पाणी पुरवठा विषयी जाहीर आवाहन
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10.00 ते रात्री…
Mumbai news
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10.00 ते रात्री…
4 हजारहून अधिक नागरिकांनी राबविले महास्वच्छता अभियान नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले. यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले. एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक लोकसहभागावर भर देत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थी सहभागावर भर दिला जात आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. या मोहीमेमध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यासह माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक व सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, एपीएमसीचे सहसचिव डॉ.महेश साळुंखे पाटील व संचालक अशोक वाळुंज व शंकरशेठ पिंगळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व विशाल डोळस, नमुंमपा घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व संतोष वारुळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. 00000
‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाचा २५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई, : मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, साहित्यिक डॉ. अलका नाईक यांना नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. नक्षत्राचं देणं काव्यमंच,…
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील महाआरोग्य शिबीरात 10 हजार पेक्षा जास्त नागरीकांनी घेतला लाभ मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेचे आरोग्य सुद्रुढ राहावे, यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शना खाली शिवे सेने तर्फे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत आयोजीत विनामुल्य महा आरोग्य शिबीरात वायकर यांनी अवयव दानाचा संकल्प करीत अर्ज भरला. या शिबीराचा सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. दिवसेंदिवस वाढत जाणारी व न परवडणारी उपचार पद्धती, आर्थिक बाबीनमुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यावर परिणामकारक उपाययोजना तसेच रोगाचे निदान वेळीच व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार वायकर दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. या शिबिरात विविध रोगांवर डॉक्टरांचे मार्गदर्शन, उपचार तर मिळातातच तसेच विनामुल्य औषधे देण्याचा प्रयत्न सातत्त्याने करण्यात येत आहे. शिबिराचे उदघाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात लोकसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवाना आवश्यक्यतेनुसार व्हीलचेअर, नेक बेल्ट, वॉकर, गुडघापट्टी, आधार काठी, मोफत औषधे व चष्मे यांचे वाटप करण्यात आले.. शिबिरात अस्थी रोग, बाल रोग, स्त्री रोग, दंत रोग, नाक-कान-घसा, मधुमेह, रक्त तपासणी, डोळे तपासणी, हाडांची ठीसुळता, त्वचा रोग, सर्वसाधारण रोग आदींची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यात आयुर्वेदिक व होमीयोपथीक उपचार पद्धतीचा ही शिबिरात समावेश करण्यात आला होता. या शिबीरात अवयव दानाचा स्टॉल उभारण्यात आला होता. खासदार रविंद्र वायकर यांनी हा फॉर्म भरून अवयव दानाचा केलेला संकल्प रोटो आणि सोटो च्या समनव्यक सुजाता अष्टेस्कर आणि पर्व संस्थेचे विश्वस्त प्रविण वराडकर यांच्या उपस्थितीत भरुन घेण्यात आला यावेळी बोलताना खा, वायकर म्हणले की बोलतो तेच प्रथम कृतीतून करून दाखवतो त्याच प्रमाणे आज अवयव दान संकल्प मी सुरू केला आहे आता संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि प्रसार करुन यासाठी अधिक जोमाने माझे कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास दिला. या शिबिरात मुंबई महानगर पालिकच्या के. ई. एम, नायर, ट्रॉमा, कूपर रुग्णालयातील डॉक्टर, त्याचं बरोबर डॉ. रत्नपारखी, डॉ. राहुल महाले, डॉ. प्रवीण बांगर आदी डॉक्टर सहभागी झाले होते. रोटरी क्लब, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढाव घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा मुंबई दौरा निश्चित झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसांत दिल्लीतून अधिकारी महाराष्ट्रात येत असून राजकीय पक्षांसह निवडणूक…
अखेर ब्राह्मण समाजाच्या लढायला यश भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर 50 कोटी रुपयांची महामंडळासाठी तरतूद मुंबई आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक…
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड २० मिनिटे चाललेल्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाली, सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची…
पोलिसांनी तीन गोळ्या ठोकल्या एनकाऊंटर बोगस असल्याचा विरोधकांचा आरोप ठाणे : बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुलिंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर…
आज पाचही एपीएमसी मार्केटमध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत दररोज विविध ठिकाणांवर स्वच्छता मोहीमा हाती घेण्यात आल्या असून आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील…