Category: मुंबई

Mumbai news

धारावीकरांची एकजूट तोडण्यासाठी मोदानी कंपनीचा नवा डाव

क्रिकेट स्पर्धेच्या आडून तरुणांना फोडण्याचे षडयंत्र :- प्रा. वर्षा गायकवाड धारावीवर अधिकृत किंवा अनधिकृतचा ठपका ठेवणारे मोदानी अँड कंपनी किंवा DRPPL आहेत तरी कोण? मुंबई : धारावीकरांच्या एकजुटीला घाबरून मोदानी…

पार्कोफीन संघाला विजेतेपद

विजय मांजरेकर -रमाकांत देसाई स्मृती लीग क्रिकेट स्पर्धा मुंबईः  शिवाजी पार्क जिमखान्याने विजय मांजरेकर  आणि रमांकात देसाई या मान्यवर क्रिकेटपटूंच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत केलेल्या टी- २०  स्पर्धेचे विजेतेपद पार्कोफीन क्रिकेट संघाने…

थरमॅक्सच्या अनु आगा सन्मानित

बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली जीवनगौरव पुरस्काराने व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करा- राज्यपाल रमेश बैस अशोक गायकवाड मुंबई : आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट…

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात

मुंबई : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात ६०, गोंदियामध्ये १४६, वर्धा येथे ३०, भंडारा येथे १० आणि चंद्रपूरमध्ये ९५ अशा एकूण ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे. महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे. देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची नियमित माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.

1 जून ते 3 जूनर्यंत राज्यात जोरदार पाऊस मुंबई : मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात 1 जून ते 3 जूनर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वांसाठी दिलासा…

जया शेट्टी खूनप्रकरणी छोटा राजन दोषी

मुंबई: मायानगरी मुंबईलाहादरवून सोडणऱ्या  मुंबईतील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक  जया शेट्टी यांच्या खूनप्रकरणी अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड छोटा राजन याला मुबंईतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.शुक्रवारी दिनांक 31 मे रोजी…

जम्बो ब्लॉकमुळे नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करा

मुंबई : रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर ३१ मे ते २ जूनपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला असून जवळपास ९३० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त लोकलने प्रवास करतात. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग खूप संवेदनशील असून, येथे कोणतीही घटना घडल्यास, त्याचे पडसाद सर्वदूर पडतात. शुक्रवारी रात्रीपासून सीएसएमटी येथे ब्लॉक आहे. त्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने याची माहिती अगोदर देणे गरजेची होती. परंतु, जनसंपर्क विभागाच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रवासी घराबाहेर पडले तर गर्दीचे नियोजन रेल्वे प्रशासनाने कसे करणार? प्रवासादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी उपस्थित केले आहे. तसेच या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागातील अनेक प्रवाशी नोकरीनिमित्त प्रवास करतात. परंतु, मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी लोकलमधून प्रवास कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे, नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावा, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया

महाविद्यालय पसंतीक्रमाचा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून भरता येणार मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरत आहेत. परंतु दहावीचा निकाल जाहीर होऊनही उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात पडले आहेत. आता बुधवार, ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दरवर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीची प्रवेश क्षमता वाढ आणि शासनाकडून नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येते. या सर्व महाविद्यालयांना केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व जागा आणि नवीन महाविद्यालयांची नोंदणी ही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यानंतर ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येईल. तसेच उर्वरित प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग १ भरून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात (लॉक) आले आहेत. तर ३८ हजार ३८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित (ऑटो व्हेरिफाय) आणि २३ हजार ७५५ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही मार्गदर्शन केंद्रावर (जीसी व्हेरिफाय) झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे कसे? विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ हा ५ जूनपासून भरता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागतील.

मुंबईत ५ टक्के पाणीकपात,

येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत आजपासून (३० मेपासून) ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सातही धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ही कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. तसेच, या सात धरणांमध्ये आता केवळ १ लाख २१ हजार ४१९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असून सातही धरणांमध्ये केवळ ८.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पाणीसाठा १४.४ टक्क्यांवर होता. या पाणीकपातीमुळे पूर्वीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या पाणी चिंतेत आणखी वाढ झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईकरांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका प्रशासनातर्फे येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पालिकेने लागू केलेल्या पाणीकपातीचा या भागांनाही फटका बसणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माझी वसुंधरा अभियानातील पर्यावरण जागरूकता उपक्रमात

नवी मुंबईकरांचा उत्साही सहभाग नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नानाविध उपक्रम राबवित असून शाश्वत पर्यावरण विकासाकडे वाटचाल करीत आहे. या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे पासून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादरीकरण, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागरिक शहराचे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कशा प्रकारे हातभार लावू शकतात याविषयी माहिती देणारी व त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करणारी हस्तपत्रके छापण्यात आली असून त्याचे वितरण पर्यावरण स्वयंसेवकांमार्फत घराघरात जाऊन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात अशा जागा आणि नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पर्यावरण जागृती स्टॉल लावून नागरिकांना माहिती दिली जात आहे. या सप्ताहभरात आठही विभागांमध्ये प्रत्येकी तीन ते चार मुख्य ठिकाणी हे किऑक्स लावण्यात आले असून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात येणा-या या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यांची व्यापकता वाढवून त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड यांनी सांगितले आहे.