज सकाळी ११ वाजता

ठाणे जिल्ह्यात एक कोटीहून अधिक नागरिक घेणार सामूहिक मतदार शपथ   नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत…

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआला विजयी करा – कन्हैयाकुमार

धारावी, सायन कोळीवाड्याच्या जमिनीवर मोदीच्या मित्राची नजर, धारावी बचाओसाठी मात्र काँग्रेस धारावीकरांबरोबर   मुंबई : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी…

भाजपाची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पोकळ घोषणा;

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या पाठीमागे भाजपाचे कायम पाठबळ – आराधना मोना मिश्रा   मुंबई : भाजप आणि रास्वसंघाची महिलांबाबतची भूमिका कायम अन्यायी राहिली आहे. महिला अत्याचारांबाबत मणिपूर ते मुंबई असा…

विधानसभेसाठी २० तारखेला जागरुक नागरिकाची भूमिका बजावा; मविचाच मुख्यमंत्री होणार–वर्षा गायकवाड.

निवडणूक आयोग फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासणार का? सत्ताधारी पक्षावर कारवाई कधी करणार?   मुंबई : मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीलाच आपला कौल महाविकास आघाडीला देऊन विधानसभेचा निकाल दिला आहे. लोकसभेला ६ पैकी…

महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा ‘मेगा प्लॅन’

राहुल गांधीसह, प्रियंका,खरगें, पायल, रेवंता रेड्डी, सिद्धरामय्यांच्या सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी काँग्रेसने मेगाप्लान आखला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत  कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा…

नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली

स्वाती घोसाळकर मुंबई: भाजपचा विरोध झुगारुन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. एन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिक यांचा जामीन रद्द…

‘ठाकरें’साठी सरवणकरांनी तडजोड करायला हवी होती – नांदगावकर

सिध्देश शिगवणकर मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण  लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना नांदगांवकर म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट…

वाचन संस्कृती लोप पावली नसून माध्यम बदलले आहे – संदीप चव्हाण   

मुंबई : वाचन संस्कृती लोप पावली नसून वाचनाचे माध्यम बदलले आहे. दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याची ओळख होण्यास मदत होत असल्याचे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले. विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ल्याच्या नेहरू नगर येथील नागरिक मंडळाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून प्रकाशित झालेले 110 दिवाळी अंक मांडण्यात आले असून हे अंक रसिकांना भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सदामंगल प्रकाशनचे आभार मानले. विहंग प्रतिष्ठानने महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख दिवाळी अंक प्रदर्शनातून जपली आहे. जेष्ठांनी वाचनाची आवड जोपासली तर नवीन पिढी मोबाइल वाचनातून पुन्हा पुस्तक वाचनाकडे वळू शकेल. मात्र वाचन हे कायमच राहील, असा आशावाद संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. रही भिडे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाद्वारे विविध साहित्यिकांच्या दिवाळी अंकातील साहित्याची ओळख करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळा चे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग गोरे होते. यावेळी महाराष्ट्र दिनमानचे संपादक विनोद साळवी, पत्रकार हेमंत सामंत, सदामंगलच्या संपादक प्रज्ञा जांभेकर, व्यवस्थापक प्रशांत शिंदे, विधी आयोगाचे माजी सदस्य प्रिन्सिपल डी. एन. संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्जुक्ता मोकाशी-राव यांनी केले. हे प्रदर्शन रविवार 10 नोव्हेंबर पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले असून सवलतीच्या दरात रसिकांना अंक विकत घेता येतील. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी सहा वाजता स्वरगंध वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी;

कांदिवली येथील ‘रक्तदान शिबीरास’ भरघोस प्रतिसाद मुंबई दि (प्रतिनिधी)  :  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली…