Category: मुंबई

Mumbai news

 राज्यातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर

 प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये   मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बक्षीस रकमेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक रु. १,००,०००/- (रुपये एक लाख) व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार), तृतीय पारितोषिक रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार) अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येतील. तसेच, उत्कृष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास ७५०० रूपये अशी पारितोषिके आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, द्वितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तृतीय क्रमांकास १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. गतवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केल्याप्रमाणे या वर्षीपासून डिजिटल दिवाळी अंकांसाठीही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क रु.१००/- रोख, धनादेश अथवा डी.डी.द्वारे दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्पर्धा समन्वयक शैलेंद्र शिर्के आणि दीपक म्हात्रे यांनी केले आहे. अंक पाठविण्याचा पत्ता :     अध्यक्ष/कार्यवाह मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, सी.एस.टी., मुंबई – ४००००१. फोन : ०२२-२२६२०४५१/२२७००७१५ आपला, (शैलेंद्र दिनकर शिर्के) कार्यवाह आणि स्पर्धा समन्वयक मुंबई मराठी पत्रकार संघ ९९८७०६३६९९

भारतातील नाविक कामगारांचा एकता दिन संपन्न

मुंबई : भारतातील जहाजावरील नाविक कामगारांचा ६  नोव्हेंबरला दरवर्षी एकता दिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेच्या वतीने मस्जिद बंदर येथील सिमेंनस् हॉस्टेलच्या आगाशीवर…

नवीन महाबळेश्वरला केवळ १०० सूचना-हरकती,

आराखड्यावर सूचना-हरकती नोंदविण्यासाठी अखेरचे ४ दिवस मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) साताऱ्यात नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीकडून प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या…

दिवाळीचा पहिला दिवा शेतकरी आणि सैनिकांसाठी

 बोरीवली येथे राबविली विजय वैद्य यांची संकल्पना मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बोरीवली (पुर्व) येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या राकेश वायंगणकर यांनी दिवाळीचा…

मराठ्यांचा लढा वाया जाऊ देणार नाही- जरांगे

जालना : आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि…

राहुल गांधीची आज मुंबईत प्रचारसभा

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आज बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान…

लाडक्या बहिणींना वंचित ३५०० देणार !

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लाडक्या बहीण योजनेत उडी घेत आता ३५०० रुपये महीना देण्याची घोषणा करीत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द…

मनसेचे सरकार कुणालाच काही फुकट देणार नाही- राज ठाकरे

लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल यवतमाळ : लाडक्या बहीणींना फुकटात कीती जास्तीत जास्त पैसे द्यायचे यावरून सर्वच पक्षात चढाओढ सुरु असताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र मनसेचे सरकार आल्यास या…

देवरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

शोभायात्रेसाठी पाचशे रुपये देऊन कार्यकर्ते आणल्याचा आरोप मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार केली…

उद्धव ठाकरेंनीही कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकलं

ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशीच आहे,  गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारचं राधानगरी : एकीकडे महायुतीने आज कोल्हापूरातून प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडला. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख…