Category: मुंबई

Mumbai news

१५ जुलै पासून एसटीच्या प्रत्येक आगारात, प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

मुंबई, प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सुचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येत आहे. या…

वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश ! अनिल ठाणेकर     मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मराठी माणसाच्या उद्योग व्यवसायासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ची कार्यशाळा

रमेश औताडे     मुंबई : चायना देश पिन ते पियानो सारख्या वस्तू बनवतो. मात्र त्याचे मार्केटिंग करण्यात कुठेच कमी पडत नाही. म्हणून त्यांच्या वस्तू माफक दरात व सहज उपलब्ध…

विशालगडावरील मशीद बांधकामाविरोधात आंदोलन

रमेश औताडे       मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले व दुर्ग यांची अवस्था वाईट असताना कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधकाम होत आहे. या विरोधात शिवप्रेमींनी आझाद…

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन       मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना…

मुख्यमंत्री असणाऱ्या भावाकडे आपल्या मागण्या घेऊन आलेल्या आझाद मैदानातील बहिणींची भर पावसात झालेली अवस्था

माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई : मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना प्रवास करताना दररोज विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या धीम्या रेल्वे मार्गाच्या रुळाला शुक्रवारी दुपारी १.०५ वाजेच्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे लोकलचा वेग मंदावला. संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर, माटुंगा येथे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी १.३९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

पंढरपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत डॉ.राजेश मढवीकडून माऊलींचे सेवाकार्य….

माऊलीच्या चरणी सेवा योग!   मुंबई : महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरिचा वास! चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन विठोबाचे! या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत;अशी भागवत संप्रदयाची धारणा आहे. अशा या पंढरपुर वारीत यंदा ४० व्या वर्षात डॉ.विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा देतात. सालाबादप्रमाणे यंदाही  डॉ.राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने डॉ.राजेश मढवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथिल आरोग्य शिबीरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबीरात हजाराच्यावर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप,अतिसार,उच्च रक्तदाब,जुलाब, अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे,पाय दुखी साठी तेलवगैरेने मसाज अशा सेवा देण्यात आल्या.यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉ.विश्वास सापटणेकर डॉ. राजेश मढवी,डॉ. बेके,डॉ. राव, डॉ. बापट, ज्योती हर्डीकर,रवींद्र कराडकर, विनय नाफडे,निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते. ००००

म्हाडाच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या छताचा भाग कोसळल्याने रहिवाशी संतप्त

रमेश औताडे       मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींबाबत सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असतानाच काही ठिकाणी इमारतींमधे छताचा भाग कोसळणे तर काही ठिकाणी ईमारत खाचने, पडणे अशा घटना घडत आहेत. मानखुर्द येथील पी एम जी पी कॉलनीत जीर्ण झालेल्या  इमारतीचा छताचा भाग कोसळल्याने भयभीत झालेले रहिवाशी संतप्त झाले आहेत. ईमारत क्रमांक २० मधील पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. पहाटे घटना घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यापूर्वीही अशा छोट्या घटना घडल्या असल्याने तात्पुरती मलमपट्टी करून प्लास्टर करण्यात येत होते. अशी तात्पुरती मलमपट्टी अजून किती दिवस करत राहायची ? असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमचा जीव गेल्यावर सरकार लक्ष देणार आहे का ? निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात व आश्वासन देऊन जातात.छताचा भाग पाडून आमचा जीव जाणार आहे. लोकप्रतिनिधींचा नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी देत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारे नाले योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात छताचा भाग कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे. पुनर्विकास होण्यासाठी येथील काही रहिवाशी प्रयत्न करत आहेत मात्र काही रहिवाशी त्यांना सहकार्य करत नसल्याने नवीन टॉवर मध्ये राहण्याचे स्वप्न पाहून एक पिढी वयोवृध्द झाली आहे. त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्यासाठी व छताचा भाग कोसळून जीवित हानी होण्याअगोदर सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत. ०००००

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे विठ्ठल भक्तिपर गीतांचा सांगीतीक कार्यक्रम

मुंबई- मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ ही संस्था सातत्याने ११ वर्षे वाद्यवृंद निर्माते व कलावंताच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने बुधवार  दि .१७ जुलैला सायंकाळी ५ वाजता  अण्णाभाऊ साठे…