Category: मुंबई

Mumbai news

एनएमएमटी मुख्यालयासह आगारांचीही स्वच्छता

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत परिवहन उपक्रमाची बस आगारे,…

११ क्षेत्रांतील मान्यवरांचा सुवर्णरत्न सन्मान पुरस्काराने गौरव!

 चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा संपन्न!   मुंबई : माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानचा दिमाखदार सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा रंगला. अतिशय देखणा असा हा सोहळा पाहण्यासाठी रसिकांनी…

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँकेत जमा

मुंबई : महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे…

बदलापूर एन्काऊंटरचे आव्हाडांकडून पोस्टमार्टेम

 प्रत्यक्षदर्शींची ऑडियो क्लिपच केली जाहिर मुंबई : बदलापुरमधिल वासनांध अक्षय शिंदेचे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटचे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनीच पोस्टमार्टेम केले आहे. आव्हाडांना आज या एन्काऊंटचा प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांचे संभाषणच समाजमाध्यमांवर…

शिवतिर्थावर दसऱ्याला आवाज ठाकरे सेनेचाच !

मुंबई : वाजत या… गर्जत या… गुलाल उधळत या अशी मेघगर्जना करीत शिवतिर्थावरील दसरा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवतिर्थावरील दसऱ्याचा वारसा यंदाही उद्धव ठाकरेंची शिवसेनाच चालवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवतिर्थावर दसऱ्याला…

राज्यातील तरुणींना सरकारकडून स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार…

 ‘हर घर दुर्गा’ अभियानाची सुरवात मुंबई : आत्म संरक्षणासाठी राज्यातील तरुणींना स्व रक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात आयोजित केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘स्वरक्षण हा एक पर्याय नसून आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल,’ असे लोढा म्हणाले. ३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ‘हर घर दुर्गा ” अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबई , कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदाह शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे. राज्यातील १४ आय टी आय चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. मुंबई, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे.अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली. 0000

तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार –  हेमंत पाटील

रमेश औताडे   मुंबई : राज्यात बहु‌संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फाय‌द्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्‌याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे  पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनी  ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल. असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. काही तथाकथित नेत्यानी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गाची सखोल स्वच्छता

   5500 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई : नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे…

 मुंबईच्या ज्येष्ठा पवारला तीन सुवर्णपदके

 इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा मुंबई: थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा शशांक पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत…