Category: मुंबई

Mumbai news

शैक्षणिक मागण्यांसाठी आज राज्यभर महामोर्चे

अनिल ठाणेकर   राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असून मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे…

वेतनवाढ नसतानाही कामगारांच्या चेहऱ्यावर स्माईल

रमेश औताडे   मुंबई : महाराष्ट्राची लाल परी एसटी महामंडळातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर काही काळ का होईना स्माईल दिसू लागली आहे. वेतनवाढ व भरघोस बोनस…

पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न

 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत…

माविआचा जागावाटपासाठीचा मुहुर्त ठरला

 २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे मुंबईत येणार स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात मविआने मात्र…

 पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत असून विविध ठिकाणांहून दररोज 110 पाणी नमुने तपासण्यात येत असतात. सध्याच्या पावसाळी कालावधी लक्षात घेऊन यामध्ये वाढ करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने पाणीपुरवठा विभागास देण्यात आले होते, त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम आज संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. यामध्ये नेहमीपेक्षा 10 पट अधिक म्हणजे 1000 पेक्षा अधिक पाणी नमुने महापालिका क्षेत्रातील विविध भागांतून संकलित करण्यात आले व त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासण्यात आली. या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.* केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत *‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’* हे विशेष अभियान जाहीर करण्यात आले असून त्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याचा संदेश अधोरेखित करण्यात आलेला आहे. या अभियानात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झाली असून स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम लोकसहभागावर भर देत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे *नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचा हा अभिनव उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आला असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी सांगितले.* या पाण्याच्या चाचणी मोहीमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील पीएच (pH), Turbidity, TDS (Total Disssolved Solids), Residual Cholrine इत्यादी घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहे. तसेच E-Coli ही चाचणी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे. सेक्टर 50 मलप्रक्रिया केंद्र येथील प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिेंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. वसंत पडघन, उपअभियंता श्री.सचिन शिंदे, उपअभियंता स्वप्निल देसाई, कनिष्ठ अभियंता श्री.किरण सानप व श्री.वैभव देशमुख उपस्थित होते. या मोहीमेत सर्वच विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिले. *पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पाण्याच्या नियमितपणे होणा-या गुणवत्ता चाचणी संख्येत लक्षणीय वाढ केल्याने नमुंमपा क्षेत्रातील पाणी गुणवत्तेचे प्रमाण अधिक बारकाईने लक्षात येईल व त्यानुसार आवश्यकता भासल्यास सुधारणा करणे शक्य होईल असे सांगत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमाला नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांनी पुढील काही दिवसात आणखी एकदा अशा प्रकारची पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 00000

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण जागेवरील झोपडयांचे पुर्नवसन त्वरित करावे,

झोपडपट्टी चळवळ अध्यक्ष घनश्याम भापकर यांचा इशारा केतन खेडेकर   मुबंई अंतराष्टीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेवर ८० हजार पेक्षा जास्त झोपडयाचे पुर्नवसनाच्या प्रश्नावर शासनाने कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही. सध्या १२-१२-२००६ ला झालेल्या मियाल आणि एम एमआरडीएमध्ये झालेल्या करार नुसार पुर्नवसन होत नसल्याचे स्पष्ट पणे दिसते आहे. विमानतळ लगत असलेल्या झोपडयां पैकी संदेश नगर व ऋतिनगर बैल बाजार हया ३,७४७ झोपडयांचे पुर्नवसन इतर विमानतळ लगत असलेल्या झोपडयांचे दिशा ठरवणारी आहे. मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ जागेवर जागेवरील झोपडयांचे पुर्न वसनसाठी बांधण्यात आलेले एच.डी.आय.एल प्रिमिअर, विदया विहार, येथील ३० इमारती (१०,००० घरां) पैकी फक्त ३ इमारती विमानपतन साठी आरक्षित केल्या आहे. सदर सर्व पात्र व अपात्र झोपड्यांसाठी घर व सुख सुविधा मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ चालवणारी अदाणी कंपनीला दयायची जबाबदारी आहे. परंतु अस काही होत नसुन त्या झोपडी धारांच्या हक्काची घर इतर प्रकल्पात सोपवण्याची काम होत आहे. तसेच झोपडीचे हस्तातरण शुल्क (४०,०००) व सहशुल्क (२,५०,०००) अदाणी कंपनीला भरण्यास न सागंता, झोपडीधारकांना भरायला सागीतल्यामुळे हया मोठ्या संकटातुन गरीबाना वाचवण्यासाठी आम्ही येत्या 5 ऑगस्ट पासून आझाद मैदनत बेमुदत आमरण उपोषण करत असल्याची माहिती घनश्याम भापकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी झोपडपट्टी चळवळ समितीचे बाळासाहेब वाघ गणेश गायकवाड, नारायण सावंत, श्रीकांत अडांगळे उपस्थित होते. 000

 नाना शंकरशेठ यांचे चरित्र अभ्यासक्रमात

मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली माहिती     मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ हे मुंबईतील शंभर वर्षापेक्षा जास्त  इतिहास असणाऱ्या व पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनहॅम कॉलेज,सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज आणि द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,या महाविद्यालयांचे एकत्रित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना सन २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे. मुंबईच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतीक, जडणघडणीमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या महाविद्यालयांचे योगदान मोलाचे आहे.या महाविद्यालयामधून मुंबईच्या शिल्पकाराचे अर्थात नाना शंकरशेट यांचे चरित्र विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. अमर शेंडे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्यवाह असून गेली वीस वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा या पुस्तकाची हैदराबाद येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय,कलकत्ता व महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झाली होती.तसेच मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या वरील त्यांच्या बाळशास्त्री या चरित्रा ची दखल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी घेतलेली आहे.तसेच अमर शेंडे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या चरित्र ग्रंथाच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव विलास पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, सदस्य रवींद्र बेडकीहाळ, सचिव डॉ मीनाक्षीताई पाटील, राजकीय विश्लेषक जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी तथा गुरुजी, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौमित्रा  सावंत, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सुविधा सरवणकर, न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या संचालक प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, एल्फिन्स्टन चे प्रा.बाळासाहेब खोमणे, साहित्य मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 0000

मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज

प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश     मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी संपूर्ण मुंबईतून आतापर्यंत सुमारे सहा लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून छाननीसाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत. अर्जांची छाननी वेगाने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. राज्यातील महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत मुंबईमध्ये ही योजना राबवली जात आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवाय, विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत शहर विभागातून सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत, तर उपनगरातून सुमारे चार लाख अर्ज आले आहेत. अजून अर्ज येण्याची शक्यता असून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांची छाननी करणे हे आता मुंबई महानगरपालिकेपुढचे आव्हान आहे. दोन पाळ्यांमध्ये छाननीचे काम अर्जांची छाननी वेगाने व्हावी याकरिता पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयात १० संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन पाळ्यांमध्ये काम करावे. प्रत्येक पाळीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. जाहिरातींसाठी पालिकेचा निधी? या योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने १२ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात योजनेची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्याकरिता आवश्यक निधी वॉर्ड स्तरावर उपलब्ध अन्य निधीतून करावा असे निर्देश दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी पालिकेचा निधी का, असा सवाल पालिका वर्तुळात विचारला जात होता. मात्र सुरुवातीच्या काळातील हे परिपत्रक असून नंतर काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीपैकी एक टक्का निधी हा या योजनेच्या जाहिरातीसाठी वापरावा असे निर्देश दिले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा  ११ ऑगस्टला 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. आयडियल…