Category: मुंबई

Mumbai news

शाळांच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारता येणार नाही

उच्च न्यायालयाचे निर्देश   मुंबई :  दक्षिण मुंबईतील एका शाळेच्या छतावरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थी तसेच रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. तसेच, शाळा, कॉलेजच्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई असल्याने तत्काळ कारवाईचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आहेत. मोबाईल टॉवर्स उभारण्यासंबंधी २०१३च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा, कॉलेज व रुग्णालये इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी आहे. असे असताना डोंगरी परिसरातील एका शाळेच्या टेरेसवर एका मोबाईल कंपनीने टॉवर उभारला आहे. याविरोधात कैसर-ए-अमीन बिल्डिंग टेनंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ॲड. विश्वनाथ पाटील, ॲड. अक्षय नायडू आणि ॲड. केदार न्हावकर यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पालिकेने मोबाईल टॉवर्स उभारणीसाठीच्या २१ जानेवारी २०१३ रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार घरमालकांची संमती घेणे बंधनकारक आहे. तसेच, शाळा- कॉलेजच्या इमारतींच्या छतावर टॉवर उभारणीवर बंदी असल्याचा युक्तिवाद रहिवाशांतर्फे करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने तत्काळ टॉवर हटवण्याचे निर्देश दिले. तसेच, गरज पडल्यास पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत.

नवी मुंबईत करता येणार मोफत केमोथेरपी

 महानगरपालिकेचा उपक्रम नवी मुंबई : शहरातील स्थानिक कॅन्सरपीडित रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात जाऊन कॅन्सर आजारावर औषधोपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांबरोबरच नातेवाइकांनादेखील त्याचा त्रास सोसावा लागत होता.  आता कॅन्सरपीडित रुग्णाला नवी मुंबईतच केमोथेरपी करता येणार आहे. तसेच, कॅन्सर आजाराचे निदान चाचणी आपल्याच प्रभागातील पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. पालिकेच्या सर्वच नोडमध्ये प्रशस्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली स असून येथे रुग्णांना उपचार दिले जात आहेत. पालिकेच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी कोपरखैरणे प्र येथील नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण, सहा आधुनिक शस्वक्रियागृह सुविधाचे लोकार्पण, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व स्क्रिनिंग सुविधाचे उ‌द्घाटन करण्यात आले आहे. कॅन्सर आजाराबाबत जागरूकता वाढविणे, रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर निदान चाचणी होईल.

जनताच आता न्याय करणार, मशाल धगधगणार- आदित्य

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना आता जनताच आता न्याय करणार असून मशाल धगधगणार असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी…

महायुतीचा कार्यक्रमही आता एकाच टप्प्यात – जयंत पाटील

मुंबई :  ‘एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम’ अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी महाराष्ट विधानसभेचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर दिली. जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदारही महायुतीचा…

जरांगेचा फडणवीसांविरोधात फतवा

लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा मुंबई : आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा असा देवेंद्र फडणवीसांविरोधात…

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांत चित्रा वाघ, पंकज भुजबळांची वर्णी

 आचारसंहीतेपुर्वी घाईघाईत शपथवीधी स्वाती घोसाळकर   मुंबई : विरोधकांचा टोकाचा विरोध, न्यायालयात सुरु असलेला खटला या सगळ्याला बाजूला करीत महायुतीने आज राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ जागांवर आपल्या नेत्यांना शपथ दिली. यात…

अर्ज भरण्यासाठी फक्त ६ दिवसच

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली असून या निवडणूकीसाठी सुट्टीचे दिवस वगळता उमेदवाराला फक्त ६ दिवसच मिळणार असल्याने उमेदवार आणि पक्षाचेही टेन्शन वाढले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता…

दिवाळीसाठी कंदिल गल्लीत लगबग !

प्रशांत शिंदे मुंबई : दसरा संपल्यानंतर माहीमच्या गल्लीला वेध लागतात ते कंदीलाचे. अवघ्या कंदीलाने माहीमच्या गल्ल्या सजून जातात. माहीमच्या कवळी वाडीत गेल्या ४२ वर्षापासून कंदील बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरु असल्याने कवळी वाडीची…

निवडणूका जाहीर; मोर्चेबांधणी सुरु

महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान ० २३ तारखेला निकाल     मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर झाली असून विविध पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केलीय. महाराष्ट्रातील निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात…

सरकारी रक्तपेढ्यांकडूनच नियम धाब्यावर,

रक्तसाठ्याची नोंद करण्यास टाळाटाळ; दंड भरण्याकडेही दुर्लक्ष मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या ई-रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंदणी…