Category: मुंबई

Mumbai news

 मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का?

उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा   मुंबई : विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखित करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर मग पालिका अधिकारी नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करतात, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासानाला केली. महापालिका अधिकाऱ्यांना कशाचीच भीती राहिली नाही का ? अशी विचारणाही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतानाही त्याचे पालन करण्याकडे उघडपणे दुर्लक्ष करण्यात येते, त्यांचे आदेश मनमानी पद्धतीने धुडकावून लावले जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची ही अशी वागणूक खपवून घेतली जावी का ? असा प्रश्न करून याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सविस्तर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले. विलेपार्ले (पश्चिम) येथील विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखन प्रस्तावित आहे. परंतु, या रस्त्याच्या कामामुळे एका चर्चचे बांधकाम बाधित होणार असल्यामुळे रस्त्यांच्या संरेखनात बदल करण्याची मागणी ‘पेंटेकोस्टल मिशन सोसायटी’सह अन्य रहिवाशांनी केली होती. सुरुवातीला महापालिकेने लगतचा भूखंड याचिकाकर्त्यांना देऊ केला होता. परंतु, नंतर भूखंड वाटप करण्याची कायद्यात तरतूद नसल्याने पालिका प्रशानाने निर्णय फिरवला. त्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी १६ मे रोजी महापालिका आयुक्तांना या प्रकरणाची योग्य ती तपासणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर, याचिकाकर्त्यानी १० ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निवेदन दिले. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या संबंधित आदेशाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. परंतु, याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर केल्याकडे न्यायालयाने पालिकेच्या वकिलांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

 वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या!

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश   मुंबई : हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. लस कधी घ्यावी? इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.

 बालदिनी क्रिएटीव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

टच संस्थेच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई : ‘टच'(टर्निंग अपॉर्चुनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही स्वयंसेवी संस्था १९९३- ९४ पासून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या विकासासाठी महाराष्ट्रभर कार्यरत आहे. दुर्गम, डोंगराळ,…

विधानसभा निवडणुकीत मद्याचा महापूर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करी, मद्यसाठ्याविरोधात मोहीम हाती घेतले होते. यामध्ये अवघ्या २३ दिवसांत पाच हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून साडेचार…

रीगन, शर्वेय, मुक्ता, अनन्या अंतिम फेरीत

 जेव्हीपीजी-टीएसटीटीए टेबलटेनिस स्पर्धा मुंबई,  8 नोव्हेंबर: द सबर्बन टेबलटेनिस असोसिएशनच्या (टीएसटीटीए) मान्यतेने जेव्हीपीजी-टीएसटीटीए फाईव्ह स्टार जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत रेगन अल्बुकर्क, शर्वेय सामंत तर मुक्ता दळी आणि अनन्या चांदेने अंतिम फेरीत धडक मारली. जेव्हीपीजी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रीगनने विनीत दीपकचा ११-७, ११-७, ११-६, ११-६ असा पराभव केला. शर्वेया सामंतने युवराज यादववर ५-११, ११-६, ११-३, १४-१२, ११-६ असा विजय मिळवला. महिला एकेरीत मुक्ताविरुद्ध संपदा भिवंडकरवरने दुखापतीमुळे पहिल्या गेमनंतर माघार घेतली. त्यावेळी मुक्ता ही १-०(११-५) अशी आघाडीवर होती. अन्य लढतीत अनन्याने सिया हिंगोराण्यावर ११-८, ११-६, ११-८, ११-७ अशी मात केली. निकाल (उपांत्य फेरी) – 17 वर्षांखालील मुली: मायरा सांगलेकर विजयी वि. वैष्णवी जैस्वाल 11-7, 11-2, 11-1; निवा चौघुले विजयी वि. उर्वी चुरी 11-6, 8-11, 11-9, 11-13, 11-8. 17 वर्षांखालील मुले: अक्षांश साहू विजयी वि. झैन शेख 11-5, 13-11, 11-7; ध्रुव शहा विजयी वि. अर्णव क्षीरसागर 11-8, 10-12, 6-11, 13-11, 12-10. 19 वर्षांखालील मुली: अनन्या चांदे विजयी वि. श्रावणी लोके 6-11, 11-13, 11-4, 13-11, 11-8; उर्वी चुरी विजयी वि. मुक्ता दळवी 7-11, 11-5, 11-5, 11-7 .…

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीपर उपक्रम

अशोक गायकवाड नवी मुंबई :महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक कार्यालये तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत आज बिंदू माधव नगर दिघा येथील महिला बचत गटांना एकत्रीत करीत मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली व २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या परिचितांना मतदान करण्याचे आवाहन करावे असेही सूचित करण्यात आले.* अशाचप्रकारे दिघा विभाग कार्यालयातील कर्मचारी व स्वच्छता मित्र यांनीही एकत्रीत येत मतदान करण्याचा निर्धार केला व मतदानाची प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली.ऐरोली येथील चिंचपाडा भागातही मागील निवडणूकीत कमी प्रमाणात मतदान झाले अशा मतदान केंद्रांच्या परिसरात गृहभेटी देत जनजागृती करण्यात आली व मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले.वाशी येथे सेक्टर १६ येथील मुख्य चौकात उपस्थित नाका कामगारांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले.६ नोव्हेंबर रोजी नेरुळ रेल्वे स्थानक, नेरुळ बस डेपो, सेक्टर १५ अभ्युदय बँके समोरील रिक्षा स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना एकत्र करुन मतदाना विषयी जनजागृती करण्यात आली तसेच मतदानाची प्रतिज्ञाही घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात ठेवलेल्या मतदार जनजागृती सेल्फी स्टँडीवर अनेक नागरिकांनी छायाचित्रे काढून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली व इतरांनीही मतदान करावे असे आवाहन केले.रबाळे गाव येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित डॉक्टर, कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत मतदार जागरुकता प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.त्याचप्रमाणे गोठीवली गाव येथील विश्वास बहुउद्देशीय विकास संस्थेमधील महिला सदस्यांशी सुसंवाद साधत त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोलीच्या स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे व बेलापूरचे स्वीप नोडल अधिकारी सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

 ‘कालनिर्णय’तर्फे आयोजित ‘पाकनिर्णय २०२४’  आणि लघुकथा या स्पर्धांचे पारितोषिक वितरण

 ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन,   मुंबई : जागतिक पातळीवरील सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय’ने अलीकडे आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले तर त्यांच्या कालनिर्णय सांस्कृतीक दिवांळी अंकाला ३६ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय पाकनिर्णय’ पाककला स्पर्धा तसेच ‘लघु लघुकथा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफिलीचे आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे करण्यात आले. यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी कालनिर्णयचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या आईबाबांकडे मराठी कालनिर्णय असते तर सासूबाईकडे तमिल कालनिर्णय असते, असा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, कालनिर्णयचे सर्वसामान्यांशी शतकानुशतकांचे नाते आहे, अशीच सर्वांची भावना आहे. “कालनिर्णयला ५० वर्षे झाली आहेत, पण मला ते खरे वाटत नाही. कालनिर्णय त्याआधी नव्हते तर मग हे जग चालले कसे, असें प्रश्न पडतो आणि कालनिर्णय शतकानुशतके होते, अशीच आमची भावना आहे. कालनिर्णयने कोविडचा काळ सुखकर केला, आमच्या घरात आई-बाबा नातेविकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लिहून ठेवण्यासाठी आणि त्यानुसार शुभेच्छा देण्यासाठी कालनिर्णयचा वापर करतात. तारखांच्या मागचा मजकूर वाचनीय असतो आणि ते वाचत आम्ही मोठे झालो.” त्या म्हणाल्या. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या. कालनिर्णय दिवाळी अंकाचे संपादक जयराज साळगावकर म्हणाले, “दीवाळी अंकाचे अर्थकारण आणि वाचकांची मानसिकता या दोन्ही गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रकाशक आणि संपादकांपुधील एक मोठे कोडे आहे. दिवाळीतील उटणे, झेंडू फुले, मोती साबण यांप्रमाणे दिवाळी अंक एक कमॉडीटी झाली आहे. सुसंस्कृत वाचक कमी झाले आहेत. चांगला मजकूर देवूनही लोक हल्ली वाचत नाहीत. आणि हे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. दिवाळी अंक बंद पडतील असे नाही पण ते बंद पडू नयेत म्हणून आपण या अंकांचा फॉर्म मात्र बदलायला हवा. म्हणूनच आम्हीं यंदाच्या दिवाळी अंकात लघुकथा द्यायचे ठरवले. पूर्णि टके बंद पडत होती, पण त्या क्षेत्रात काही चांगले प्रयोग झाले आणि नाटके सर्व्हाइव्ह झाली आहेत.” साळगावकर पुढे म्हणाले, “वाचाकाशिवाय लेखकाला किंमत नाही. वाचक हा खऱ्या अर्थाने चालक असतो. अपनील मराठी संस्कृती अशी की आर्थिक अद्चानिठी उत्साहाने नवनवीन दिवाळी अंक येतात. ते एक व्यासपीठ आहे आणि ते जिवंत राहिले पाहिजे आणि तसे होईल याची मला पूर्ण खात्री आहे. गेली  ३६ वर्षे आम्ही कालनिर्णय दिवाळी अंक काढतो आहे. खर्च खूप होतो पण तोटा होत नाहीत, नफा कमी प्रमाणात होतो, अशी परिस्थिती आहे.” कालनिर्णय प्रकाशनच्या शक्ती साळगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले, “आमचे परीक्षक आणि  स्पर्धक यांच्याकडून अम्हालाक खूप प्रेम मिळाले आणि त्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. हेतू पाककृती शोधणे आणि त्यातील उत्कुष्ट पाककृतींचा गौरव करणे यासाठी हे आयोजन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत इंस्टंट मिक्सेस खूप लोकप्रिय झाली. युध्यात गेलेल्या पुरुषांच्या गैरहजेरीत मुले व स्त्रियाना घराबाहेर पडावे लागत होते आणि त्यामुळे स्वयाम्पाकाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे इंस्टंट फूडकडे घरांचा कल वाढू लागला. प्रत्येक पाककृती ही त्या त्या वेळच्या संस्कृतीचा अभ्यास करते. खाद्यसंस्कृती ही त्यावेळच्या सामाजीक, वैचारिक आणि आर्थिक परीस्थितीचा आढावा घेत असते. या खाद्यसंस्कृतीचे आणि आमचं पाककृती स्पर्धेचे कर्तेधर्ते स्पर्धक आणि परीक्षक आहेत.” ‘कालनिर्णय’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ‘कालनिर्णय पाकनिर्णय २०२४’  तसेच ‘लघु लघुकथा’ या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ या सोहळ्यात आयोजित करण्यात आला. तसेच  ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४’चे प्रकाशनही यावेळी झाले. यावेळी  ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ ही मराठी भावगीतांची सांगीतिक मैफिल पार पडली. त्यालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांगीतिक मैफलीमध्ये मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे या गायक कलाकारांनी गाणी सादर केली. कुणाल रेगे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. 00000

एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा १० नोव्हेंबरला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत  शंभराव्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन १० नोव्हेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे बालदिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या…

उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी

उल्हासनगर : उल्हासनगर म्हणजे युएसए हे उघोगाचे माहेरघर असून लहानपणी येथील वस्तू खरेदी केल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी सभेत केली. तसेच उधोगशील शहर गुंडा मुक्तीसाठी कुमार आयलानी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन लाडक्या बहिणीना यावेळी केले. उल्हासनगर टाऊन हॉल मध्ये गुरुवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन केले होते. हॉल मध्ये लाडक्या बहिणीने एकच गर्दी केली होती. तुम्हच्या आत्मसन्मानसाठी लाडली बहीण योजना सुरु राहणार असल्याचे मुंडे यांनी सभेत सांगितले. उल्हासनगर हे उघोगशील शहर असून युएसए नावाने प्रसिद्ध आहे. याच शहराच्या वस्तू आम्हच्या घरात लहानपणी येत असल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र शहर गुंडा मुक्त करण्यासाठी कधी पाठीमागे राहणाऱ्या कुमार आयलानी यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. सभेला कुमार आयलानी, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, शिंदेसेनेचे पक्ष प्रवक्ता किरण सोनावणे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, भाजपचे लाल पंजाबी, डॉ प्रकाश नाथानी, लाल पंजाबी यांच्यासह रिपाई व पीआरपी पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्याोग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांमध्ये कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांच्या मालकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी दिला. भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या सूचनांनुसार मुंबई शहर व उपनगरांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील मतदारांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध नियम जारी करण्यात आले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत गगराणी यांनी आदेश दिले आहेत. सर्व उद्याोग समूह, महामंडळ, कंपन्या व संस्था, औद्याोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना हा नियम लागू होणार आहे. लोक प्रतिनिधीत्व अधिनियमानुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असल्यास मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही. सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनांच्या मालक वा पदाधिकाऱ्यांविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे उद्याोग विभागांतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्याोग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशही गगराणी यांनी दिले. वेतनात कपात करता येणार नाही… अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधिकारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. मात्र, अशा सवलत प्रकरणांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. दरम्यान, सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही आस्थापनाच्या मालकांनी उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.