Category: मुंबई

Mumbai news

राज ठाकरे यांनी घेतले अतुल परचुरे यांचे अंत्यदर्शन, पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित

मुंबई : अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी, राजकीय, साहित्य आदी विविध क्षेत्रांसह प्रेक्षकांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…

मोनो रेलच्या महसूल वृद्धीसाठी जाहिरातींचा आधार

  तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायामधून महसूल मिळविण्याचे एमएमआरडीएचा प्रयत्न मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनो रेलच्या माध्यमातून तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायाद्वारे महसूल मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग…

‘एक सत्य’ दीर्घ कवितेचे १९ ऑक्टोबरला रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे प्रकाशन

मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, शहिद स्मारक हॉल येथे कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ या दीर्घ कवितेचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली…

विश्वकौतुक पाणी विषयक दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

मुंबई : पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे.मोठ मोठी शहरे अपु-या पाणी पुरवठ्यामुळे चिंतीत आहेत. भूगर्भातूनही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढते उद्योग यांच्यामुळे…

सेंट्रल बँक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई एम्प्लॉईज को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.सेंट्रल बँक एम्प्लॉईज असोसिएशन मुंबईचे सरचिटणीस विजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली.…

तरच वाचन प्रेरणा दिनाचे सार्थक होईल – प्रज्ञा जांभेकर

रमेश औताडे मुंबई : वाचन प्रेरणा दिन एका दिवसापुरता मर्यादित नसावा वर्षभर त्याची जनजागृती मोहीम सुरू रहावी. त्यासाठी अमेरिका व पॅरिस येथील वाचनालयाचा आदर्श घ्यावा व विद्यार्थी घटकाला समोर ठेऊन…

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज

नवी मुंबई : सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केल्याने या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरीक अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोने संकेतस्थळावर या योजनेची माहिती दिली असली तरी घरांच्या किमती अद्याप जाहीर केल्या नाहीत. तसेच विनापरताव्याच्या २३६ रुपये भरुन इच्छुक नागरीक त्यांचे अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोचे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेमध्ये वाशी, खारघर, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वेस्थानकाजवळील सदनिकांसह तळोजातील पनवेल मुंब्रा महामार्गालगतच्या सदनिकांचा समावेश आहे. या योजनेत लाखो नागरीक आपले नशीब आजमावतील असा अंदाज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) च्या सदनिकांचा या योजनेमध्ये समावेश असून सिडकोच्या https:\.cidcohomes.com संकेतस्थळावर नागरिक अर्ज नोंदवू शकतील. सिडको मंडळ नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७ हजार सदनिका बांधत आहेत. यापैकी २६ हजार सदनिका (घर) सोडतीच्या पहिल्या टप्यात उपलब्ध आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेंट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सोडतीची वैशिष्ट्ये अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल. या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.  

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

रमेश औताडे मुंबई : शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक घेण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी सांगितले. या आनंदाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कल्याण कुलकर्णी, हणमंत शेवाळे, रघुनाथ पाटील, संभाजी खोचरे,  सदानंद शेवाळे, रमेश वीर काका,  हणमंत चव्हाण भाऊ उपस्थित होते. स्नेहमेळावा नियोजन वैशाली माने, वंदना पाटील, सिमा पोळ, उज्वला मोळावडे, स्वाती गुरव, स्वाती मोरे, बाबासो खोत, अमोल मोरे, अभिषेक वीर, हिम्मत वीर, भगवान वीर यांनी नियोजन केले तर विजय मोहिते यांनी सूत्रसंचालन व सीमा पोळ यांनी आभार मानले.

 कल्याणमधील चिकणघर येथील मालमत्ता कर थकविणारा पेट्रोल पंप सील

मालमत्ता कर विभागाची कारवाई कल्याण : नियमित नोटिसा बजावुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप मालकाचा पेट्रोल पंप कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे अधिकारी आणि ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांनी मंगळवारी सील केला. रोशन पेट्रोल पंप मालकाकडे मालमत्ता कराची पालिकेची ९५ लाख १४ हजार रूपयांची थकबाकी आहे. रोशन पेट्रोल पंप हा कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील महत्वाचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर सीलबंद करण्याची कारवाई केली तर त्याचा त्रास वाहन चालकांना होईल. या सहानुभूती विचारातून पालिकेने या थकबाकीदार पेट्रोल पंप चालकाला थकित कर भरणा करण्यासाठी मुभा दिली होती. अलीकडेच रोशन पेट्रोल पंप मालकाला थकित कर भरण्यासाठी ब प्रभागाच्या कर विभागातून नोटीस बजावण्यात आली होती. या रकमेचा टप्प्याने भरणा करावा, असेही प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केले. त्यालाही पंप मालकाने दाद दिली नाही. अखेर मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, मालमत्ता कर विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी चिकणघर येथे जाऊन रोशन पेट्रोल पंप सील करण्याची कारवाई केली. जोपर्यंत मालमत्ता कराची थकित रक्कम पंंप मालकाकडून पालिकेत भरणा केली जात नाही तोपर्यंत सील न काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यांनी तातडीने आपली चालू, थकित रक्कम पालिकेत भरणा करावी आणि पालिकेकडून होत असलेली कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.

विमान, रेल्वेत बाँम्बची बोंबाबोंब !

मुंबई : मुंबईहून उड्डाण केलेल्या तीन विमानांमध्ये तर मुंबईहून रवाना झालेल्या एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. माहिती मिळताच विमान दिल्लीकडे वळवण्यात…