Category: मुंबई

Mumbai news

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ ; महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना दिला.

कांबळे, गोळे, सोनार, राऊत ठरले सर्वोत्तम लिफ्टर

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : नुकत्याच परळ येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मुलांमध्ये कोल्हापूरच्या शामसुंदर कांबळे व मुलींमध्ये मुंबई उपनगरची हर्षदा गोळे व सब ज्युनिअरमध्ये मुंबई उपनगरचा क्रिश सोनार व पुण्याची कादंबरी राऊत यांनी स्ट्रॉंग वुमन व स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उदय देशपांडे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अरुण केदार, छत्रपती पुरस्कार प्राप्त, सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीस समारंभ ॲड. प्रवीण शिंदे, सेक्रेटरी,जीएसटी असोसिएशन, ॲड. दत्तात्रेय उतेकर व संजय नारकर, सरचिटणीस ऑल इंडिया ज्युनिअर जीएसटी ऑफिसर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेचा निकाल (विजेते खेळाडू) ज्युनिअर पुरुष ५३ किलो – विराज पावसकर, (मुंबई उपनगर), ५९ किलो – वैभव जाधव, (मुंबई उपनगर), ६६ किलो – पार्थ तारे, (पालघर), ७४ किलो – श्यामसुंदर कांबळे, (कोल्हापूर), ८३ किलो – ओमकार भगत, (ठाणे),  ९३ किलो – नवाज खान (मुंबई उपनगर), १०५ किलो – रोशन गावकर, (मुंबई), १२० किलो – हर्षल पाटील, (कोल्हापूर), १२० + – सुमित जाधव,(कोल्हापूर) ज्युनियर महिला ४३ किलो – मानसी हांडे, (मुंबई उपनगर), ४७ किलो – हर्षदा घोले, (मुंबई उपनगर) ५७ किलो – शुभांगी पाटील, (कोल्हापूर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), ६९ किलो – प्रेरणा साळवी, (ठाणे), ७६ किलो – सेजल मोईकर, (पुणे), ८४ किलो – प्रतिभा लोणे, (ठाणे), ८४+ किलो – अनुष्का खोपीकर, (पुणे) सब ज्युनिअर महिला ४३ किलो – गायत्री बडेकर,…

किरण शेलार यांना भाजपाची उमेदवारी

मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधरसहित, कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोकण विभाग पदवीधरमधून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई…

शरद पवारांचा शिंदेना इशारा

मुंबई: राज्य सरकारने दुष्काळाबाबत कुठलीच भूमिका घेतलेली नाही. सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांना…

ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई : उकाड्याने हैराण ठाणेकरांसाठी आजची दुपार सुखद ठरली. ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून…

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश

मुंबई :  मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप…

सहावर्षानंतर एसटी कर्मचारींना गणवेश

मुंबई : पगाराची अनियमितता. तटपुंजा पगार यावर कसे बसे आपले घर चाविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता गणवेशापोटी तब्बल सहावर्षानंतर नवेकोरे कापड मिळणार आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप सुरू केले आहे. मुंबईतील विविध आगारांतील चालक, वाहकांसह ९३२…

आवाज कुणाचा ? आज फैसला !

मुंबई : देशाच्या १८ व्या लोकसभेत आवाज कुणाचा असणार याचा फैसला आज मंगळवारी ४ जूनला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हिएम मशिनची…

निवडणूक संपली; दरवाढ सुरू !

वाचा आणि शांत बसा ! स्वाती घोसाळकर मुंबई : अवघा देश आज लोकसभेच्या मतमोजणीसाठी आकड्यांच्या खेळात दंग असताना इकडे सरकारने हळूच दरवाढीस सुरवात केलीय. मतदान होताच जनतेला पहिला झटका अमुल दूध दरवाढीचा तर…

राज्यातील विद्यार्थ्यांना जपानमध्ये ‘ऑन द जॉब’ कौशल्य प्रशिक्षण-कॉन्सल जनरल यागी कोजी

अशोक गायकवाड मुंबई:जपान महाराष्ट्राला २०१७ पासून कौशल्य शिक्षण सहकार्य देत असून जपान सरकारच्या टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांकरिता जपान मध्ये ऑन द जॉब कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येत्या जून महिन्यात जपानला जाणार असल्याची माहिती जपानचे मुंबईतील नवनियुक्त कॉन्सल जनरल यागी कोजी यांनी येथे दिली. गेल्या महिन्यात मुंबईतील वाणिज्यदूतावासाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर यागी कोजी यांनी शुक्रवारी (दि. ३१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर देखील उपस्थित होते. जपान – भारत व्यापार संबंधांची सुरुवात १८९३ साली झाली व जपानच्या कंपन्या मुंबईशी कापसाचा व्यापार करीत असे सांगून आज भारत – जपान संबंध अतिशय व्यापक झाले असून दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक भागीदार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जपान भारताला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ‘अटल सेतू’, अंडरग्राऊंड मेट्रो लाईन तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाला आर्थिक सहयोग करीत असून राज्याच्या विकासात जपानचा वाटा असेल असे कोजी योगी यांनी सांगितले. पुणे व ओकायामा मैत्रीचे प्रतीक असलेले पुणे ओकायामा मैत्री उद्यान पुणे येथे तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत व जपान सांस्कृतिक संबंधांचा मोठा इतिहास असून बुद्ध धर्मामुळे जपान व भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. गेल्या दशकात भारत – जपान संबंध वेगळ्या उंचीवर गेले आहेत. जपानच्या लोकसंख्येत वरिष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे तर भारतात युवकांची संख्या जगात मोठी आहे. जपानने कौशल्य विकास व कौशल्य वर्धन या क्षेत्रात विद्यापीठ स्तरावर सहकार्य केल्यास त्याचा उभय देशांना लाभ होईल असे राज्यपालांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सर्वात तेजीने वाढत असून योग्य वेळी व योग्य ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी यागी कोजी यांचे अभिनंदन केले.