Category: मुंबई

Mumbai news

दादर-माहीमधून पहिला ठाकरे उभा राहीलाय –

राज ठाकरेंची अमितसाठी भावनिक साद मुंबई : “जे आधी घडले नाही ते आता घडतंय. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली. अनेक आमदार झाले, ठाकरेंचा प्रवास हा दादर, प्रभादेवी, माहीमपासून सुरु झाला. आज याच दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदाच…

मविआचा महाराष्ट्रनामा

०लाडक्या बहीणींना महिना तीन हजार ०महिलांना मोफत बसप्रवास ० प्रत्येकी ५०० रुपयांत वर्षाला सहा गॅस सिलिंडर ० महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा० बेरोजगार युवकांना महिना ४००० ०शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्जमाफी ०…

भाजपाचे ‘संकल्प पत्र’

लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये ० शेतकऱ्यांना कर्जमाफी ० वृद्धांना २१०० रुपये पेन्शन ० शेतकऱ्यांना वर्षाला १५००० रुपये ० २५ लाख रोजगारांची निर्मिती ० १० लाख विद्यार्थ्यांना वेतन स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा…

वर्धापनदिन संगीत महोत्सव

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वर्धापनदिन संगीत महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव संस्थेच्या वा . वा . गोखले (वातानुकूलित ) सभागृहात होणार आहे. शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आग्रा , ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची असून संवादिनी वर ओंकार अग्निहोत्री आणि सारंगीवर गुरुप्रसाद हेगडे  साथ करणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता पं . पन्नालाल घोष घराण्याचे बासरीवादक पं. सुदीप चट्टोपाध्याय यांचे बासरीवादन होणार असून त्यांना तबल्यावर साथीला आहेत पं. अनुतोष देघारिया. महोत्सवाचा समारोप रविवार दिनांक १७ नोव्हेंबर या दिवशी होत असून सायंकाळी पाच वाजता बनारस घराण्याचे सुविख्यात गायक पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे . त्यांना स्वरसाथ स्वरांश मिश्रा करणार असून तबला साथ मंदार पुराणिक आणि संवादिनी साथ सिध्देश बिचोळकर करणार आहेत. संस्थेतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना या महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०

संत कृष्णदास महाराज सत्संगची

  दादरमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मुंबई : संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी कार्तिक एकादशी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही दिंडी दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार येथून सकाळी साडे आठ वाजता सुरू होईल व त्याची सांगता श्री. विठ्ठल मंदिर, रानडे रोड, दादर येथे होईल. भवसागरामध्ये अडकलेल्या सर्वच भक्त भाविकांना पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनास जाणे शक्य होत नाही. म्हणून संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने कार्तिकी एकादशीला भक्तांना दिंडीचा आनंदघेता यावा, यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

एलआयसी-आयडियल बुध्दिबळ स्पर्धा

राघव, अहान, नील, आद्विक विजेते मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेचे विविध वयोगटातील विजेतेपद मुलांमध्ये राघव संचेती, अहान जॉली, नील भंडारी, आद्विक अगरवाल यांनी तर मुलींमध्ये आध्या पाठक, आराध्या पुरो, अक्षा मंगलापल्ली, आर्या नाईक यांनी जिंकले. ७ वर्षाखालील गटात पाचव्या निर्णायक साखळी फेरीमध्ये राघव संचेतीने अपराजित शंतनू जोशीची (४ गुण) विजयी दौड रोखली आणि सर्वाधिक साखळी ४.५ गुणासह प्रथम स्थानावर झेप घेतली. परिणामी शंतनू जोशीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शर्विल मामळूस्करने (४ गुण) तृतीय, डेत्यन लोबोने (३.५ गुण) चौथा, तत्त्वा शेजवळने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम व निकिता संदीपने (३ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला. ९ वर्षाखालील मुलांमध्ये अहान जॉलीने (४ गुण) प्रथम, कृषिव गालाने (३.५ गुण) द्वितीय, अगस्त्य गुरवने (३ गुण) तृतीय, कबीर पिंगेने (३ गुण) चौथा, मार्तंड गजणेने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आराध्या पुरोने (४.५ गुण) प्रथम, आराध्या कामतने (२.५ गुण) द्वितीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये नील भंडारीने (५ गुण) प्रथम, कविर मोदीने (४ गुण) द्वितीय, अनय भांगरेने (३ गुण) तृतीय, आर्यन झाने (३ गुण) चौथा, संकीत संघवीने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अक्षा मंगलापल्लीने (३ गुण) प्रथम, सिम्रिता बुबनाने (२ गुण) द्वितीय आणि १३ वर्षाखालील मुलांमध्ये आद्विक अगरवालने (५ गुण) प्रथम, देवांश राठोडने (३ गुण) द्वितीय, फेरद्यन लोबोने (३ गुण) तृतीय, समर्थ साळगावकरने (३ गुण) चौथा, स्मित रेवस्करने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या नाईकने (४ गुण) प्रथम, शहाना कृष्णनने (३ गुण) द्वितीय पुरस्कार पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सेक्रेटरी राजन राणे, क्रीडाप्रेमी विलास डांगे व चंद्रकांत करंगुटकर, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

अभिषेक बजाज, राहुल सचदेवची आगेकूच

मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स…

अजित पवारांची चाय पे चर्चा… खराडी येथील चंदनवाडी येथे प्रचारादरम्यान अजित पवारांनी चायचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली…

महायुतीसाठी पैशांचे वाटप पोलिस व्हॅनमधून केले जातेय

अनिल परबांचा खळबळजनक आरोप मुंबई, दि. ०८ – (प्रतिनिधी)- कायदा आणि पैशांचा दुरुपयोग करून सरकार कोसळवली जात आहेत. पैशांचा जोर असाच राहीला तर येणाऱ्या काळात उद्योगपती अदाणीही पंतप्रधान झाल्यास आश्चर्य…

विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली

सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई   मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत ८० कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यातही दसरा, दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकट्या ऑक्टोबर महिन्यात १२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक सज्ज केले आहेत. तिकीट तपासनीसांच्या पथकांनी गेल्या सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ८०.५६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २६.६० कोटी रुपयांची दंडवसुली केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.०९ लाख विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून १२.१० कोटी रुपये वसूल केले. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ९३ हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ३.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या सात महिन्यात धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून, ३४,८०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असलेल्या प्रवाशांना पकडून सुमारे १.१५ कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.