Category: मुंबई

Mumbai news

वटपौर्णिमेनिमित्त नमुंमपा महिला कर्मचारी यांनी वडाचे वृक्षारोपण करून दिला पर्यावरणशील संदेश

नवी मुंबई : वटपौर्णिमेचा सण आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त वडाची पूजा करून निसर्गाशी जवळीक साधली जाते. मात्र आजच्या इन्स्टन्ट आधुनिक युगात घरातल्या…

नवी मुंबईतील मार्केट तत्परतेने सुरु करा-डाॅ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते.…

वस्ताद सुधीर कांबळे यांना राज्य क्रीडारत्न पुरस्कार

मुंबई : भाईंदर (पूर्व) येथील शिवशंभो मर्दानी आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद सुधीर गणपत कांबळे यांना लाठी व दांडपट्टा या क्षेत्रात चार दशकांपेक्षा जास्त वर्षे योगदान दिल्याबद्दल उस्मानाबाद येथील प्युपिल्स ऑलम्पिक असोसिएशन…

मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही – महाजन

मुंबई : ठाकेरेंच्या शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊत यांनी मोदींवर केलेल्या ब्रँड नव्हे ब्रँडीच्या टीकेवर उद्धव ठाकरेही दाद देत होते, याचं दुःख आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकसभेत ९ जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती…

पुढचा डोस कधी द्यायचा हे लवकरच सांगेन – शरद पवार

बारामती : मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच…

ओबीसी आरक्षणासाठीच्या हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

जालना: मराठा आरक्षण देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं…

ईडीला न्यायालयाचा दणका, अरविंद केजरीवालांना जामीन

नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज ईडीला दणका देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये नियमित जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी…

महायुतीत शिमगा सुरुच

रामदास कदमांचा भाजपाला इशारा, १०० जागा द्या, नाही तर २८८ लढू ! मुंबई: होळी संपली असली तरी महायुतीत अजुनही जोरदार शिमगा सुरु आहे. कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंच्या शिवसेनेतले नेते भाजपाविरोधात…

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000

राज्‍यातील घरकामगरांना न्याय द्यावा!

दादरमधील हक्‍क सभेत हजारो घरकामगारांची उपस्‍थिती   धारावी : राज्यातील लाखो घरेलु कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मंगळवारी झालेल्‍या हक्‍क सभेत करण्यात आली. राज्यातील १२०० घरकामगार, प्रतिनिधींची यावेळी उपस्‍थिती होती.घरकामगारांना सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्तीवेतन मिळावे, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यांतर्गत सुधारणा, घोषित योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने या हक्क सभेचे नियाेजन करण्यात आले होते. घरकामगार हक्क सभेला राज्य मानव अधिकार आयोगाचे (स्टेट ह्युमन कमिशन) एम. ए. सयीद, राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला शिफारस व सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी सांगितले. 0000