Category: मुंबई

Mumbai news

विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू

मुंबई : गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यात उत्तर महाराष्ट्रातील नऊ, विदर्भातील सात, तर विरारमध्ये एक जण दगावला आहे. याखेरीज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात…

ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने बुधवार, 18 सप्टेंबर  रोजी, गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुहू चौपाटी, मुंबई येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत   ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनचे सदस्य दीपक पवार, संतोष उनवणे, राजेंद्र…

महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार – एकनाथ शिंदे

अशोक गायकवाड   मुंबई : जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार आहे. हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’ चे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन्, फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ एमजे खान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते. वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे नमूद करून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, की, राज्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्राशी संबधीत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करत असल्याचा सार्थ अभिमान आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील यशाचे आणि शाश्वत शेतीतील प्रयोग आणि प्रयत्नांचे जागतिक पटलावर प्रतिबिंबित करणारा आहे. हा पुरस्कार केवळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पना आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये केलेल्या जागतिक पातळीवरील योगदानाचे सन्मान आहे. महाराष्ट्राने भारताच्या कृषी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान राखले आहे. आपले शेतकरी, आपल्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांच्या जिद्दी आणि कष्टांनी देशाचा कणा बनले आहेत. राधाकृष्णन म्हणाले की, दुष्काळ, पाण्याची कमतरता, पूर आणि हवामान बदल यांसारख्या असंख्य आव्हानांनंतरही, महाराष्ट्राने आपली ताकद आणि अनुकूलता दाखवली आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्रगत बियाणे, खत आणि आधुनिक शेती साधनांनी सुसज्ज केले आहे, तसेच सूक्ष्म सिंचन यांसारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे. कृषी विद्यापीठांशी असलेल्या सहकार्यामुळे अत्याधुनिक संशोधनाचे प्रत्यक्ष वापरामध्ये रूपांतर होऊन उत्पन्न वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या पर्यावरण बदल आणि तापमान वाढीचा काळात पर्यावरण संरक्षण आणि कृषी यांचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आजचा हा पुरस्कार स्वीकारत आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पुरस्कार समर्पित करत आहे. आजच्या काळात अन्न सुरक्षा महत्वाची आहे. लोकांचे पोट भरण्याचे महत्वाचे काम शेतकरी करतो. त्यामुळे त्याला अन्नदाता म्हणतात. शेतकरी आणि शेती महत्वाची आहे. वातावरण बदल आणि तापमान वाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळेच तापमान वाढ कमी करणे ही गरज आहे. त्यातही राज्य शासनाने पर्यावरण कृती समितीची स्थापना केली आहे. राज्यात २१ लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ या सारथ्य नैसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी हा नवीन बदलांनाही स्वीकारत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. सिंचनाच्या १२५ प्रकलपणा मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे ही शासनाचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यंमत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. तसेच रोजगार, थेट परकीय गुंतवणूक, विकास यामध्ये राज्य देशात आघाडीवर आहे. कृषी विकासातही राज्य आघाडीवर आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. १ रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्र शासनाच्या ६ हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासन ६ हजार रुपये देते, असे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळत आहेत. येत्या दोन वर्षात ५ लाख सौर कृषी पंप देण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच १७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट आहे. शेतीला चोवीस तास विद्युत पुरवठ्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली जाते. तसेच २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टर करण्यात आली आहे. देशाची आर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन करण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र १ ट्रिलीयन अर्थव्यवस्था निर्माण करून भरीव योगदान देईल. पर्यावरण संरक्षण, विकास आणि कृषीचा शाश्वत विकास यासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज आहे. यात उद्योग आणि अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि शेतकऱ्यांचेही महत्वपूर्ण योगदान राहीले, असेही त्यांनी सांगितले. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे उपाध्यक्ष विल्यम दार यांनी प्रस्तावनेमध्ये पुरस्काराचे स्वरूप आणि निवड पद्धती याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन जागतीक कृषी परिषदेचे राष्ट्रीय संचालक एम.जे.खान यांनी व्यक्त केले. 00000

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई, : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात…

 ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या पर्यटन दिनाचे घोषवाक्य

 एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) द्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) ‘पर्यटन आणि शांतता’ (“Tourism & Peace”) हे घोषित करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये यांच्यातर्फे ‘पर्यटन व शांतता’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी  दिली आहे. यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिन हा केंद्रिय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत ‘एमटीडीसी’ची प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी २७ सप्टेंबरपर्यंत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन दिन’ साजरा  करण्यात येणार आहे. एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयांमार्फत परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धांचे प्रत्येक प्रादेशिक स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी  पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय  ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन व शातंता’ या घोषवाक्याशी निगडीत प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा  देखील आयोजित करण्यात येणार आहे. निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना २ रात्री ३ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह. (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील पर्यटक निवासात), व्दितीय पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ रात्र २ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत), तृतीय पारितोषिक विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था दुपारचे जेवण प्रमाणपत्र+ स्मृतीचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. पर्यटक निवासांमध्ये माहितीपत्रकांचे प्रकाशन करणे. पर्यटक निवासांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालून, पर्यटक निवासी वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना नजिकच्या सुरक्षित- पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचर वॉकचे आयोजन करावे जागतिक पर्यटन दिनाचे उपक्रम प्रभावीप्रणे राबवावे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे. एमटीडीसीच्या  पर्यटन दिनानिमित्त राज्यभर होत असलेल्या प्रादेशिक कार्यालयातील विविध कार्यक्रम, परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, अनुभवात्मक पर्यटनाची नोंद जागतिक पर्यटन संघटना युनायटेड नेशन्सने घेतली असून  ही  माहिती युनायटेड नेशन्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या स्पर्धेसाठी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, राज्यातील प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापक, मानसी कोठारे हे कार्यरत आहेत.

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडयात विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छता संस्कार

नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 2 ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा स्वच्छ भारत मिशनच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ अभियान राबविले जात आहे.…

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही विभागात कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 8 ही विभागात दि.18/09/2024 व दि.19/09/2024 रोजी या दोन दिवसात छोटे बॅनर 1893 व मोठे बॅनर 623 असे एकुण 2516 बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर प्रिंट करुन देणारे एकुण 22 प्रिंटींग करणाऱ्या व्यवसायीकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सुचना देण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापु नये व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात येईल अश्याही सुचना देण्यात आल्या. यापुढे अनधिकृत बॅनर्स/होर्डींग्ज विरुध्द कारवाई तीव्र करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर – डॉ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर   भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपणाला दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी माहिती दिली की,   जर या पोलीस उपायुक्तांनी मध्ये उडी घेतली नसती तर भिवंडीत दंगल झाली असती; दंगल रोखणार्‍या अधिकाऱ्याला असे बक्षिस दिले जात असेल तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण होणार नाही तर काय होईल? आपणाला अंतर्गत माहिती अशी मिळत आहे की, या बदलीला  पोलीस दलातील अनेकअधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तेथील बीजेपीचा  एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता.  दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे सर्वे आले आहेत. त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काहीही करून सत्ताधारी वर्गाला दंगल भडकवायची आहे.  पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचे आणि दंगल घडवायची, हे तत्व सरकारचे आहे . मी पोलिसांनाच विनंती करेन की,  तुम्ही राजकीय हत्यार बनू नका. या सरकारला दंगल घडवूनच निवडणूक जिंकायची आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनू नका.  आपल्या देशातील हिंदूंना कधीच आक्रमक हिंसा आवडत नाही.  त्यामुळे येथे शांततेत जनजीवन चालू आहे. एकदा दंगल झाली की दंगलीनंतर जी सामाजिक द्वेषाची भिंत उभी राहते;  ती पडायला नंतर 20 – 25 वर्षे लागतात, समाजामध्ये जेव्हा विद्वेष पसरतो तेव्हा समाजामध्ये जो आपलेपणा असतो, तो गायब होतो. याचे भान ठेवण्याऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी दंगली माजवल्या जात आहेत.  काल बिहारमधील नेवाडा गावात  80 दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या. एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून  डॉ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन ही संकल्पना मांडली होती.  पण, आताची परिस्थिती पाहता, जाती व्यवस्थेचे उच्चाटन तर होताना दिसत नाहीच;  किंबहुना, जातीयवाद अधिकच वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातले जातेय. आज जर भाजप 400 पार झाली असती तर काय झालं असतं,  याचा विचार करा ! दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांच्या मदतीला संविधानही आले नसते. सगळेच उघड्यावर आले असते.  कमीत कमी आज आमच्यासारखी माणसे बोलतात तरी! बिहारच्या बेलछीमध्ये 27 मे 1977 रोजी  अकरा दलितांना जीवंत जाळण्यात आले होते. त्यावेळेस विरोधात असणाऱ्या इंदिरा गांधी यांना गावात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र,  इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलछी गावात गेल्या होत्या. त्यावेळी लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय त्यांच्या स्वागताला उभे होते. पण, आज एकटा तेजस्वी यादव बोलत आहे. सत्तेत असलेले शांत बसले आहेत.  आज आपण एवढा  प्रवास केला; देश एवढा पुढे गेला आणि आज आपण काय बघतोय तर दलितांचे गावच जाळून टाकले जातेय.   दलितांनी भारतात राहूच नये का? काय परिस्थिती आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. म्हणजे, ज्यांचे जीवन उद्ध्वस्त आहे : त्यांना तुम्ही जगूही देत नाहीत? खरंतर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी नेवाड्याचा दौरा करून अत्याचारग्रस्त दलितांच्या सोबत आम्ही आहोत, हे सांगायला हवे आहे. त्यांना आता आधाराची गरज आहे. आपली मागणी आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवाय. ते स्वतः मागासवर्गीय आहेत. त्यांच्या राज्यात जर दलित, आदिवासी,  मागासवर्गीयांवर अत्याचार होत असेल तर ते शोभनीय नाहीच. नितीशकुमार हे जर लोहिया, कर्पूरी ठाकूर यांचा वारसा सांगून समाजवादी विचारधारेवर चालत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायलाच हवी. अशा घटनांकडे पाहून दलित, मागासवर्गीयांनी काय विचार करावा, हा देश आमचा राहिला आहे की नाही?, असा सवालही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. चौकट वन नेशन… वन इलेक्शन बाबत पत्रकारांनी विचारले असता, हे फक्त वन नेशन… वन इलेक्शन हा प्रकार नाही. तर वन लीडर आणण्याचा प्रकार आहे. या देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याची ही सुरूवात झाली आहे. या निर्णयाने सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल. भारतीय संविधानाने दिलेला संसदीय लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करण्याची आणि त्यातून संविधान संपवण्याची ही तयारी सुरू झाली आहे. पण, आम्ही जीव देऊ पण संविधान बदलू देणार नाही, असा इशाराही डॉ. आव्हाड यांनी यावेळेस दिला. 00000

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे निवासी पंच प्रशिक्षण शिबिर

मुंबई : येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंचांचे निवासी प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्रमसाफल्य निवास, खंडाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. असोसिएशनचे…

 राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धा

 मुंबई उपनगरची १९ पदकांची कमाई   मुंबई : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या १२ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या युग पटेल, आरोही कांबळे, हर्ष कांबळे, आशनी नितीन काळे, मन पटेल, उत्कर्ष शाह, मन मारू, नम्र वासानी, नैती वासानी यांनी पदके जिंकली. नम्र वासानी ने १ सुवर्ण, ३ कांस्य पदके पटकावली. तर आरोही कांबळे, नैती वासानी ने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदक जिंकले. मन पटेलने १ सुवर्ण, २ कांस्य पदकांची कमाई केली. युग पटेलला १ सुवर्ण, १ कांस्य पदक मिळाले. प्रशिक्षक विद्धेश मोरे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन मुंबई सब अर्बन जंप रोप संघटनेचे अध्यक्ष, स्वप्नील पहुरकर, सचिव, सौ. वर्षा काळे, खजिनदार, योगेश सांगळे यांनी केले.