Category: मुंबई

Mumbai news

जगातील सर्वांत कमी वयाच्या मुलीचा हात बदलला

रमेश औताडे मुंबई :खेळात असताना १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये विजेचा धक्का लागल्याने अनामता अहमद हिला तिचा उजवा हात गमवावा लागला होता. तब्बल दोन वर्षांनी  मुंबईतील ग्लेनईगल हॉस्पिटल मध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. महिनाभरानंतर तिला घरी सोडण्यात येणार असून परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांकडून तिच्या या धाडसाचे कौतुक करण्याचा आनंदी सोहळा आयोजित केला होता. ही शस्त्रक्रिया पशस्वीरित्या पार पाडणारे डॉ. नीलेश सतभाई (विभाग प्रमुख-प्लास्टिक, हैंड, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांटेशन) आणि त्यांच्या टीमचे अनामता ने आभार मानले. दोन वर्षांपूर्वी, गोरेगाव, मुंबई येथील 13 वर्षीय अनामता अहमद सुट्टीसाठी उत्तर प्रदेशातील अलीगढ़ या तिच्या मूळ गावी गेली होती. तिच्या चुलत भावांसोबत खेळत असताना, तिने चुकून टेरेसवरील 11 KV तारेला स्पर्श केला, परिणामी विजेचा जोरदार धक्का बसला ज्यामुळे ती भाजली. तिच्या उजव्या हाताला गैंगरीन झाला आणि तीनदा हात कापावा लागला. तिच्या डाव्या हातालाही मोठ्या जखमा आणि गंभीर दुखापत झाली होती. हात प्रत्यारोपण हा एकमेव योग्य उपाय असल्याचे त्यांना समजताच त्यांनी संपूर्ण भारतातील अनेक रुग्णालये आणि सिंगापूर आणि थायलंडमधील काही केंद्रांना भेट दिली. मात्र या सर्व केंद्रांवर हात प्रत्यारोपण करण्यास नकार देण्यात आला. शेवटी ते ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबई येथे आले आणि डॉ. सतभाईंचा सल्ला घेतला. तिच्या कुटुंबीयांनी प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली असता योग्य दाता मिळण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. महिन्यापूर्वीच अनामताच्या हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अशा प्रकारचे प्रत्यारोपण मिळवणारी जागतिक स्तरावर सर्वात तरुण प्राप्तकर्ता म्हणून तिने नवा इतिहास रचला आहे. अनामता हिला सूरत येथील 9 वर्षांच्या मेंदूमृत दात्याकडून हात मिळाला, जो आजपर्यंत देशातील सर्वात तरुण दाता आहे. हा क्षण म्हणजे आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. कार्यक्षम हातांशिवाय जीवन अतिशय अवघड आहे. दाता आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या नवीन हाताने, मी माझे भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. हे यशस्वी प्रत्यारोपण माझ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर हे शक्य झाले असून मी डॉ. नीलेश सतभाई आणि त्यांच्या टीमची सदैव ऋणी आहे अशी प्रतिक्रिया अनामता अहमद हिने व्यक्त केली. हात दान करणे हे आजही दुर्मिळ आहे कारण कित्येक कुटुंब यासाठी नकार देतात. परंतु दिवसेंदिवस याबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनामताची दुखापत गंभीर होती तिची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असून या शस्त्रक्रियेला जवळपास 12 तास लागले. अंगदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी २० वर्षांहून अधिक काळ काम केल्याने, या हात प्रत्यारोपणासाठी देणगीदार कुटुंबाशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा मला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया अवयव दान प्रक्रिया अनुभव तज्ञ निलेश मांडलेवाल यांनी दिली. डॉ. बिपिन चेवले  मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लेनईगल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई व इतर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

धनगर समाजाचा विश्वासघात करणाऱ्यांना मतदार धडा शिकवणार – प्रकाश शेंडगे

रमेश औताडे मुंबई :धनगर समाजाला आरक्षणाचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आमचा विश्वासघात करण्यात आला आहे. मात्र आचारसंहितेच्या अगोदर जीआर काढायला सरकार अपयशी ठरलेले आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने काहीच न केल्यामुळे धनगर समाजातील लोकांनी उमेदवार पाडण्याच ठरवले असून ओबीसी बहुजन आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आम्ही ठरवले आहे. असे ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जेथे धनगर तिथे तेथे धनगर उमेदवार, लिंगायत तिथे लिंगायत ,आदिवासी तेथे आदिवासी असे उमेदवार आम्ही देणार आहेत. ओबीसी बहुल अशी ही निवडणूक होताना पाहायला मेळेल.  महाराष्ट्रात ओबीसी पर्याय म्हणून आम्हाला पसंती मिळणार आहे. मराठा ओबीसी वाद पाहता बीड जिल्ह्यातला ओबीसी संतापलेला आहे ४६ पैकी २५ उमेदवार तयार झालेले आहेत, येणाऱ्या २० तारखेला आम्ही उमेदवार जाहीर करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०, उत्तर महाराष्ट्र ५ आणि विदर्भातही आमच्याकडे ओढा आहे .जरांगे फॅक्टर जे जे उमेदवार उभे करतील, तर त्यांचे लेबल लावलेले कुठल्याही पक्षाचा असू द्या तो प्रत्येक उमेदवार ओबीसी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. १६० आम्ही पाडू आणि १६० निवडून आणू. अनेक जण आता ओबीसींचे उमेदवार शोधत आहेत, यावेळी या निवडणुकीत ओबीसी दलितांच्या हिताचे बोलेल तोच राज्यावर राज्य करणार आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये चिन्ह मिळणार असून ते चिन्ह चहाची किटली असेल आम्ही त्याचीच मागणी केली आहे असे शेंडगे म्हणाले. 00000

मुंबई काँग्रेसचे सहकार सेलचे अध्यक्ष यशवंत भाई सावंत आणि जिल्हाध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या वतीने धारावी येथे रोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये काँग्रेस नेते ज्योती ताई गायकवाड,…

विश्वकौतुक पाणी विषयक दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

मुंबई – पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे.मोठ मोठी शहरे अपु-या पाणी पुरवठ्यामुळे चिंतीत आहेत. भूगर्भातूनही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढते उद्योग यांच्यामुळे…

 भागिदारीविना महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यास बौध्द समाज नाखूष

आंबेडकरवादी संघटनांचा सूर मुंबई : निवडणुकीत ‘स्वबळावर लढत ‘ आणि ‘ तिसरी आघाडी ‘ हे दोनही पर्याय आंबेडकरवादी राजकारणासाठी निरुपयोगी आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याद्वारे राज्यसभेत भाजपला बहुमत मिळू न देण्यासाठी तत्वतः  महाविकास आघाडीला साथ देण्याची भूमिका अनेक आंबेडकरवादी पक्ष – संघटनांची जरूर आहे. मात्र अधिकृत संवादाशिवाय आणि प्रतिनिधीत्व, सत्तेत भागीदारी न देताच राज्यातील बौद्ध समाजाचा पाठिंबा गृहीत धरण्याची महाविकास आघाडीच्या धुरिणांची मानसिकता स्पष्ट होवू लागली आहे. परिणामी:  लोकसभा निवडणुकीपाठोपाठ  विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला एकतर्फी आणि बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत आंबेडकरी समाजात नाखुषीची भावना वाढू लागली  आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती घडण्याची खात्री कुणीही देवू शकत नाही. हा सूर मुंबईत फोर्ट भागात सोमवारी  झालेल्या आंबेडकरवादी पक्ष – संघटनांच्या एका बैठकीतून निघाला आहे. या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, पँथर नेते सुरेश केदारे, रिपब्लिकन पक्ष ( खोब्रागडे) चे प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवणे, रामविलास पासवान यांच्या दलित सेनेचे नेते रवी गरुड, प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, विदर्भातील ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. एकनाथ जाधव, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, सतीश डोंगरे, ॲड. जयमंगल धनराज आदी उपस्थित होते. वास्तवाचे भान ठेवा लोकसभा निवडणुकीतील भाजप – एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील मतांच्या टक्केवारीचा फरक हा केवळ एक – दीड टक्क्याचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होवू नये, अशी आमची इच्छा आहे. मात्र तसे घडू द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीनेही वास्तव परिस्थितीचे भान ठेवावे, असे आवाहन बैठकीनंतर  उपस्थित नेत्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. मते लुटण्याचे मनसुबे ? राज्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ही सुमारे १ कोटी इतकी असून  विधानसभेच्या १८९ जागांवर प्राबल्य आहे.असे असतांनाही त्या समाजाला सत्तेत कोणतीही भागीदारी न देता मतांची लयलूट करण्याचे मनसुबे कितपत योग्य आहेत, असा सवाल महाविकास आघाडीला बैठकीतून करण्यात आला आहे. छोट्या पक्षांना सोबत घ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेचे लक्ष्य चुकवायचे नसेल तर छोट्या मोठ्या परिवर्तनवादी पक्षांना सन्मानाने सोबत घेण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेण्याची गरज आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. महाविकास आघाडी स्वप्न रंजनात दंग महाविकास आघाडी ही आंबेडकरवादी पक्ष – संघटनांबरोबरच डाव्या, पुरोगामी छोट्या पक्षांनाही दूर लोटतांना दिसत आहे. त्यावरून आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून आरशात स्वतःचाच चेहरा दिसू लागला आहे.  ते सारे मंत्रिपदाच्या शपथविधि सोहळ्याच्या स्वप्न रंजनात दंग झाले आहेत, असे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अनेकरंगी लढतींना आघाडीच जबाबदार महाराष्ट्रात समविचारी मित्र पक्षांना सोबत न घेतल्यामुळे राज्यात मतविभागणी करणाऱ्या अनेकरंगी लढती झाल्या तर त्याला महाविकास आघाडीच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी दिला आहे. 0000

साई बाबांचा पुण्यतिथी दिन मुलुंडमध्ये उत्साहात साजरा

मुंबई :  मुलुंड पूर्व येथील पाम एकर सोसायटीत साई बाबांच्या पूजास्थानवर  रविवारी बाबांचा पुण्यतिथी दिन शेकडो साई  भक्तांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या पुण्यतिथीनिमित्त बाबांसाठी  आराधना विधी करुन भक्तांनी त्यांचे पुण्यस्मरण केले.  या…

विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- डॉ. कैलास शिंदे

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली असून मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांची…

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत स्वरूप सावळकर, चारुशीला नाईक विजेते   बँक ऑफ बडोदा-

मुंबई विभागीय बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष गटात फिडे गुणांकित बुध्दिबळपटू स्वरूप सावळकरने तर महिला गटात चारुशीला नाईकने विजेतेपद पटकाविले. द्वितीय मानांकित स्वरूप सावळकर विरुध्द प्रथम मानांकित तमोजीत चक्रबर्ती यामधील…

 कुलकर्णी, खर्डेकर संयुक्त आघाडीवर

 पहिली अखिल भारतीय फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : एसएमसीए-चेस स्कूल आयोजित पहिल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवलेले मुंबईचे चॅलेंजर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी आणि अर्णव खर्डेकर हे संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत बुधवारी अव्वल क्रमांकावर असलेल्या कुलकर्णीने (2185) काळ्या मोहऱ्यानिशी खेळत निझमो इंडियन क्लासिकच्या सलामीला दिल्लीच्या सैकत नाथविरूद्ध (1829) टॉप बोर्डवर निवडले. दडपणाखाली असलेल्या दिल्लीच्या खेळाडूने 29व्या चालीवर चूक केली आणि कुलकर्णीने संधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, खर्डेकर (1846) पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत यश कापडी विरुद्ध (1818) फिलिडोर बचावाच्या सलामीने सुरुवात केली आणि डावावर संपूर्ण नियंत्रण राखले. मात्र,  47व्या चालीतील चूक महागात पडली. निकाल – टॉप १०: सातवी फेरी: एआयएम सैकत नाथ (५.५) पराभूत आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (६.५) ०-१; अथर्व सोनी (6) बरोबरी वि. यश वाटरकर (6) 0.5-0.5; अर्णव खर्डेकर (6.5) विजय वि. यश कापडी (5); उडुपी आचार्य (5) पराभूत संजीव मिश्रा (6); दर्श शेट्टी (6) विजयी वि. आतिश लद्दड (5) 1-0; दीपक सोनी (5) पराभूत वि. गुरुप्रसाद कुलकर्णी (6) 0-1; तरुण एन (5) पराभूत वि. क्षौनीश जैस्वाल (6) 0-1; शुभ पटेल (5) पराभूत वि. कार्तिक कुंभार (6) 0-1; युती पटेल (6) विजयी वि. प्रिशा मरगाई (5) 1-0; श्रद्धा पडवेकर (4.5) पराभूत वि. ओम गडा (5.5) 0-1. 000

वर्षोनुवर्षे एकाच विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

काहींची पदोन्नती झाल्याने त्यांची दिवाळी गोड उल्हासनगर – सामान्य प्रशासनाच्या अहवालानुसार आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत 54 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर काहींची…