Category: मुंबई

Mumbai news

 म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होणार १७१ कोटी

११२ दुकानांसाठी विक्रमी बोली     मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे आता या दुकानांच्या विक्रीतून मंडळाच्या तिजोरीत १७१ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. तर ११२ दुकानांना बोली लावण्यात आली आहे. ११२ दुकानांसाठी मंडळाने ९७ कोटी ७४ लाखांची बोली निश्चित केली होती. पण प्रत्यक्षात मात्र १७१.३८ कोटींची बोली लागली असून ही बोली विक्रमी मानली जात आहे. मंडळाच्या निश्चित बोलीपेक्षा ७३ कोटींनी अधिक बोली लागली आहे. त्यामुळे मंडळाला १७१ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. ई लिलावानंतर आता मंडळाने दुकानांच्या वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासून ११२ यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर दुकानांच्या एकूण बोलीच्या १० टक्के रक्कम भरून घेतली जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम भरून घेत दुकानांचे वितरण यशस्वी अर्जदाराला केले जाणार आहे. ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मुंबईतील प्रतीक्षा नगर, बिंबीसारनगर, मालाड, मालावणी आदी ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. जूनमध्ये ही प्रक्रिया संपुष्टात आली आणि २७ जून रोजी बोली लावण्यात आली. तर २८ जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानुसार १७३ पैकी ६१ दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. 00000

राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी

 वरळी हिट अँड रन प्रकरण :   मुंबई : मुंबईतील वरळीच्या परिसरात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली होती. या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. मात्र, या प्रकरणानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. यानंतर राजेश शाह यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शाह याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय? मुंबईमधील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा होता. दरम्यान, हा अपघात घडला त्यावेळी मिहीर शाह याने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली होती. यानंतर मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप आहे. 00000

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपीचा वावर असलेल्या बारवर पालिकेचा हातोडा

अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त     मुंबई : जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केले.वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. त्यांनतर, दारूच्या नशेत असतानाही त्याने मोटार चालविली. बेदरकारपणे मोटार चालवत असताना वरळी येथे दुचाकीला धडक देऊन वृध्द दांपत्यास चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, कायद्याचे पालन न करता आरोपीला दारू दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 00000

 विद्यार्थ्यांची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात कृती

 सीवूड्सच्या एसएस हायस्कुलमध्ये वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या केल्या तयार   नवी मुंबई: स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला विघातक असणा-या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा विभाग कार्यालयांमार्फत तसेच परिमंडळ स्तरावरील पथकांमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस या ठिकाणी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री.  शशिकांत तांडेल आणि स्वच्छता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एस.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सीवूडस येथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी विविध प्रकारची माहिती देत पटवून देण्यात आली तसेच प्लास्टिक पिशव्यांनी कापडी – कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणा-या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. थ्री आर ची संकल्पना राबविताना टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना कच-याचे घरापासूनच 3 प्रकारे वर्गीकरण करणे, कम्पोस्ट पीटव्दारे कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, थ्री आरचे महत्व अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली व त्याची स्वत:पासूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ नवी मुंबई यांचे बेलापूर विभाग कार्यालयाला अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील व श्रीम. ज्योत्स्ना नायर आणि शिक्षकवृंद तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 000

मंगळवारी पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे…

बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात

मुंबई : विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या वेळापत्रकानुसार विधी पाच वर्ष आणि बीए, बीएस्सी बीएड इंटीग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.…

सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी आरोपपत्र दाखल

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहा गुंडाविरोधात न्यायालयात १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. सागर…

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या…

कबड्डी दिनी आत्माराम मोरे चषक विनाशुल्क शालेय इंडोर कबड्डी स्पर्धा

मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिन-१५ जुलै रोजी शालेय संघांची कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली…

खरोखरच मदत करायची असेल तर, ‘लाडकी बहीण’ योजनेची गरज नाही

रमेश औताडे         मुंबई : नॉन स्टॉप पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी एजंट कडून लुटमार सुरू आहे. सरकारने जर खरोखरच आम्हा लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करायची असेल तर वीजबिल, विमा योजना, मेडिकल, महागाई, शिक्षण या व इतर मूलभूत गरजा मध्ये सवलत द्यावी,  फक्त घोषणा करून एजंटचे, झेरॉक्स दुकानदारांचे, ई महासेवा केंद्रवाल्यांचे खिसे भरण्याचे व भर पावसात घरची सर्व कामे सोडून रांगेत उभे करून आमचा वेळ वाया घालविण्याचे राजकारण करू नये. असे स्पट मत लाडक्या बहिणी लाडक्या भावाकडे करत आहेत. योजनेची घोषणा केली तेव्हा सुरवातीला विविध प्रकारचे दाखले, पुरावे, बँक पासबुक, रेशनकार्ड, लाईटबिल, निवडणूक ओळखपत्र, रहिवाशी पुरावा, डोमासाईल, आधार कार्ड, योजना वयाची मर्यादा, अपुरा अवधी, फोटो, अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. दोन दिवसांनी काही कागदपत्र कमी केले. मात्र वास्तवात   चित्र वेगळे आहे. अंगणवाडी महिला सविस्तर माहिती देत असताना,  ई महासेवा केंद्रात गेले की वेगळी माहिती देण्यात येत होती. टिव्हीवर माहिती वेगळी दिली जाते. वृत्तपत्रात वेगळी माहिती असते, सोशल मीडियावर वेगळी तर नाक्यानाक्यावर वेगळी माहिती मिळत असल्याने अनेक महिला व योजनेसाठी धावपळ करणारे त्यांचे पती, भाऊ इतर नातेवाईक वैतागले आहेत. काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र मागितले जाते तर काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र गॅझेट मध्ये नोंद असल्याचे पुरावे मागितले जात आहेत. त्यासाठी दोन ते तीन हजार ई महासेवा केंद्रातील एजंट मागत आहेत. पुरावे अर्जंट हवे असेल तर चार ते पाच हजार मागत आहेत. सरकार सांगते तक्रार करा. तक्रार कुठे आणि कशी करायची ? तक्रार नोंदणी करायला गेल्यावर तिथे लाच मागणार नाहीत याची खात्री सरकारने देणार आहे का ? असा सवाल करत संतप्त झालेली जनता तीव्र प्रतिक्रिया देत ” भिक नको पण कुत्र आवर असे बोलत आहेत. अंगणवाडी, आशा सेविका, परिचारक या व इतर विभागातील महिला आंदोलन करत भर पावसात भावाकडे  न्याय मागत आंदोलन करत आहेत. उद्या या १५०० रुपयांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुका निकाल पाहून या बहिणीसाठी भाऊ जागा झाला आहे. या आधी बहीण दिसली का नाही ? असा सवाल करत महिला संतप्त झाल्या आहेत. ०००००