Category: मुंबई

Mumbai news

05 ऑगस्टला नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

मुंबई –  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे ऑगस्ट 2024 महिन्याचा लोकशाही दिन दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 जुलै 2024 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे. सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 0000

सर्व प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज नोंदणी कक्ष

तातडीने सुरु करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश     नवी मुंबई : “मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने”ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 8 विभाग कार्यालयांप्रमाणेच महानगरपालिका वा शासकीय इमारतींमध्ये सर्व प्रभागांत अर्ज नोंदणी कक्ष तात्काळ सुरु करावेत व त्याची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक स्वरुपात प्रसिध्द करावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश योजनेच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जाहीर करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ 1 अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला ह्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाईन अर्ज भरु शकतात, तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने स्थापित केलेल्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणी कक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 1 असे 111 नोंदणी कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे योजनेसाठी पात्र महिलांच्या सुविधेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशाप्रकारे 2 सत्रात असावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. योजनेकरिता भरण्यात येणारे अर्ज बिनचूक भरावेत व शासन निर्णयात नमूद केलेली पुराव्यांची आवश्यक ती योग्य कागदपत्रे तपासून अपलोड करावीत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. एकही पात्र लाभार्थी महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अर्जात भरली जाणारी माहिती आधारकार्ड पायाभूत मानून त्यानुसार भरावी व अर्ज भरतानाच तो पूर्णपणे योग्य प्रकारे भरला जाईल याची विशेष काळजी घेण्याची आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने फलक लावण्यात यावेत, हस्तपत्रके वितरीत करावीत, सर्व सोशल माध्यमांचा वापर करावा, अर्ज भरणा सुविधा केंद्रांची यादी जास्तीत जास्त माध्यमांतून प्रसिध्द करावी तसेच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांच्‍यामार्फत त्यांच्‍या घरांपर्यंत योजनेची माहिती पोहचावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बालवाडी शिक्षिका/सेविका, आशा वर्कर तसेच समाजविकास विभागातील समुह संघटक यांच्यामार्फतही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घराघरात या योजनेची प्रसिध्दी करावी अशा सूचना देण्यात आल्या. विभाग कार्यालयांप्रमाणेच शाळा, रुग्णालये याठिकाणीही होर्डिंग – बॅनर्सव्दारे योजनेची प्रसिध्दी करण्याचे सूचित करण्यात आले. लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे घ्यावेत व ऑफलाईन घेतलेल्या अर्जांची पोहोच लाभार्थ्यांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. बालविकास विभागाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 226 अंगणवाड्या सुरु असून त्याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी नोंदणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री – लाडकी बहीण” योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशाप्रकारे कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या…

गणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार- आदिती तटकरे

मुंबई : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन     मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नाना पटोले, दीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक-उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे…

चेंबूर जिमखान्याच्या वतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई: चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जुलै २०२४ दरम्यान चेंबूर जिमखाना, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई – ७१…

सेवानिवृत व दिवंगत पोलिसांच्या घरांसाठी आंदोलन

रमेश औताडे     मुंबई : सेवेत असतानाही त्रास व सेवानिवृत्ती नंतर तर जास्त त्रास सरकारकडून होत आहे. वेळोवेळी सरकार आश्वासन देते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे आम्ही आता आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. असा इशारा सेवानिवृत्त पोलिसांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदानात दिला आहे. वरळी येथील पोलीस बी. डी. डी. चाळ क्रमांक ६४ ते ७४ व ७७ मधील सेवानिवृत व दिवंगत यांना सेवा ज्येष्ठते नुसार पहिल्या टप्प्यामध्ये घरे मिळावीत अशी मागणी करत करत सरकारच्या फसव्या घोषणा व आश्वासनांचा तीव्र प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत असे ठरले होते की,  वरळी बी. डी. डी. चाळी मध्ये राहत असलेल्या पोलीस रहिवाशांना ज्येष्ठ सेवा निवृत्त व दिवंगत यांना सेवाज्येष्ठतेनुसार पहिल्या टप्यामध्ये घरे देऊ. म्हाडाला याबाबत सर्व माहिती व आदेश दिले असताना अद्यापही काहीच हालचाल झाली नाही. म्हणून नाईलाजास्तव आझाद मैदान येथे उपोषण व आंदोलन करण्यास बसावे लागत आहे असे आंदोलनकर्ते सांगत होते. आता तरी सरकारने  सहानभूतीपूर्वक विचार करून लॉटरी व करार त्वरित सुरू करावेत व उर्वरीत पोलीस रहिवाशांच्या दुसऱ्या टप्याकरिता लॉटरी काढून एकाच वेळी करारनामे करण्यास सुरूवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हरियाणा राज्याप्रमाणे कंत्राटदार विरहीत रोजगार द्या

 वीज कंत्राटी कामगार आझाद मैदानात रमेश औताडे       मुंबई : वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दती प्रमाणे  कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आम्ही कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलन करित आहोत मात्र अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नसल्याने आझाद मैदानात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारने जर याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला  आहे. विधीमंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला.रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवले आहे. फक्त कायम  कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. या अगोदर आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केली होती. तेव्हाही सरकारला व वीज कंपनीला जाग आली नाही,  त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करत आहे असे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले. वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा , कायम कामगारांच्या प्रमाणे वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणाली प्रमाणे सन्मानजनक वेतनवाढ करावी, दोषी कंत्राटदार ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी, आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी सचिन मेंगाळे यांनी यावेळी केली. 00000

माझा प्रभाग माझी जिम्मेदारी

माजी नगरसेविकेचे राहिवाश्यांकडून आभार मुंबई : प्रभाग क्रमांक 20 (अ ) येथे ठाणेकर वाडी कन्हैया नगर येथील मार्गावरती राजश्री शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच टीकम सोसायटी, संत…