Category: मुंबई

Mumbai news

जरांगेच्या ‘सगे सोयरे’ला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

अकोला : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील  यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केले आहे. कुणबी हा ओबीसीत आहे. त्यामुळे त्यांनी…

३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन दिवसांत सोनसाखळीचा शोध

नवी मुंबई : घणसोली येथील एका ज्येष्ठ नागरिक महिला दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी रिक्षात विसरली. पोलिसांनी ही रिक्षा शोधण्यासाठी तब्बल ३५ सीसीटीव्हींचे चित्रण तपासले आणि रिक्षाचालकाचा माग काढला. दोन…

कडोंमपातील ११८ हेक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण कल्याणच्या तहसीलदारांची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील राज्य सरकारच्या मालकीच्या ११८.१८ हेक्टर जागेवर अतिक्रमणे असल्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांनी उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच, ही अतिक्रमणे हटवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचा…

अनधिकृत व्यवसायांवर व बेवारस वाहन पार्कींगवर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिम व पूर्व, सेक्टर-2 नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ, सेक्टर – 1 शिरवणे न्यु मॉर्डन बार जवळ, सेक्टर -15 फकिरा…

राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा अधिक बळकट होणार

मुंबई  : राज्यातील मोफत रुग्णवाहिका सेवा ”१०८” आणखी मजबूत होणार आहे. ही सेवा देण्यासाठी राज्य सरकारने नवीन कंपनीची निवड केली आहे. राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी म्हणजे रुग्णवाहिकांची संख्या पूर्वीपेक्षा जवळपास…

‘बेस्ट’ दिनादिवशी प्रवासी बसस्टॉपवर ताटकळत

रमेश औताडे     मुंबई : काही वर्षापूर्वी बेस्ट ही भारतातील एक उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा होती. मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट व्यवस्थापनाने बेस्ट सेवा कशी मोडकळीस आणता येते हे यशस्वीपणे दाखवून देत खाजगी कंत्राटदारांचे अविश्वसनीय आणि असुरक्षित जाळे तयार करून प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करण्यास बस स्टॉपवर ताटकाळत सोडले आहे. असा आरोप ‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या संघटनेच्या वतीने संघटनेचे समन्वयक विद्याधर दाते यांनी ‘बेस्ट’ दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई प्रेस क्लब येथे केला. यावेळी जेष्ठ पत्रकार लेखक राजु परुळेकर व प्राध्यापक ताप्ती मुखोपाध्याय प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना राजु परुळेकर म्हणाले, बॉम्बे ची मुंबई झाली तेव्हापासून मुंबईची दुरवस्था होण्यास सुरवात झाली. मुंबईची लोकसंख्या वाढत चालली अन् बेस्ट बस चे अनेक मार्ग बंद होत गेले व काही विस्तारित होत गेले. आता अडाणी चे लक्ष बेस्टवर अजून कसे गेले नाही ? असे सांगत असतानाच , ते म्हणाले, अडाणीला बेस्ट प्रवासी सेवा याबद्दल काही घेणे देणे नसेल. त्यांचा डोळा हजारो एकर बेस्ट डेपोच्या जमिनीवर असेल. बेस्टचा ताफा पूर्णपणे सार्वजनिक (बेस्टच्या मालकीचा) केला पाहिजे. सार्वत्रिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध असणे हे वाहतूक नियोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे, बंद केलेले सर्व बस मार्ग पुन्हा सुरू करावेत.  सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण सुधारणे हे पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आहे. बसेसची संख्या २००० लोकसंख्येमागे किमान १ बस पर्यंत वाढवावी किमान ६००० बसेस उपलब्ध कराव्यात.अशी मागणी यावेळी संघटनेचे पदाधिकारी रंगा सतोसे यांनी यावेळी केली. लोकांना खाजगी वाहतुकीपासून परावृत्त करून सार्वजनिक वाहतुक वापरण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. सर्व सामान्य लोकांना वेळेवर प्रवास करण्याचा अधिकार आहे. बेस्ट बसेसना मुख्य रस्त्यांवर वेगळ्या स्वतंत्र मार्गिका दिल्या पाहिजेत. सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे, बिल्डरांची नाही. बेस्ट डेपोचा पुनर्विकास थांबवावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 211 विना परवानगी बॅनर्सवर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनापरवानगी कुठेही लावण्यात येणा-या बॅनर्स / होर्डींगमुळे शहर विद्रुपीकरण होत असून ते रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत नियमित कारवाई करण्यात येत असते. तथापि मागील दोन दिवसात शहरात मोठया प्रमाणावर बॅनर्स लागले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक मोहीम हाती घेऊन 6 ऑगस्टला एका दिवसात 211 विनापरवानगी बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 29, नेरुळ विभागात 40, वाशी विभागात 10, तुर्भे विभागात 28, कोपरखैरणे विभागात 18, घणसोली विभागात 42, ऐरोली विभागात 27, दिघा विभागात 17 अशाप्रकारे एकूण 211 विनापरवानगी बॅनरवर धडक कारवाई करण्यात आली.…

जुन्नरच्या आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय

मुंबई : औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेतून जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

सेना कल्याण शैक्षणिक संस्था, राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्टला मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा

मुंबई : न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा असे अनुज्ञेय सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायमूर्ती यांना किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या पती किंवा पत्नीस लाभ देण्यात येतात.  हे लाभ मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या पण इतर राज्याच्या उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या हयात पती किंवा पत्नीस देण्यास आज मान्यता देण्यात आली.