माथेरानमधील मर्कटलीला पर्यटकांचे आकर्षण
माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही माकडे आपल्या…
Mumbai news
माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही माकडे आपल्या…
प्रवाशांचा उन, पावसात उभे राहण्याचा त्रास संपणार डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागात छत उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. मागील दोन…
शरद पवारांची ताकद असलेल्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बरेच जण इच्छुक आहेत. पक्षातच असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे आता आमदारकीसाठी प्रयत्न करतायत. यामध्ये कलाकारही कुठे मागे नसल्याचं चित्र सध्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलेली आहे. आनंद शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आनंद शिंदे त्यांचा मुलगा उत्कर्ष शिंदेच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्यच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांनी मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापुरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे घराणं जर राजकारणाच्या वर्तुळात आलं तर निवडणुकीच्या रिंगणात स्वत: आनंद शिंदे उतरणार की उत्कर्षसाठी आग्रह धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष दरम्यान आनंद शिंदे आग्रही असलेल्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे मोहोळ, शिर्डी आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आनंद शिंदे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातंय. यावर आता शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही अनेकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर निकाल लागणार आहे. दरम्यान सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडून आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून जोरदार प्रचार देखील सुरु झालाय. नुकतीच भाजपने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता कोणत्या उमेदवारांना यंदाच्या विधानसभेसाठी संधी मिळणार याची उत्सुकता आहे. ०००००
अशोक गायकवाड मुंबई : फ्रांस – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी…
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची २०२४-२५ वर्षातील सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमान पदाखाली धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात येत असल्याची…
मुंबई : अशोक गायकवाड भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल, असे मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार – उद्योजकांचे भव्य आर्थिक शिष्टमंडळ (बेल्जियम इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार असून त्यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जीयमचेङङङ मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी येथे दिली.वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. बेल्जीयमचा महाराष्ट्र व गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार असून बेल्जियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेसोमवारी ळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले. बेल्जीयम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्जीयम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : असोसिएशनच्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील पंच व पदाधिकारी यांच्यासाठी विशेष आयोजित केलेली रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा रविवारी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे पार…
मुंबई ग्राहक पंचायतीच्या परिषदेत सूर मुंबई : एकीकडे गरीबांना मोफत घरे मिळतात. मध्यमवर्गीय गरजुंना परवडणारी घरे खरोखरच उपलब्ध करुन द्यायची शासनाची इच्छा असेल तर तसे प्रतिबिंब गृहनिर्माण धोरणात दिसले पाहिजे. गृहप्रकल्पांसाठी शासनाला द्यावा लागणाऱ्या शुल्काचा पुनर्विचार केला गेला तर घरांच्या किमती कमी होऊन परवडणारी घरे निर्माण होऊ शकतात, असा सूर राज्याच्या प्रस्तावीत गृहनिर्माण धोरणाबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून शनिवारी आयोजित केलेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आला. शासनाने पुढाकार घेऊन भाडे तत्त्वावरील घरनिर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचे (महारेरा) माजी अध्यक्ष गौतम चॅटर्जी, नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, मुंबई गृहनिर्माण मंडळाचे माजी मुख्य अधिकारी अरविंद ढोले, विकासक डॉमनिक रोमेल, वास्तुरचनाकार निखील दिक्षीत, योमेश राव तसेच मुंबई विकास समितीचे ए. व्ही शेणॉय, अॅड. श्रीप्रसाद परब, अॅड. पार्थसारथी आदी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचे गृहनिर्माण धोरण ही भविष्यातील दिशा ठरवत असते. अशा वेळी सर्व संबंधितांशी चर्चा करून अशी धोरणे निश्चित केली पाहिजेत. या धोरणात महारेराकडे गृहप्रकल्पांची नोंदणी तसेच दंडात्मक कारवाईतून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा झाली पाहिजे असे नमूद आहे. परंतु रेरा कायद्यातच ही रक्कम प्राधिकरणाकडे जमा करण्याची तरतूद आहे, याकडे चॅटर्जी यांनी लक्ष वेधले. बांधकामविषयक परवानग्यांबाबत काय धोरण असावे, यासाठी २०१७-१८ मध्ये माझ्यासह माजी पालिका आयुक्त शरद काळे, माजी नगरविकास प्रधान सचिव रामनाथ झा यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने बांधकामविषयक परवानग्या देताना होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे परवानग्या देण्याची सूचना केली होती. या अहवालाची अमलबजावणी केली तरी बांधकाम विषयक परवानग्यांमध्ये सुसूत्रता येईल, असेही त्यांनी सांगितले. घरनिर्मितीसाठी शासनाला शुल्काच्या रुपाने बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यामुळे सद्यस्थितीत विकासकाने कितीही ठरविले तरी तो परवडणारे घर देऊ शकत नाही. घरांच्या किमती कमी करू, असे वाटले तरीही त्यात प्राप्तीकर कायद्याचा अडथळा आहे, याकडे विकासक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी लक्ष वेधले. शासनाला परवडणारी घरे निर्माण करायची असतील तर भाडेतत्त्वावरील घरांची अधिकाधिक निर्मिती करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. ब्रिटिशांच्या काळात चाळी बांधण्यात आल्या. या चाळींमध्ये भाड्याची घरे उपलब्ध होती. काही विश्वस्त संस्थांनीही घरे उभारली तीही भाड्याने उपलब्ध होती. मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या व्यक्तीला भाड्याचे घरच परवडू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासनाने उपलब्ध भूखंडापैकी २५ टक्के भूखंड शून्य किमतीने उपलब्ध करून द्यावा. बांधकामासाठी येणारा खर्च देऊन भाडेतत्त्वावरील घरे कोणाकडूनही बांधून घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या सर्व शिफारशींचे संकलन करून ते शासनाला सादर केले जाणार आहे. याशिवाय शासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.
अनिल ठाणेकर भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय समन्वयक डॉ योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, दडपशाही करणार्यांचा तीव्र निषेध करत असल्याचे मत भारत जोडो अभियान, ठाणेचे कार्यकर्ते जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, नीता साने, राजेंद्र चव्हाण, मुक्ताश्री वास्तव, निमिष साने, अनिल शाळिग्राम, सुब्रतो भट्टाचार्य, विशाल जाधव, रवी घूले, शुभदा चव्हाण, अजित डफळे, मर्सिया डीकुन्हा, हुकुमचंद शिरसोदे,हर्षलता कदम, मीनल उत्तूरकर आणि अजय भोसले यांनी व्यक्त केले आहे. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विदर्भात अकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने “लोकशाहीचे रक्षण व आमचे मतदान” या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॅा. संजय मं. गो., राज्य समन्वयक उल्का महाजन, विदर्भ संयोजक अविनाश काकडे आदी वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ, सर्व भाषणे होऊ देत.” अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले, त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ज्या वेगाने हे घडले, त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. भारत जोडो अभियानातर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या माहितीनुसार ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते असे कळते. वंचित बहुजन आघाडीचे नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील तसेच संविधान विरोधी शक्ती, भाजप, व संघाविरोधी लढताना शत्रू-मित्र विवेक बाळगतील अशी अपेक्षा आहे. जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत अशा साहित्यिक, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा अलिकडच्या काळात वंबआच्या कार्यकर्त्यांनी नवाच पॅटर्न तयार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक हक्काची अशी पायमल्ली वंचितांचं राजकरण करू पाहणाऱ्या पक्षाने करणे यासारखी शोकांतिका नाही.अशाप्रकारच्या हुल्लडबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलीस यंत्रणेने असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अशाप्रकारच्या दडपशाहीला न भिता भारत जोडो अभियान आपले काम राज्यभरात सुरू ठेवेल असा आम्ही निर्धार व्यक्त करतो,असे भारत जोडो अभियान, ठाणेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.