Category: मुंबई

Mumbai news

 महाराष्ट्राचा महिला खो-खो संघ स्पर्धेसाठी रवाना

 पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया लीग मुंबई : पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया खो- खो स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला संघाचा निरोप समारंभ सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई येथे पार पडला. हा…

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी सुनिल तटकरे

मुंबई : देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक…

 वक्तृत्व व निबंध प्रत्येक स्पर्धेत

 विद्यार्थ्यांनी मांडले स्वच्छता विचार   नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराचे भविष्य असणा-या नव्या पिढीच्या मनावर स्वच्छताविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीदशेपासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजविले जात आहेत. या माध्यमातून शहराचे भविष्य स्वच्छ व सुरक्षित केले जात आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली शालेय स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या अनुषंगाने नुकत्याच महापालिका शाळांप्रमाणेच खाजगी शाळांमध्येही वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपले विचार मांडले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरिता स्वच्छतेशी संबंधित विषय देण्यात आले होते. ज्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यापैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता. त्याचप्रमाणे इ.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता माझ्या स्वप्नातील शहर, स्वच्छतेतून समृध्दीकडे यापैकी एक विषय निवडायचा होता. तसेच इ.नववी – दहावी गटाकरिता ऊठ तरूणा जागा हो – स्वच्छतेचा धागा हो आणि स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता यापैकी एक पर्याय निवडण्याचे सूचित केले होते. या विषयांच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी 333 शाळांतील 10 हजार 512 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले स्वच्छताविषयक विचार मांडले. निबंध स्पर्धेतही नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांसोबत खाजगी 333 शाळांतील 10 हजार 426 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले स्वच्छता विचार शब्दांकित केले. विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छता कार्यात कसे योगदान देऊ शकतो याचा विचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वतीने अविष्कृत झाला. या स्पर्धांची तयारी करताना विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक व पालकही स्वच्छतेशी निगडीत स्पर्धेतील विषयांच्या अनुषंगाने स्वच्छतामय झाल्याचे चित्र शाळांमधून तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या घरांमधून बघावयास मिळाले. या स्पर्धांमधून केंद्रनिहाय प्रत्येक गटातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून निबंध स्पर्धेतील 30 व वक्तृत्व स्पर्धेतील 30 अशा बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी बारकाईने विचार केला व तो मांडला हे या स्पर्धा उपक्रमाचे यश असून याव्दारे नवी मुंबईतील घराघरांत स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत प्रसारित झाला. ००००

 महिलांनी आपले बँकखाते आधारकार्डशी संलग्न करण्याचे आवाहन

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या मुंबई :‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज पात्र असलेबाबत त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश (SMS) प्राप्त झाले आहेत. परंतू अद्यापपर्यंत योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न (आधारसीडेड) असल्याची त्वरित खात्री करून घ्यावी आणि आधार संलग्न केलेले नसल्यास संबंधित बँकेत जावून बँक खाते आधारकार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही त्वरित करून घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. ००००

ई – वेस्ट संकलन मोहीम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाने यशस्वी

 थ्री आर सेंटर्समधील कपडे संकलन मोहीम तसेच नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत ‘थ्री आर’ संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष देत आज ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत नमुंमपा…

पक्ष तोडण्याची गरज नव्हती : सुप्रिया सुळे

मुंबई:  अजित पवारांनी मागितलं असतं तर पक्षाने त्यांना हवं ते दिलं असतं. पक्ष तोडण्याची काय गरज होती? पण त्यांनी आमचं जीवन अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि ते निघून गेले असे शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या…

सोमय्या मानहानी केसमध्ये संजय राऊतांना जामीन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांना १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिक्षेविरोधात सत्र…

हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. धमकी देणाऱ्या…

मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेने जीव गमावला

मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून…