Category: मुंबई

Mumbai news

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह स्वाती घोसाळकर मुंबई : “मी कधीही सत्तेची अंध स्तुती केली नाही, नेहमी प्रश्न विचारले. पण आज प्रश्न विचारणेच देशद्रोह ठरत आहे का?” असा…

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात?

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात? अंजली दमानियांच्या वक्तव्याने खळबळ मुंबई : घरातील पाळीव कुत्रा मेला तरी आपण दुखावटा पाळतो, येथे महाराष्ट्राच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धक्कादायक अपघाती निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीन…

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंना हाजीर हो !

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा आणि ते व्हायरल करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे. मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एका…

थरथरत्या ओंजळीत अश्रुंची फुले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही महाराष्ट्र  सावरलेला नाही. अजित पवारांचे राजकारणातील सर्वेसर्वा असणारे शरद पवार आज बारामतीत आले, आपल्या लाडक्या पुतण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवारांनी…

टँकर उलटल्याने एक्सप्रेस वे २४ तास ‘आडवा’ झाला

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफीक जाम एका टँकरच्या उलटल्याने झाला. टँकरमधिल वायु गळतीमुळे तब्बल २४…

सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी उधळपट्टीला फडणवीस यांचा लगाम

सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी उधळपट्टीला फडणवीस यांचा लगाम मुंबईः राज्याच्या वित्त विभागाची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेऊन काटकसरीचे धोरण स्वीकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार…

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानशिवाजी पार्क, दादर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षावरील), आंतर कचेरी व आंतर क्लब अशा एकंदर सहा गटांमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या क्लब मार्फत नावे स्वीकारली जाणार असल्याने खेळाडूंनी त्वरित आपल्या क्लबशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, मुंबई येथे उपलब्ध असून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नावे स्वीकारली जातील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले. उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल, देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल, जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटकर यांचे अभीष्टचिंतन करताना मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, शाखाप्रमुख…