Category: मुंबई

Mumbai news

दादांची आईसोबत दिवाळी…

माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक – युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

मुंबई, :  अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले. काम्याने बुधवारी आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची…

मुंबई पोर्टच्या इंदिरा गोदीत अहमद काझी यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यातील फर्स्ट क्लास मास्टर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष अहमद के. काझी ३१ ऑक्टोबरला मुंबई पोर्ट मधील ३६  वर्षाच्या निष्कलंक…

सिद्धार्थ कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘कार्याध्यक्ष’ पदी निवड

राजेंद्र साळसकर मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. सिद्धार्थ कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेत कार्यरत आहेत. त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. अनेक सहकारी संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांचे कार्य पाहता त्यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, आमदार शिवाजी गर्जे, प्रवक्ते संजय तटकरे  मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, संतोष धुवाळी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सिद्धार्थ कांबळे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 0000

 रिपब्लिकन एकता आघाडीची समन्वय समिती स्थापन

 महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र पक्षांपेक्षाही मत विभागणीवरच अधिक आहे, असे नमूद करत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिलेल्या काही छोट्या – मोठ्या आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी यावेळीही  महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दलित संघटनांसोबत झालेल्या एका संयुक्त बैठकीत महविकास  आघाडीतर्फे ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांनी एका बैठकीत स्वागत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर,  ‘ रिपब्लिकन एकता आघाडी ‘ च्या मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रचारमध्ये  ‘ मविआ ‘ तील तीनही पक्षांशी संवाद, संपर्क राखण्यासाठी एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही बैठक आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्ष ( खोरिप)  कार्यालयात पार पडली. रिपब्लिकन एकता आघाडीच्या या समन्वय समितीमध्ये सुरेश केदारे ( दलित पँथर), मिलिंद सुर्वे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र),  भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे), सागर संसारे ( स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) रवी गरुड (दलित सेना ), मनोज बागुल ( रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे ( लोक मोर्चा), सतीश डोंगरे ( आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे ( ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे. या समन्वय समितीमधील सदस्यांसहित या रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, कॉ. सुबोध मोरे, मिलिंद पखाले ( नागपूर ), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ,  भगवान गरुड (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), भागवत कांबळे ( रिपब्लिकन पक्ष – खोब्रागडे ), मंगेश पगारे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), शिवाजी गायकवाड, अनिल लगाडे, शशिकांत हिरे, रामानंद पाला हे घटक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तांतराला सर्वोच्च प्राधान्य या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेत सत्ता बदलाचे वारे जोरात वाहत असून  बौद्ध, दलित, आदिवासी हे समाजही त्याला अपवाद नाहीत. किंबहुना परिवर्तनाची सर्वाधिक गरज त्यांना आहे. त्यातच भाजपने ही निवडणूक केवळ सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी अधिक महत्वाची मानली आहे. कारण त्या बहुमता नंतरच भाजपला जाचक वाटत असलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि संविधान याबाबत निर्णायक पावले उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने, आंबेडकरी चळवळीने यावेळी सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज ठरली आहे, असे रिपब्लिकन एकता आघाडीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारणाची उभारणी ही केवळ निवडणूक काळातच करण्याची गोष्ट मुळीच नाही. ती गंभीरपणे करण्याची दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच निवडून येण्याची सर्वांगीण क्षमता आणि स्वतःसाठी मतदासंघांची बांधणी या गोष्टींच्या अभावामुळे आंबेडकरवादी पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता दुरावली आहे. त्यातच ‘ स्वबळावर लढत ‘ आणि ‘ स्वतंत्र आघाड्यांची निर्मिती ‘ हे दोन्ही  पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी आजवर नेहमीच निरुपयोगी ठरले आहेत, याकडे रिपब्लिकन एकता आघाडीने लक्ष वेधले आहे. 00000

नवी मुंबईकर रंगले हास्य संध्येत

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना केजागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारून जागे करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून…

 ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’

 गणेश नाईकांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक   नवी मुंबई : नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात गणेश नाईक यांना आजवर यश आले होते. मात्र आता त्यांच्या राजकारणाला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आव्हान देण्यात येत आहे. भाजपाने गणेश नाईक यांना नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतून उमेदवारी दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र उमेदवारीला विरोध केल आहे. नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे गणेश नाईक यांनीही आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना उत्तर देताना माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, असे म्हटले. आता त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे. गणेश नाईक काय म्हणाले? “मागच्या वेळेला मी गाफील होतो. १९९९ ला मला फसवून हरवलं गेलं, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या फेरीत मला ७५०० मतांचे लीड मिळाले होते. माझ्या विरोधात कट रचणारे सर्व लोक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं. परमेश्वराला सांगतो की, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी तुझ्याबरोबर त्यांना ठेव”, असे विधान भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले. शिवसेना शिंदे गटाकडून विरोध गणेश नाईक यांच्या विधानानंतर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय चौगुले यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल सदर विधान काढले आहेत. तसेच वसंत डावखरे यांचाही उल्लेख गणेश नाईकांच्या त्या विधानात आहे. आनंद दिघे साहेबांचे फोटो लावून आम्ही मत मागतो. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवतासमान आहेत. जर गणेश नाईक यांना इतका माज आला असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ऐरोलीमधील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याशेजारी जाहीर निषेध आंदोलन करू. नवी मुंबईत राजकीय संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जेमतेम नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लिम, मराठी असा मतदारांचे प्रमाण बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. याचे परिणाम येत्या निवडणुकीत काय दिसतात? याची आता चर्चा होत आहे. ००००

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राज्यपालांकडून अभिवादन

अशोक गायकवाड मुंबई : देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त वमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दोघांच्याही प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

महायुतीत भाजपच्या कमळावर आरपीआय आठवलेंचा उमेदवार;

आठवले गटात मोठी अस्वस्थता स्वाती घोसाळकर मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात…

ऐन निवडणुकीच्या काळात 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे  कायदा…