Category: मुंबई

Mumbai news

शहर स्थितीचा व पावसाळापूर्व कामांचा बारकाईने घेतला आढावा

आकस्मिक वादळ व अकाली पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई : काल सायंकाळी आलेल्या आकस्मिक वादळामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज तातडीने दूरदृश्य प्रणालीव्दारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली तसेच कालचा प्रसंग लक्षात घेऊन आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे 24×7 सतर्क राहण्याचे निर्देश दिले. काल सायं. 4.05 पासून 5.35 पर्यंत ताशी 107 कि.मी. वेगाने वादळी वाऱ्यांसह अकाली पर्जन्यवृष्टी सुरु झाली. आयुक्तांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर मदत कार्यासाठी तात्काळ कार्यान्वित झाली आणि 8 वाजेपर्यंत वादळामुळे पडलेली झाडे व फांदया, दोन ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, काही ठिकाणी उडालेले पत्रे यावर कार्यवाही करत रहदारीचे अडथळे दूर करुन जनजीवन सुरळीत करण्यात आले. महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावर तत्पर कार्यवाही झाल्याने आणि नागरिकांना बचाव व मदतीचा तात्काळ संदेश निर्गमित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि या आकस्मिकपणे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा विचार करुन पूर्व खबरदारी घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री.संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत विभागनिहाय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला आणि मौल्यवान सूचना केल्या. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याची घडलेली दुर्घटना लक्षात घेत नमुंमपा क्षेत्रातील अंतर्गत भागात तसेच महामार्ग, रेल्वे हद्द, एमआयडीसी भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे रचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एकूण होर्डिेगची संख्या, त्यांचे आकारमान, त्यामधील परवानगी दिलेल्या होर्डिंगची संख्या याची माहिती त्वरीत संकलित करुन सादर करावी तसेच अधिकृत होर्डिंगवर ते अधिकृत असल्याचे चिन्ह प्रदर्शित करण्याची कार्यवाही करणे त्याचप्रमाणे अवैध/ अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वादळी वारे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीसमयी नागरिकांनी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला थांबू नये असे आवाहन व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले. होर्डिंगप्रमाणेच ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेबाबतही सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे  आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. या वादळी कालावधीत अनेक ठिकाणी गच्चीवरील, घरांवरील पत्रे उडाले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सोसायटयांना व वसाहतींना देण्यात याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले. नमुंमपा क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई सुरु असून त्या कामाला गती देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी नाल्यातून काढला जाणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर त्वरीत उचलून नेण्याचे सूचित केले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्त पाहणी करुन नालेसफाई पूर्ण करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कालच्या अकाली पावसात मुकंद कंपनीजवळील रेल्वे ब्रीजखाली पाणी साठण्याची कारणमीमांसा जाणून घेत आयुक्तांनी त्याठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचा व्यास मोठा ठेवणेबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचे सूचित केले. यामध्ये तेथील रिटेनिंग वॉलबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे रेल्वेस सूचित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले. सी-1 श्रेणीच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्वखबरदारी घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत साथरोग, मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे करण्याचे व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्याचे तसेच याबाबत  खाजगी डॉक्टर्सनाही सतर्क करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळी कालावधीत पाणीपुरवठा शुध्द व पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घेण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी उदयान विभागाने वाहतूकीला व रहदारीला अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांदया छाटण्याचे काम तत्परतेने पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. शहरात डेब्रिज आणून टाकले जाते अशा ठिकाणी विभाग अधिकारी यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले. पावसाळापूर्व कामांना यापूर्वीच 15 मे ही डेडलाईन दिली असून येत्या एक ते दोन दिवसात सर्व कामे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत एमआयडीसी भागातील स्वच्छता आणि पुनर्पृष्ठीकरण कामांकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. कालच्या आपत्ती प्रसंगात नागरिकांना दिलासा देणारी तत्पर सेवा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुरविली याची नोंद घेत आयुक्तांनी अशाच प्रकारे यापुढील काळातही सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले.

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा…

मनसेबरोबर युती करून भाजपाने गोरगरिब उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले.

प्रा. वर्षा गायकवाड यांचा बीजेपीवर हल्लाबोल उत्तर भारतीय समाज व काँग्रेस साथ साथ, लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात परिवर्तन करा. मुंबई : कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावून जनतेला वाऱ्यावर सोडले. उत्तर भारतातून मुंबईत कामासाठी आलेल्या लोकांचे तर प्रचंड हाल झाले. या कठीण काळात सर्वात आधी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार या समाजाच्या मदतीला धावून आले. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्य व गरजेचे साहित्य घरोघरी पोहचवले. उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांना गावी पाठवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या परंतु या काळातही भाजपा सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, असा हल्लाबोल उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. सांताक्रूज येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर भारतीय समाज व काँग्रेस पक्षाचे संबंध नेहमीच गंगा जमुना संस्कृतीसारखे राहिले आहेत. काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांचा योग्य तो मान सन्मान राखला आहे. मुंबईचे महापौरपद, विरोधी पक्षनेता, मंत्री, आमदार व संघटनेतही महत्वाची जबाबदारी दिली. उत्तर भारतीय समाज मुंबईच्या संस्कृतीत मिसळला आहे. काँग्रेस सरकारने हॉकर्स पॉलीसी बनवून सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी दिली परंतु कामासाठी मुंबईत आलेल्या या गोरगरिब कष्टकरी समाजावर मनसेने हल्ले केले, मारहाण केली त्याच मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करुन उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. उत्तर भारतीय लोक मुंबईत दुधाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबईतील जागा एका उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजापाने लावला आहे आता त्यांची नजर तबेल्यावरही पडली आहे. दुधावरही जीएसटी लावून लूट केली जात आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनीच कोरोना काळात उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सोडताना अडवणूक केली. गोयल यांनी मासळीचा वास सहन होत नाही म्हणून ते तोंडावर रुमाल बांधून फिरतात हे लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत का? सवाल विचारून, ‘भाजपा सरकार हटानी है, काँग्रेस सरकार लानी है’, असा नारा वर्षा गायकवाड यांनी दिला. या संमेलनाला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, महारष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ कार्यक्रमाचे आयोजक अविनाश सिंह, संदिप शुक्ला आदी उपस्थित होते.

 राज्याचे कॅरम पंच शिबीर संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने ११ व १२ मे २०२४ दरम्यान एल. जे. ट्रेनिंग सेन्टर, दादर, मुंबई येथे पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी व पुणे येथून स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकंदर ४० पंच सहभागी झाले होते. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता. दोन दिवस झालेल्या या शिबिरातील पंचांना आंतर राष्ट्रीय कॅरम पंच श्री अजित सावंत व श्री केतन चिखले यांनी कॅरमच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. शिवाय महाराष्ट्रात भविष्यात अधिक गुणवान पंच तयार होण्यासाठी स्वेच्छेने मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. कॅरमच्या नियमावलीतील प्रत्येक नियमांवर या शिबिरात चर्चा करण्यात आली. शिवाय कॅरम बोर्ड वर सामन्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कृतीद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी आंतर राष्ट्रीय पंच श्री परविंदर सिंग ग्रोव्हर, श्री आशिष बागकार, राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर, श्री रमेश चव्हाण यांनीही शिबिरात सहभागी झालेल्या पंचांना विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंचांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोणत्याही खेळाडूचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी पंचांची असते. त्यामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करत असल्याचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव श्री अरुण केदार यांनी सांगितले. शिबिराची सांगता करताना श्री अजित सावंत यांनी या शिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल यापुढे सामन्यात दिसेल अशी अशा व्यक्त केली. तर श्री केतन चिखले यांनी काम करताना पंचाने आपली भूमिका निष्पक्षपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरात सहभागी झालेल्या पंचानीही या शिबिराचा फायदा झाला असून यापुढे अधिक सतर्क राहण्याचे आश्वासन दिले. तर काहींनी या शिबिरामुळे पंचांची उजळणी झाल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री यतिन ठाकूर व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय पवार उपस्थित होते.

मुंबईला वादळी वाऱ्याचा तडाखा

बेकायदेशीर होर्डींग पडल्यामुळे आठ ठार, शेकडो जखमी मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज वादळी वाऱ्याचा तडाक बसला. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईची पार दैना उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोलपंपावर महाकाय…

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधिल बॅगात दडलय काय ?- संजय राऊत

मुंबई : नाशिकला अवघ्या दोन तासांसाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत या जड बॅगात दडलयं काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

आगरी कोंढरीपाडाचा मतदानावर बहिष्कार

उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…